कोणाला होतो काचबिंदू ?




काचबिंदू कोणाला होऊ शकतो?


आपले वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल. आपल्या चष्म्याचा नंबर वारंवार बदलत असेल. आपल्या घरात कोणाला आधीपासून काचबिंदू असेल. आपल्याला डायबेटिस / ब्लडप्रेशर असेल. आपली दृष्टी संकुचित होत असेल. वरील दिलेल्यापैकी कोणताही त्रास होत असेल तर तुम्हाला काचबिंदू असण्याची शक्यता आहे. तुम्ही वेळेवर तपासणी व औषध उपचार न केल्यास कायमची दृष्टी जाण्याचा धोका संभावतो.

डोळ्याची काळजी घ्या :


भारतातील अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी काचबिंदू हे एक प्रमुख कारण आहे. डोळ्याच्या आतील दबाव वाढणे व त्यामुळे डोळ्याची मुख्य प्रकाश संवेदना वाहून नेणारी नस खराब होते. ही प्रक्रिया हळूवार होते व यामध्ये रोग्याला विशेष त्रास होत नाही, परंतु नजर कमी झाल्यावर काचबिंदू वरील उपचाराचा फायदा होत नाही.

प्रमुख लक्षणे :


काचबिंदूमुळे रोग्याला विशेष त्रास होत नसला तरी काही लक्षणे या रोगाची कल्पना देतात. जसे की, वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, आजुबाजूंची नजर कमी होणे, गाडी चालविताना बाजूचे न दिसणे, प्रकाश दिवे भोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे, डोके दुखणे इत्यादी. मधुमेही, वयस्कर व कुटुंबात काचबिंदू असणार्यां ना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्याची तपासणी होणे महत्त्वाचे आहे.

काचबिंदूचे निदान कसे कराल? :


मधुमेह, चाळीस वर्षावरील व्यक्ती, कुटुंबात काचबिंदू असणार्यांतनी डोळ्याची तपासणी नियमितपणे करावी. नेत्रतज्ज्ञा डोळ्याचा दबाव (वजन) टोनोमीटरद्वारे तपासात डोळ्यामागील नसा Optinerve वर काचबिंदूचा काही परिणाम झाला अथवा नाही यांचे निदान विशेष उपकरणांनी करता येते. यासाठी पेरिमीटर, ओसीटी Optical Coherence Tomography व फंडस तपासणीद्वारे यांचे निदान करता येणे शक्य आहे.

उपाय :


जर काचबिंदूचे निदान योग्यवेळी झाले तर त्यावर उपचार करणे शक्य आहे. डोळ्यात टाकले जाणारे ड्राप्स डोळ्याच्या आतील द्रव कमी करतात व त्याद्वारे पुढील हानी टाळता येते. Eye Drop चा उपयोग नेहमी करावा. ज्याद्वारे अंधत्व टाळता येईल. लेसर किरणांद्वारे किंवा शस्त्रक्रियाद्वारे काचबिंदूवर उपचार करता येतो. नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने काचबिंदूमध्ये उपचार करावे. हे लक्षात ठेवावे की काचबिंदूच्या उपचाराने नजर वाढणे शक्यच आहे. परंतु पुढील नजरेची हानी व अंधत्व टाळणे शक्य आहे. भारतात दीड करोड लोकांना काचबिंदू आहे. त्यापैकी अर्धेअधिक लोकांना ते या रोगाने पीडित असल्याची कल्पनासुद्धा नाही.

या रोगाची लक्षणे सुरुवातीच्या काळात दिसत नाहीत. सध्या जगात 6.6 करोड लोक या रोगाने त्रस्त आहेत. भारतातील 13 टक्के अंध काचबिंदूमुळे आहे. 10 मार्च ते 16 मार्च हा आंतरराष्ट्रीय काचबिंदू सप्ताह म्हणून साजरा केला जातो. जनमाणसात या रोगाची माहिती पसरवणे व त्याचे प्रारंभिक अवस्थेत निदान करणे हा उद्देश आहे.



Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying