मोतिबिंदु शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी
डोळा हा शरीराचा खुप नाजुक भाग आहे त्यामुळे त्याची शस्त्रक्रिये नंतर काळजी घ्यायला हवी.
खालील शुचनांचे तंतोतंत पालन करावे
१. डोळ्यावरून पांच अठवाड़े स्नान करायचे नाही , खांद्या खालूंण केल्यास चालेल.
२. डोळा दिंसातून एकदा पुसायचा असतो, त्यासाठी एका पातेल्यात स्वच्छ पाणी घ्यावे, मेडिकल मधून आणलेला कापूस पाण्यामध्ये टाकावा, कापूस व पाणी अर्धा तास उकळावं, कप्समधील पाणी निचलून डोळा स्वच्छ करावा. घराचा कापूस वापरू नये .
३. डोळ्यमध्ये ४० दिवस स्वच्छ हात धुउन औषध टाकावे.
४. डोळ्याला हात, रुमाल, किंवा कोणत्याही प्रकारचा कापड लावू नये. डोळ्याला पाणी आल्यास पुसू नये, चेहरा धुयु नये.
५. ऑपेरेशन झालेल्या डोळ्याच्या सीडी ने झोपू नये.
६. कला चस्मा नेहमी लावून ठेवणे.
७. वजन उचलू नये, खाली वाकून जाड वस्तू उचलू नये,
८. खोकला आल्यावर त्यावरती औषोधोपचार करावा.
९. तुमच्या बीपी डायबेटीस च्या गोळ्या नियमित चालू ठेवाव्यात.
१०. चुलीसमोर तीन आठवडे काम करू नये.
११. दहा दिवस टीव्ही बघणे किंवा वाचन करणे टाळावे.
१२. लहान मुलांना खेळवू नये खेळते वेळी त्यांचा हात डोळ्याला लागू शकतो.
१३. बिडी,सिगारेट, दारू, तंबाखू याचे सेव्हन पूर्णपणे बंद करावे.
१४. , गुलाल, भंडारा डोक्याला लावू नये..
१५. डोळा अचानक लाल किंवा दिसायला कमी झाल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावे.
१६. डॉक्टरांनी दिलेल्या पूर्तपासणी साठी त्याच वेळेस दाखवावे.
Optometrist