आरोग्य विभागाची परीक्षा राज्यात 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार; परीक्षेबाबत शासनाच्या महत्वपूर्ण सूचना प्रसिद्ध
आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी राज्यात दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये अर्ज केलेले सर्व उमेदवार पात्र ठरविण्यात आले आहेत.परीक्षेच्या संदर्भात शासनाच्या प्रसिद्धी पत्रकातील महत्वपूर्ण सूचना, परीक्षा अभ्यासक्रम व अभ्यासासाठीची संदर्भ पुस्तके याची माहिती सदर लेखात देण्यात आलेली आहे.
आरोग्य विभागाच्या भरतीत ज्या विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी.मधून अर्ज केले होते, त्या विद्यार्थ्यांना ई.डब्ल्यू.एस आरक्षणाचा लाभ शासनाच्या निर्णयानुसार घेता येईल परंतु याबाबत त्यांना परीक्षेच्या दिवसापर्यंत आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र सक्षम अधिकार्याकडून प्राप्त करून घ्यावे लागेल.
ज्या विद्यार्थ्यांनी ई.डब्ल्यू.एस आरक्षणाचा लाभ घेण्याबाबत पसंती कळविलेली नाही किंवा त्यांना सदर प्रमाणपत्र मिळाले नसेल अशा उमेदवारांची गणना खुल्या प्रवर्गात करण्यात येईल. त्यांना खुल्या प्रवर्गाच्या जाहिरातीत नमूद अटी लागू होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी प्रवर्गातून अर्ज करतांना 300 रुपये भरले असतील परंतु ज्यांना ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्र मिळणार नाही, त्यांनी 200 रुपये अतिरिक्त शुल्क परीक्षेच्या दिवसापूर्वी भरणे आवश्यक आहे व त्याची पावती जपून ठेवणे गरजेचे आहे.
परीक्षा शुल्क भरण्याबाबतची माहिती व परीक्षेच्या महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
*आरोग्य विभाग परीक्षा स्वरूप*
1.परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून ती 200 गुणांची आहे.
2.परीक्षेत प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असून शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत.
3.परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे
4.आरोग्य विभागातील तांत्रिक पदांसाठी आरोग्य विषयक 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जाणार आहेत तर मराठी,इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत.वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या अतांत्रिक पदांसाठी इंग्रजी, मराठी,सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत.
5.गट क संवर्गातील पदांसाठी परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे.
*आरोग्य विभाग Important Book List*
*संपूर्ण अभ्यासक्रम तयारीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके*
1.आरोग्यसेवा संपूर्ण मार्गदर्शक- के सागर
2. आरोग्य विषयक तांत्रिक ज्ञान(परीक्षाभिमुख विवेचन व 20,000 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी) - शशिकांत अन्नदाते,के' सागर पब्लिकेशन्स,पुणे
3. आरोग्य सेवक 11 सराव प्रश्नपत्रिका - विनायक घायाळ
4.स्टाफ नर्स 26 सराव प्रश्नपत्रिका- विनायक घायाळ
*आरोग्य विभाग घटकनिहाय महत्त्वपूर्ण संदर्भ पुस्तके*
*सामान्य ज्ञान*
यामध्ये भारताचा इतिहास व नागरिक शास्त्र,भारतीय राज्यघटना सामान्य विज्ञान, क्रीडा, संस्कृती,माहिती अधिकार कायदा, लोकसेवा हक्क अधिनियम व माहिती तंत्रज्ञान हे घटक समाविष्ट आहेत यासाठी पुढील पुस्तक उपयुक्त ठरतील.
1. संपूर्ण सामान्य ज्ञान - के सागर
2.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
3.सामान्य विज्ञान - अनिल कोलते/ कविता भालेराव/चंद्रकांत गोरे
4.लुसेंट जनरल नॉलेज
5.स्टेट बोर्ड संपादक-समाधान निमसरकार
6.माहितीचा अधिकार - व्ही.बी.पाटील
7.लोकसेवा हक्क अधिनियम 2015 - डॉ.शशिकांत अन्नदाते(चौथी आवृत्ती)
*आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान*
*आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान(परिक्षाभिमुख विवेचन व 20000 वस्तुनिष्ठ प्रश्न तयारी) - डॉ.शशिकांत अन्नदाते*
*बौद्धिक चाचणी*
*अंकगणित*- के'सागर/सचिन ढवळे/अजय चव्हाण/सतीश वसे/डॉ.आर एस अग्रवाल(कोणतेही 2)
*बुद्धिमत्ता* -के'सागर/अनिल अंकलगी/पंढरीनाथ राणे/डॉ.आर एस अग्रवाल (कोणतेही दोन)
*English*
K'Sagar/बाळासाहेब शिंदे/सुरेश वेळापूरे/WREN & MARTIN (कोणतेही दोन)
*मराठी व्याकरण*
K'Sagar/ऍड. आशालता गुट्टे/बाळासाहेब शिंदे (कोणतेही दोन)
(कृपया सदर माहिती आरोग्य विभाग परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)
OPTOMETRY-SHARP VISION
Optometrist