आरोग्य विभागाची परीक्षा 28 फेब्रुवारीलाच होणार
खूप दिवसापासून चालू असलेल्या भरती प्रकियेमध्ये करोना मुळे खूप विलंब झाला होता आणि आता औरंगाबाद येथील मा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये विलंब होण्याचे संकेत जाणवत होते पण मा उच्च न्यायालयाने खूप विचारपूर्वक , अभ्यासपूर्ण, आनंददायी निर्णय दिला आणि सर्व विद्यार्थ्याला या निर्णयाचा खुप आनंद झाला.
आरोग्य विभागाच्या विविध 54 पदासाठी एकाच दिवशी दिनांक 28/02/2021 रोजी परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद येथील मा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये खूप गोंधळ चालू असताना आज दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी सुनावणी झाली सदरच्या सुनावणीमध्ये आरोग्य विभागाने शपथपत्र दाखल करून सदरील भरती प्रक्रियेमध्ये आधीच दोन वर्षे विलंब झाला आहे व सध्या covid-19 च्या अनुषंगाने भरती घेणे गरजेचे आहे व सदरील प्रकरणात फक्त बारा परीक्षार्थीने भरती रद्द करावी यासाठी न्यायालयात येत आहेत व शासनास जवळपास चार लाख परीक्षार्थी परीक्षेस बसलेले आहेत सदरील भरती थांबली तर चार लाख विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ शकते.
सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा परीक्षा घेणे शक्य नाही असा युक्तिवाद आरोग्य विभागाने सरकारी वकील व ऍड सतीश भेंडेकर विधी सल्लागार आरोग्य विभाग यांच्यामार्फत आज न्यायालयात केला आहे आरोग्य विभागाने दाखल केलेल्या शपथ पत्राच्या आधारे न्यायालयाने सदरील भरती प्रक्रियेस कोणतीही स्थगिती आदेश आज दिले नाही सदरील भरती प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे शासनाची बाजू सरकारी वकील ऍड प्रवीण पाटील व ऍड सतीश भेंडेकर यांनी भक्कमपणे मांडली आहे वयामुळे सर्व परीक्षार्थींनी करून वरिष्ठांकडून यांचं कौतुक होत आहे.
तर मित्रानो आता परीक्षा दि. 28/02/2021 रोजीच होणार