मोतीबिंदू काढण्याची शस्त्रक्रिया केल्यावर डोळ्यापुढे पडदा येणे स्वाभाविक आहे का ?

मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर डोळ्यापुढे पडदा येऊ शकतो याचे कारण असे की जेव्हा डोळ्यातील मोतीबिंदू काढला जातो आणि त्यानंतर डोळा धुतला जातो तरीही काही प्रमाणात का होईना काही मोतिबिंदूच्या पेशी डोळ्यात राहिल्या की त्या परत वाढायला लागतात आणि त्याचे जाळे तयार होऊन, डोळ्यासमोर पडदा तयार झाला असे वाटते.

यालाच आपण Posterior capsular Opacification असे म्हणतो.

यामध्ये रुग्णाला दिसायला कमी होते, डोळ्याला नंबर वाढतो

ज्या रुग्णांचे वय कमी आहे म्हणजे 40 पेक्ष्या कमी आहे त्यांच्यामध्ये पडदा तयार होण्याची प्रमाण जास्त असते. 

उपाय

यावरती उपाय म्हणजे लेझर मशीन द्वारे पडदा काढुन टाकणे , हा एक खुप सोपा आणि कमी वेळेत होणार उपाय आहे.

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying