What is ophthalmic officer ? नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणजे काय ?

नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणजे काय ?

What is ophthalmic officer ?


 नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणजे आरोग्य विभागाच्या अंधत्व नियंत्रण आणि दृष्टीक्षिणता कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेले पद याच पदाला नेत्रचिकित्सा अधिकारी ( OPHTHALMIC OFFICER ) असे म्हणतात.

What is ophthalmic officer ? नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणजे काय ?


पूर्वी या पदाला ophthalmic assistant असे संबोधिले जायचे परंतु शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना महाराष्ट यांच्या प्रयत्नाने जुने नाव बदलून नेत्रचिकित्सा अधिकारी असे नवीन नावाने या पडला ओळखले जात आहे , याला आपण इंग्लिश मध्ये  OPHTHALMIC OFFICER असे म्हणतो. 


नेत्रचिकित्सा अधिकारी (OPHTHALMIC OFFICER ) हे अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचा पाया समजला जातो याचे कारणही तसेच आहे यामध्ये प्रामुख्याने जे काही डोळ्याच्या आजाराचे रुग्ण असतात त्यांचा पहिला संपर्क नेत्रचिकित्सा अधिकारी याच्याशी येत असतो.

नेत्ररूग्णांना पाहिले उपचार हे नेटरचिकित्सा अधिकारी यांच्याकडूनच दिले जातात, काही वेळा रुग्णांना नेत्ररोग तज्ज्ञांची गरज भासते त्यावेळेस तसे रुग्ण जिल्ह्याला संदर्भित केले जातात.


नेत्रचिकित्सा अधिकारी यांचे काय काम असते ?

१. रुग्णांना चष्म्याचा नंबर काढून देने, 

२. मोतिबिंदूसाठी रुग्णाची तपासणी करणे ,

३. शालेय विदयार्थी यांची तपासणी करणे,

४. विविध नेत्रविकार विषयी जनजागृती करणे,

५. शास्त्रक्रिये दरम्यान डोळ्याला भूल देने,

६. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची पुनर्तपसनी करणे,

७. नेत्रदान घडवून आणणे तसेच नेत्रबुबुले संकलित करणे 

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying