मोतीबिंदू म्हणजे काय ?
वयोमानानुसार किंवा डोळ्याला काही जखम होऊन डोळ्यातील पारदर्शक असलेला लेन्स (crystalline lens ) अपारदर्शक होऊ लागतो आणि त्यामुळे दिसायला अंधुक होते त्यालाच आपण मोतीबिंदू होणे अस म्हणतो.
वायोमानानुसार होणाऱ्या मोतिबिंदूचे प्रमाण खूप जास्त असते हा मोतीबिंदू साधारणतः 50 वर्षापुढील व्यक्तीला होतो. या मध्ये रुग्णाला हळूहळू दिसायला अंधुक होते व शेवटी म्हणजे मोतीबिंदू पिकल्यानंतर (जास्त प्रमाणात वाढतो) दिसायला खूप अंधुक होते.
मोतिबिंदू कशामुळे होतो ?
मोतिबिंदू होण्याची कारण खालील प्रमाणे आहेत..
१. वायोमानानुसार होणारा मोतीबिंदू
२. डोळ्याला मार लागल्यामुळे होणारा मोतीबिंदू
3. जन्मताच लहान मुलांना असणारा मोतीबिंदू.
४. स्टिरॉइड्स चे औषधी खाल्ल्यामुळे होणार मोतीबिंदू.
मोतिबिंदूचे लक्षणं कोणती असतात ?
१. दूरचे दिसायला कमी असणे.
२. साधारणतः जवळचे चांगले दिसते.
३. उजेडाचा त्रास होतो (उजेडाभोवती चमकने )
मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर डोळ्याची काळजी कशी घ्यावी
उपाय
मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे.
मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे प्रकार
SICS - SMALL INCISION CATARACT SURGERY
MICS - MICRO INCISION CATARACT SURGERY
PHACO WITH FOLDABLE IOL
मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यावर डोळ्यात पडदा येणे
OPTOMETRY-SHARP VISION
Optometrist