दरवर्षी काचबिंदु बाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक काचबिंदू संघटनेतर्फे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येतो.
यावर्षी हा सप्ताह 7 ते 13 मार्च दरम्यान साजरा करण्यात येत आहे. मुख्यतः चाळीशी पार केलेले व्यक्तींना काचबिंदुचा धोका संभवतो याचे वेळेत निदान न झाल्यास उपचाराअभावी दृष्टी गमावण्याची वेळ येऊ शकते. मात्र, पूर्वनिदान झाले , वेळेत व नियमित औषधोपचार केले तर दृष्टीचे रक्षण करता येते.
दरवर्षी काचबिंदु बाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक काचबिंदू संघटनेतर्फे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येतो.काचबिंदूची लक्षणे लवकर आढळून येत नाहीत. मात्र, जेव्हा ती आढळून येतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे यास ‘सायलंट थीफ ऑफ व्हिजन’ असेही म्हणतात.डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणार्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी हळू-हळू अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात. जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व देखील येऊ शकते.काचबिंदुचे निदान करण्यासाठी इंट्राऑक्युलर प्रेशर’ तपासणे आवश्यक आहे.
हे 10 ते 21mmhg च्या दरम्यान असतो जर हा दाब अधिक असेल तर काचबिंदू होण्याची शक्यता असते. याशिवाय काचबिंदुचे निदान करण्यासाठी विविध तपासण्या देखील करण्यात येतात. त्यामध्ये ओसीटी, फिल्ड टेस्टिंग, ऑपॅथलमोस्कोपी टेस्ट, फंडस फोटोग्राफी आदी चाचण्या असतात.यावर्षीची काचबिंदु सप्ताहाची संकल्पना एक आशा की लोक नियमीत नेत्रतपासणीने आपल्या सभोवतालचे जग कायम पाहू शकतील जे सौंदर्याने,मोहकतेने आणि साहसीपणाने परिपूर्ण आहे.म्हणून जग उज्ज्वल आहे, आपले दृष्टी वाचवा ही आहे.
काचबिंदुची लक्षणे
OPTOMETRY-SHARP VISION
Optometrist