ज्याला फक्त एका डोळ्याने दिसते अशा माणसाला वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी काय करावे लागेल?

ज्याला फक्त एका डोळ्याने दिसते अशा माणसाला वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी काय करावे लागेल?

ज्याला फक्त एका डोळ्याने दिसते अशा माणसाला वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी काय करावे लागेल?



होय आता ज्याला फक्त एका डोळ्याने चांगली दिसते त्यांनासुद्धा गाडी चालवण्याचा परवाना मिळू शकतो. सन 2016 पूर्वी ज्यांना एक डोळा आहे त्यांना गाडी चालवण्याचा परवाना मिळत नसे.

पण 2016 नंतरच्या तरतुदीनुसार वन साईड म्हणजे ज्या व्यक्तीला फक्त एका डोळ्याने चांगले दिसते त्यांना सुद्धा परवाना देण्याचे सरकारने ठरवले आहे त्यासाठी खालील गोष्टीची आवश्यकता आहे.

* त्या व्यक्तीच्या दुसऱ्या डोळ्याची नजर नॉर्मल असायला हवी. ती नजर स्नेलन चार्ट द्वारे तपासणी केली जाते त्यामध्ये रुग्णाची किंवा व्यक्तीची नजर सिक्स बाय सिक्स असायला हवी.

* त्या व्यक्तीची नजर म्हणजे पेरिफेरल विजन त्यालाच आपण आजूबाजूच्या दिसणे असे म्हणतो ती नजर नॉर्मल असायला हवी. आजूबाजूची महिला चेक करण्यासाठी त्या व्यक्तीला गोल्डमन पेरिमीटर नावाच्या मशीन वर तपासणी करावी लागेल व रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर त्यांना ड्रायव्हिंग लायसन चा परवाना मिळू शकतो.

* चांगल्या डोळ्याला कोणत्याही प्रकारचा आजार नसायला हवा जसा की तिरळेपणा, पापणी खाली पडणे, 

वरील सर्व तपासण्या सरकारी हॉस्पिटल मध्ये नेत्र नेत्ररोग विभागात नेत्रचिकित्सा अधिकारी यांनी आणि नेत्रशल्यचिकित्सा हे करत असत, त्यांचा रिपोर्ट घेऊन आरटीओ ऑफिस ला परवाना काढण्यासाठी जाऊ शकता.




 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying