मधुमेह आहाराविषयी महत्वाच्या सूचना | कोणते पदार्थ चालतील | कोणते पदार्थ चालणार नाही

मधुमेह आहाराविषयी महत्वाच्या सूचना | कोणते पदार्थ चालतील | कोणते पदार्थ चालणार  नाही

मधुमेह आहाराविषयी महत्वाच्या सूचना | कोणते पदार्थ चालतील | कोणते पदार्थ चालणार  नाही



मधुमेह म्हणजेच शुगर या आजारांमध्ये कोणता आहार घ्यावा व कोणता घेऊन या विषयी थोडक्यात माहिती देणार आहे.

तुम्हा सर्वांना माहीतच आहे शुगर आणि बीपी हे कॉमन झाले आहे चाळिशीनंतर प्रत्येकाने शुगर आणि बीपी ची तपासणी करून घ्यायला हवे. जितक्या लवकर तुम्हाला  समजेल की शुगर आहे त्यानुसार तुम्ही तुमचा आहार घ्यायला सुरुवात करतात पण पण जर तुम्हाला माहीतच नसेल तर त्या आजारांची आपण काहीही पथ्य पाळत नाही.  त्यामुळे आजार खूप जास्त प्रमाणात वाढते आणि नंतर कंट्रोल सुद्धा होत नाही.

 चाळिशीचा नंतर जवळपास खूप जणांना बीपी  आणि शुगरचा त्रास होतो त्यामुळे प्रत्येकाने चाळिशीनंतर बीपी आणि शुगर ची तपासणी नियमित करायला हवी.

मधुमेह आहाराविषयी महत्वाच्या सूचना

खालील पदार्थ चालतील


१. सलाड ,भाज्या ,कडधान्य यांचा आहारात दररोज समावेश करावा.

२. धान्य हे अखंड स्वरूपात वापरावे

३. भूक लागल्यावर फुटाणे लाह्या ताक फळे मुरमुरे ची भेळ सलाड खावे.

४. फळांमध्ये संत्री मोसंबी डाळिंब पपई सफरचंद पेरू कलिंगड जांभळ चालेल

५. गाईच्या दुधापासून बनलेले जसे की ताक चालेल.

६. भाज्यांमध्ये शेंगदाण्याच्या जागी कांदा किंवा टमाट्याचा पेस्ट वापरावा.

७. मांसाहार अंड्याचा पांढरा भाग चिकन किंवा मासे चालते.

खालील पदार्थ चालणार नाही


१. गोड साखर मध खाऊ नये

२. ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट, पाव, बटर, केक, खाऊ नये.

३. काजू, पिस्ता, खजूर खाऊ नये.

४. फळांमध्ये अंगूर, सीताफळ, रामफळ, ऊस, आंबा अननस चिकू केळी खाऊ नये.

५. मटण आणि अंड्याचा पिवळा भाग खाऊ नये.

६. लोणचे , पापड, खारा चिवडा, खारे बिस्कीट आणि फरसाण टाळावे

७. मैद्यापासून बनवलेलं पदार्थ खाऊ नये.

८. तळलेली पदार्थ खाणे टाळावे.

९. समोसा, कचोरी, वडापाव, भेळ, पाणीपुरी खाणे टाळावे.
 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying