ऑनलाइन शिकवणी दरम्यान आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
गेल्या वर्षभरा पासून कोरोना मुळे अनेक लोकं वेगवेगळ्या त्रासांनी ग्रस्त झालेले आहेत. त्यातही विदयार्थी, घरून ऑनलाइन काम करणारे यांना सतत मोबाईल किंवा कम्प्युटर वर काम करीत राहावे लागत असल्याने डोळ्यांना तर फारच त्रास होत आहे.
डोळे सगळ्यांच्याच जीवनाचा महत्वपूर्ण अवयव असल्याने त्याला जपणे फार गरजेचं असतं.
डोळा हा अत्यंत नाजूक व संवेदनशील भाग असल्यामुळे डोळ्या मध्ये जळजळ होणे, खाज येणे, आहे डोळ्याला कोरडेपणा होणे हे साधारणता खूप प्रमाणामध्ये आढळते.
वाढता संगणकाचा वापर आणि डिजिटल मीडियाच्या वापरामुळे डोळ्यावर ती खूप परिणाम होत असतात.
त्यासाठी खालील उपाय करावेत.
- दर अर्ध्या - पाऊण तासांनी डोळ्यांना आराम द्यावा.
- डोळ्यांना पाणी लावावे. हिरव्या झाडांकडे एक दोन मिनिट पहावे.
- मोबाईल किंवा कॉम्प्युटर च्या प्रकाशाचा डोळ्यावर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने बसावे. दिवसा हि गरज असेल तर ट्यूबलाइट च्या प्रकाशातच बसावे.
- Eyemist eye drop डोळ्यात टाकल्यास डोळ्यावर दुष्परिणाम होत नाही किंवा कोणताही आर्टिफिशियल टियर ड्रॉप टाका.
- संध्याकाळी किंवा रात्री क्लास असतील तर ट्यूबलाइट च्या प्रकाशातच बसावे.
- मोबाईल किंवा लॅपटॉप चे अंतर डोळ्यापासून अंदाजे 25 सेंटीमीटर च्या आसपास असावे.
- गरज नसताना स्क्रिन पाहणे टाळावे.
- संगणक किंवा मोबाईल वापरताना नेहमी कोटींग च्या चष्मा वापर करावा
- डोळ्यांच्या काळजी सोबत कानांची पण काळजी घ्यावी. खूपच कमी किंवा खूपच जास्त आवाजात ऐकू नये.