मोतीबिंदू म्हणजे काय आणि मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी कोणत्या तपासण्या कराव्या लागतात ?
मोतीबिंदू म्हणजे वयोमानानुसार किंवा काही मार लागल्यामुळे डोळ्यात असलेला पारदर्शक लेन्स अपारदर्शक होयाला लागतो आणि त्यामुळे दिसायला अंधुक होते त्यालाच आपण मोतीबिंदू झाला असे म्हणतो.
मोतीबिंदू या आजारांमध्ये रुग्णाची नजर हळूहळू कमी होते पण काही वेळेस जसे की मार लागल्यामुळे डोळ्यात असलेला लेन्स लगेच अपारदर्शक होतो आणि दिसायला लगेचं कमी होते.
मोतीबिंदूची सुरुवात साधारण पन्नास वय झाल्यानंतर होते काही वेळान रुग्णाला मधुमेहाचा त्रास असल्यास त्यांना लवकर मोतीबिंदू होतो किंवा काही मार लागल्यानंतर होतो.
मोतीबिंदू ची लक्षणे
मोतीबिंदू झालेल्या रुग्णाला दिसायला हळूहळू कमी होते व काही वेळा उजडा भोवती सर्कल दिसायला लागतात, प्रकाशाचा त्रास होतो, माणसांचे चेहरे ओळखायला त्रास होतो, जसा मोतीबिंदू वाढेल तस तसा दिसायला अंधुक होते.
मोतीबिंदू ची लक्षणे जाणवल्यास काय करावे ?
वरील लक्षणे जाणवल्यास लगेच सरकारी रुग्णालयातील नेत्रचिकित्सा अधिकारी त्यांचा सल्ला घ्यावा ते तुम्हाला डोळ्याची तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया ची गरज आहे की नाही याबद्दल मार्गदर्शन करतील.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया ची गरज नसल्यास ते तुम्हाला चष्म्याचा नंबर देतील आणि त्यामुळे तुम्हाला दिसायला आणखी स्पष्ट होईल आणि काही दिवस तुमचा त्रास कमी होईल.
जर तुमचा डोळ्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आला असेल असेल तर नेत्रचिकित्सा अधिकारी तुम्हाला शस्त्रक्रियेसाठी काही तपासणी करायला लावतील. तुमच्या सर्व तपासणीचा रिपोर्ट नॉर्मल असेल तर तुम्हाला शस्त्रक्रियेसाठी तारीख देतील.
मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी कोणत्या तपासण्या कराव्या लागतात ?
साधारण काय मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी मधुमेहाची तपासणी म्हणजे शुगर, हायपर टेन्शन, रक्तामधील हिमोग्लोबीन चे प्रमाण, एच आय व्ही टेस्ट, ईसीजी तपासणी आणि फिजिकल फिटनेस.
वरील सर्व तपासणीचा रिपोर्ट नॉर्मल आल्यास तुमची ऑपरेशन होऊ शकते.