रक्तक्षय टाळण्याचे उपाय निदान व उपचार
एच बी टेस्ट : स्त्रीच्या बोटातील रक्ताच्या थेंबा वर एच बी टेस्ट करून घ्या. एच बी 12 ग्रॅम किंवा अधिक असल्यास त्यांना ॲनिमिया नाही.
मात्र सदोष आहार आणि मासिक पाळी होणारा रक्तस्त्राव यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होत असते. यासाठी जननक्षम वयोगटातील महिलांनी आठवड्यातील एकदा प्रतिबंधात्मक लोह गोळीची आणि दर सहा महिन्यांनी जंतनाशक गोळी चे सेवन केल्याने एनिमिया टाळणे शक्य होते.
एच बी १२ किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या महिलांना ॲनिमिया टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा लोह गोळीचे सेवन करण्यास प्रवृत्त करावे. गेल्या सहा महिन्यात जंतनाशक गोळी घेतली नसल्यास तिचे सेवन करावे.
• 12 पेक्षा कमी एच बी स्त्रीला रक्तक्षय असल्याचे दर्शविते
• 8 ग्रॅमपेक्षा कमी एच बी तीव्र रक्तक्षय दर्शविते अशा गरोदर महिलांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला अधिक धोका असतो.
रक्तक्षय याची तीव्रता
चौथ्या राष्ट्रीय सर्वेनुसार आपल्याकडे जननक्षम वयोगटातील जवळ-जवळ 48 स्त्रियांना रक्तक्षय असल्याचे आढळले आहे.
रक्तक्षयाचे परिणाम
• थकवा , चक्कर, येणे काम करण्याची शक्ती कमी होते.
• स्मरणशक्ती कमी होते . त्यामुळे शिक्षणामध्ये कमी यश.
• रोगजंतू सी मुकाबला करण्याची शक्ती कमी. त्यामुळे वरचेवर जंतुसंसर्ग आणि आजारपण.
• रफिक से असताना गर्भधारणा झाल्यास मातेच्या आणि बाळाच्या आरोग्यावर हानी.
रक्तक्षय ची कारणे
• सदोष आहार: आहारामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे b12, फॉलिक ऍसिड त्यांची कमतरता या अन्नघटकांची रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यकता असते.
• जमत , कृमी
• रक्तस्त्राव: मासिक पाळी मध्ये किंवा अन्य प्रकारे
• हिवताप
• सदोष हिमोग्लोबीन: सिकल सेल एनीमिया
गर्भारपणात आणि बाळंतपणात रक्तक्षयाचे अनिष्ट परिणाम
घ्यावयाची काळजी
पुरेसा व समतोल आहार सुरू करावा. आहारात प्रथिने, दूध, दही, पालेभाज्या ,फळभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
आहारात आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा.
गर्भधारणेचा योग्य काळ बीएमआय 18.5 पेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी व हिमोग्लोबीन 12 आणि १२ ग्राम पेक्षा जास्त.
हे साध्य होईपर्यंत गर्भधारणा टाळावी. यासाठी परिचारिका कडून कुटुंबनियोजनाच्या साधनांची माहिती घ्यावी.
आपल्याला योग्य वाटेल अशा पद्धतीची आपणच निवड करावी आणि असाच सल्ला द्या व समुपदेशन करा. लोगो गोळ्यांचे सेवन करावे.
एनीमिया चे निदान व उपचार
गर्भधारणेपूर्वी ॲनिमिया बरा करून घेता येतो आणि सर्व धोके टाळता येतात.
सौम्य आणि मध्यम ऍनिमिया - एच बी बारा ग्रॅमपेक्षा कमी असलेल्या स्त्रियांनी प्रोजेक्ट लोहयुक्त गोळी घ्यावी. दर महिन्याला एन एम ची भेट घ्यावी. आरोग्य केंद्र मधून दिल्या जाणाऱ्या लोहा गोळी मध्ये ६० मिलिग्रॅम एलिमेंट लायन आणि ०.५ मिलिग्रॅम फॉलिक ऍसिड असते.
पुरेसा व समतोल आहार सुरू करावा. आहारात प्रथिने , दूध , दही , पालेभाज्या , फळभाज्या , फळे यांचा समावेश करावा.
लोहयुक्त गोळ्यांच्या सेवनास संबंधी महत्वाच्या सूचना
• लोहयुक्त गोळी जेवणानंतर दोन तासांनी घ्यावी
• लो गोळी घेतल्यानंतर लगेच चहा-कॉफी घेऊ नये
• क जीवनसत्व युक्त पदार्थ- फळांचा रस लिंबू शरबत घेतल्यास फायद्याचे असते.
• पोटात अस्वस्थ वाटणे बद्धकोष्टता असे परिणाम दिसले तरी गोळ्या बंद करू नयेत. खूपच त्रास होत असल्यास परिचारिकेची सांगावे.
• तीन महिन्यानंतर पुन्हा एचडी टेस्ट करून ते वाढले आहे का ते पाहावे.
गोळ्या घेऊन ये एच बी मध्ये अपेक्षित वाढ होत नसल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांची दाखवून पुढील तपासण्या व उपचार करून घ्यावेत. अशाने दर महिन्याला भेट देऊन गोळ्यांचे सेवन नियमित होते आहे की नाही हे पहावे. शिल्लक उरलेल्या गोळ्यांचा आढावा घ्यावा.
तीव्र एनिमिया - एच बी 8 ग्रॅमपेक्षा कमी असल्यास अशा स्त्रीला त्वरित प्रथम स्तर संदर्भ सेवा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात संदर्भित करावे. तेथील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी सांगितलेल्या सर्व तपासण्या व औषधोपचार करून घ्यावेत. वेळोवेळी एच बी तपासून ते वाढत असल्याची खातरजमा करावी.
एच बी वाढेपर्यंत गर्भधारणा होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी. यासाठी कुटुंबनियोजनाच्या पद्धतीचा वापर करावा.
मुख्य पान