गर्भधारणा पूर्व आरोग्य सेवांचा लाभ घेतल्यामुळे खालील गोष्टींचा गुंतागुंती आपण रोखू शकतो.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारे सन 2014 सली भारतीय नवजात अर्भक कृती योजना तिचे स्वरूप आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. टाळता येण्याजोगे सर्व अर्भक मृत्यू होऊन देण्यासाठी सर्व उपाय योजना करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
उद्दिष्टे
१. नवजात अर्भक मृत्यू दर, हजार जिवंत जन्मामागे दहापेक्षा कमी करणे.
२. उपजत मृत्यू दर , हजार जन्मामागे दहापेक्षा कमी करणे.
१. गर्भधारणेपूर्वी आणि प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा
२. प्रसुती मधील सेवा
३. जन्मानंतर अर्भकाची लगेच घ्यावयाची काळजी.
४. निरोगी अर्भकाची घ्यावयाची काळजी.
५. कमी वजनाच्या आणि आजारी यार बघा साठी आरोग्य सेवा.
६. नवजात अर्भकाच्या जीवित राहणे नंतरच आरोग्यसेवा.
यापैकी बहुतेक आरोग्यसेवा पण सध्या तिथेच आहोत गर्भधारणेपूर्वी जननक्षम स्त्रीला गर्भधारणा पूर्व आरोग्य सेवा देण्याची योजना नवीन आहे.
गर्भवतीला देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा मध्ये देखील नवीन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अधिक सेवा देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. यासाठी या सर्व सेवांची माहिती करून घेणे उपयुक्त ठरेल.
गर्भधारणा पूर्व आरोग्यसेवा कशासाठी:
आपल्याकडे बहुतेक स्त्रियांची गर्भधारणा नियोजन न करता झालेली आढळते.
लहान वयात मुलींची लग्न लग्नानंतर लगेचच गर्भधारणा यामधील मुलींच्या आरोग्यावर आणि तिच्या होणाऱ्या बाळावर अनिष्ट परिणाम होतात. हे धोके टाळण्यासाठी प्रत्येक गर्भधारणा ही नियोजीत असायला हवी.
गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी काही विशेष काळजी घेतल्याने बाळंतपणाची परिणती अधिक चांगली होती असे आढळले आहे.
अगदी लवकर गर्भ धरणाच्या तिसऱ्या महिन्यात जरी प्रकृतीची काळजी घ्यायला सुरुवात केली तरी तोपर्यंत बाळाच्या काही अवयवांची वाढ झालेली असते. वार्याची वाढदेखील बरीच झालेली असते. त्यामुळे गर्भामध्ये होणाऱ्या काही विकृती टाळण्यासाठी उशीर झालेला असू शकतो. शिवाय मातेचे आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या काही सेवा द्यायच्या राहून जातात म्हणून दिवस राहण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेऊन काही आवश्यक आरोग्यसेवा घेणे हिताचे ठरते.
गर्भधारणा पूर्व आरोग्य सेवांचा लाभ घेतल्यामुळे खालील गोष्टींचा गुंतागुंती आपण रोखू शकतो.
• गरोदरपणातील काही गुंतागुंती कमी करण्यास मदत होते.
• होणार्या बाळामध्ये वेंगी असल्याचे प्रमाण कमी करता येते.
• अपु-या दिवसांचे बाळंतपण कमी वजनाचे अशक बाळ जन्म अन्यायाचे प्रमाण कमी होते.
• बाळाला जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण कमी करता येते.
एकंदरीत मातांची आणि होणाऱ्या बाळांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे आपण मातामृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी करण्याचे आपल्या उद्दिष्टापर्यंत जलद पोहोचू शकतो.
यासाठी आपण प्रत्येक जन अक्षर जननक्षम महिलेला ती गर्भवती होण्यापूर्वी भेटून तिला दिवस राहण्यापूर्वी योग्य ती काळजी घेण्यासाठी प्रवृत्त करायला हवे.
सध्या आपण गाव आणि उपकेंद्र पात्र व पुढील गर्भधारणा पूर्व आरोग्य सेवा देण्याचे योजिले आहे.
१. गर्भधारणेपूर्वी बी एम आय नॉर्मल ठेवून सर्वसाधारण पोषण स्थिती येणे.
२. रक्तक्षय टाळण्याचे उपाय योजने त्याचे लवकर निदान उपचार घेऊन आणि जंतनाशक औषध घेऊन हिमोग्लोबिन सर्वसाधारण पातळीवर आणणे.
३. नियोजित गर्भधारणेपूर्वी तीन महिने फॉलिक ऍसिड या जीवनसत्त्वाचे सेवन को सुरू करून बालकांमधील मेंदूच्या व मज्जासंस्थेच्या विकृतीचे प्रमाण कमी करणे.
४. तंबाखू व दारू यांचे गरबा वरील दुष्परिणाम जाणून घेऊन त्यांचे सेवन पूर्णतः थांबवणे.
५. किशोर वयात गर्भधारणा टाळून त्यातील माता आणि अर्भकास असलेले धोके टाळणे.
६. जननसंस्थेच्या जंतुसंसर्गाची लक्षणे जाणून त्यावरील उपाययोजना यांचे गर्भधारणे वरील दुष्परिणाम टाळणे. एकंदर जननसंस्थेच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे.
७. गर्भधारणेपूर्वी एकदा वैद्यकीय तपासणी करून काही आजार असल्यास किंवा काही औषधे चालू असल्यास गर्भधारणेपूर्वी त्यासाठी आवश्यक उपाय योजना करणे.
हे साध्य करण्यासाठी गर्भधारणेचे नियोजन करण्याचे महत्त्व नवविवाहित स्त्रीला व गर्भधारणेसाठी इच्छुक असलेल्या स्त्रियांना आणि तिच्या कुटुंबीयांना पटवून देणे.