नेत्रदान विषयी माहिती | नेत्रदान पंधरवडा का साजरा केला जातो ?

नेत्रदान विषयी माहिती | नेत्रदान पंधरवडा का साजरा केला जातो ?

नेत्रदान विषयी माहिती | नेत्रदान पंधरवडा का साजरा केला जातो ?



दि 25 ऑगस्ट 8 सप्टेंबर नेत्रदान पंधरवाडा आपण साजरा करीत असतो. दानात दान जर कोणते असेल तर ते नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान माणूस जन्माला आला काही करण्याकरिता प्रत्येकीची ह्या पृथ्वीतलावर आपल्या हातून काही पुण्य कार्य घडावे आपल्या जीवनाचे सार्थक या असे म्हणुन जगत असतो.

माणूस श्रीमंत असो की गरीब प्रत्येकाला वाटत वाटत आपल्या देहाचा कर्मरूपी मार्गाने उपयोग व्हावा ही जुनीच चंदना परी दरवळावा असं महात्मे मिळवून देणारा मार्ग हा नेत्रदानाचा मार्ग आहे.

मरणोपरांत हा देह मातीमध्ये अग्निमध्ये विलिन होतो आणि ह्या देहाला सुद्धा परमेश्वराने दानाचे औचित्य साध्य करून दिले आहे अंधांना नेत्रदान करावी दृष्टी रुपी उरावे. व्यक्तीच्या नेत्रदान आतून आपण आज एक किंवा दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्रदान करू शकतो कितीतरी अंध व्यक्ती अंधारमय आयुष्य जगत आहे त्यांना प्रकाश मय करून आपण त्यांच्या डोळ्यांनी हे जग हा निसर्ग हे सौंदर्य पाहण्याची अनमोल कार्य करू शकतो.

आज भारतामध्ये अंध व्यक्तींची संख्या खूप आहे आणि ह्यामध्ये बुबुळाच्या आजाराने अंधत्व असलेले रुग्ण अंदाजे 30 लाख आहेत.खरंतर बुबुलचे आजार असलेले रुग्ण झिरो पॉईंट एक टक्के आहेत अशा अंध व्यक्तींना नेत्रदान करून त्यांच्या डोळ्यांना प्रकाशमय करून मरणोपरांत सुद्धा नेतृत्व करू शकतो चला तर या कार्यालयात आपणच सुरुवात करूया.

जगाच्या पाठीवर व शेजारी असा एक छोटासा देश आहे श्रीलंका की त्या देशांमधून मरणोपरांत नेत्रदान केलेले मुळे गरजूंना पुरविल्या जातात जणू त्यांनी हा संकल्प केलेला आहे मात्र आपला देश लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे पण प्रत्यक्षात नेत्रदानाचे प्रमाण झिरो पॉईंट पाच टक्के आहे याला कारण म्हणजे आपल्या मध्ये अंधश्रद्धा. आपण संकल्प करूया नेत्रदान करून दृष्टी प्रदान करूया.

आपल्या देशात बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की नेत्रदान केल्याने पुढचा जन्म अंध म्हणून येईल परंतु परमेश्वराने सुद्धा सांगितले आहे हे मानवा हा जन्म तुला कार्य करण्याकरिता दिला आहे यानंतर तुला फक्त मोक्ष प्राप्त करायचा आहे चांगलं क्रमाने आपल्या मानव जन्माचे सार्थक कर असा सुंदर उपदेश केला आहे. म्हणून आपल्या अज्ञानरूपी अंधाराला दूर करून आपल्या देहाला समाजाला दान करून आपल्या जन्माच सार्थक करावयाचे आहे.

नेत्रदान बाबत काही गैरसमज समाजामध्ये रूढ आहेत परंतु आपणाला ज्ञानृपी प्रकाशाने याला दूर सारायचा आहे नेत्रदान कोणत्याही व्यक्तीला करता येते यामध्ये लिंगभेदाचा वयाचे बंधन नाही काही आजार सोडले तर सामान्य माणसाला त्यांची बुबुळे चांगली आहेत अशा व्यक्तींना नेत्रदान करता येते.

आज आपल्या देशात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रदानाचे महान कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये आणि सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय व स्वयंसेवी सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून राबविला जात आहे.

नेत्रदान करायचे कसे व त्याबाबत सर्व माहिती प्रत्येक दवाखान्यांमध्ये आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून मिळवता येऊ शकते.

आपण ज्या समाजामध्ये ज्या देशांमध्ये राहतो त्या समाजाचे काही देणे आहे ही भावना आपल्या मनात ठेवून आपल्या कार्याला वाढवूया चला नेत्रदान करू या.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying