डोळयामध्ये कचरा, धातूचे कण किंवा कीटक गेल्यावर काय करावे ?

डोळयामध्ये कचरा, धातूचे कण किंवा कीटक गेल्यावर काय करावे ?

डोळयामध्ये कचरा, धातूचे कण किंवा कीटक गेल्यावर काय करावे ?


डोळयामध्ये कचरा, धातूचे कण, कीटक, इत्यादी जाणे ही वारंवार आढळणारी तक्रार आहे. धान्याचे तूस, झाडाच्या फांद्या, काटे, गाईगुरांचे शेपूट, शिंग, इत्यादींमुळे डोळयांना जखमा होण्याच्या घटना ग्रामीण भागात नेहमी आढळतात. कामगारांना डोळयात कचरा, कण जाण्याचा प्रकार वारंवार आढळतो. यावर प्रतिबंध म्हणून गॉगल लावायला पाहिजे. 

अशा वेळी नीट तपासणी करून बुबुळाची जखम शोधा. वाहन चालवताना गॉगल/ चष्मा न घालणे हे ही याचे एक नेहमीचे कारण आहे. त्यामुळे डोळा लाल होणे, पाणी सुटणे, वेदना, इत्यादी त्रास होतो. पण डोळे येण्याच्या सुरुवातीसही डोळयात काही तरी गेल्याची भावना होत असते.

तपासणीत डोळा पूर्ण उघडून व बुबुळाच्या बाजूच्या पांढ-या भागावर पापण्यांच्या आतल्या बाजूस नीट तपासणी करावी. दिसत असेल तर कण, कचरा, इत्यादी ओल्या कापसाच्या बोळयाच्या टोकाने काढून टाकावा. 

यानंतर डोळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायला सांगावे. याबरोबरच बुबुळाची काळजीपूर्वक आणि सावकाश तपासणी करणे आवश्यक आहे.

यामध्ये नेत्रचिकित्सा अधिकारी यांचा किंवा नेत्रशल्यचिकित्सक यांचा सल्ला घ्यावा.


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying