आळशी डोळा म्हणजे काय | डोळा आळशी कशामुळे होतो | आळशी डोळयावर उपचार काय करावा ?

 आळशी डोळा म्हणजे काय ?

आळशी डोळा म्हणजे काय ?


डोळयात काही विकार नसताना आणि नंबर चष्मा देऊन दुरूस्त केला तरी डोळयाची नजर कमी होणे म्हणजेच ‘आळशी डोळा’. 

डोळा आळशी कशामुळे होतो ?

  • तिरळेपणा
  • दोन डोळयातील चष्म्याच्या नंबरमधील तफावत.
  • जन्मजात मोतीबिंदू
  • पापणी पडणे

आळशी डोळा हा विकार बालपणीच होतो. लहान मुलांमध्ये दृष्टी तयार होण्याची प्रक्रिया नऊ वर्षापर्यंत होते. 

जेवढे वय लहान तेवढाच हा विकार होण्याचा संभव जास्त असतो.

डोळा आळशी का होतो ?

जेव्हा दोन डोळयांमधील चष्म्याच्या नंबरमध्ये तफावत असते तेव्हा जास्त नंबर असलेल्या डोळयाकडून अस्पष्ट प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते. तिरळेपणामध्ये एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळया प्रतिमा दोन्ही डोळयांकडून मेंदूस पाठविल्या जातात.

 त्यामधील तिरळा असलेल्या डोळयाकडून येणारी प्रतिमा ही आपोआपच दुर्लक्षित होते व तिरळा असणारा डोळा आळशी होतो. ही अस्पष्ट प्रतिमा मेंदू दुर्लक्षित करतो त्यामुळे त्या डोळयाची दृष्टी कमी होते व डोळा आळशी बनतो.

त्वरित उपचार न केल्यास हा रोग, कायमचा जडतो व नंतर कोणतीही उपाययोजना करून दृष्टी परत मिळवता येत नाही.
या विकारावर उपचाराचे चांगले परिणाम मिळण्यासाठी रुग्णाचा व रुग्णाच्या नातेवाईकांचा योग्य प्रतिसाद आवश्यक असतो.

आळशी डोळयावर उपचार काय करावा ?


लवकर निदान झाल्यास व लवकर उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो.

  • आळशी डोळा या विकारावरील सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे रुग्णाकडून त्याच्या आळशी डोळयाकडूनच काम करून घेणे आवश्यक असते. चांगली दृष्टी परत मिळविण्यासाठी सामान्य (काम करणारा) डोळा पट्टी लावून झाकणे (पॅचींग) व आळशी डोळयाकडून काम करून घेणे.

  • रुग्णांस दृष्टीदोष असल्यास योग्य नंबरचा चष्मा देणे.

  • आळशी डोळा व तिरळेपणा एकत्र असल्यास शस्त्रक्रिया केली जाते.

  • सामान्य डोळयास पट्टी लावून ठेवण्याच्या प्रक्रियेस ‘डोळाबंद’ असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या वयोमानानुसार व विकाराच्या तीव्रतेनुसार काही तास किंवा काही दिवसांसाठी केली जाते.

  • पट्टी लावणा-या (पॅचिंग केलेल्या) रुग्णांचा, पाठपुरावा हा नेत्रतज्ज्ञांकडून ठरावीक कालावधी नंतर होणे गरजेचे असते.

  • पट्टी लावून ठेवण्याच्या (पॅचिंगच्या) प्रक्रियेस सुरुवातीला मुलं प्रतिसाद देत नाहीत परंतु दृष्टीत सुधारणा होत राहिल्याने या प्रक्रियेचा स्वीकारही वाढत जातो.

  • लहान मुलांमध्ये सुरुवातीस थोडा काळच पॅचिंग केले जाते. नंतर चांगल्या परिणामांसाठी त्याचा कालावधी हळूहळू वाढवला जातो.

  • पॅच हा डोळयावर चेह-यालाच लावला जातो.

  • चष्मा वापरणा-या रुग्णांमध्येही हा पॅच चष्म्याला न लावता डोळयावरच लावला जातो.


 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying