गर्भधारणेपूर्वी बी एम आय नॉर्मल ठेवून सर्वसाधारण पोषण स्थितीत येणे
बॉडी मास इंडेक्स ( बी एम आय )
उंची मोजणे वजन घ्या दिलेल्या तक्त्यानुसार बॉडी मास इंडेक्स म्हणजे शारीरिक वस्तुमान निर्देशांक व काढा. एखाद्या व्यक्तीची उंची मीटर मध्ये आणि वजन किलोग्राम मध्ये मोजून खालील प्रमाणे आपल्याला बीएमआय काढता येतो
बी एम आय काढल्यानंतर व्यक्तीची पोषण स्थिती दर्शनाला निर्देशांक आपल्याला मिळतो त्यानुसार व्यक्ती ची गणना पुढीलपैकी एका गटात होत असते.
• कुपोषित व्यक्ती: बी एम आय 18.5
• सर्वसाधारण पोषण: बी एम आय 18.5 ते 22.9
• वजन जास्त. : बी एम आय 23 ते 24.9
• लठ्ठपणा. : बी एम आय 25 पेक्षा जास्त
त्यांचा बीएमआय 18.5 पेक्षा कमी किंवा पंचवीस इतका किंवा त्यापेक्षा जास्त आहे का हे पहा.
बीएमआय कमी असणे हे कुपोषित असल्याचे दर्शविते.
गर्भ राहण्यापूर्वी बी एम आय 18.5 पेक्षा कमी असल्यास दिवस राहिल्या नंतर होणारे बाळ अपुऱ्या दिवसाचे कमी वजनाचे अशक्त असण्याची शक्यता अधिक असते.
यासाठी आहाराचे प्रमाण वाढवून दर महिन्याला वजन करून बीएमआय वाढवणे हिताचे असते.
लठ्ठपणाचे परिणाम
• लठ्ठ स्त्रियांना गरोदरपणी रक्तदाब वाढण्याची आणि मधुमेह होण्याची अधिक शक्यता असते
• प्रसूती अवघड होण्याची शक्यता असते
• गर्भामध्ये विकृती होण्याची आणि व्यंग असलेल्या बाळाचा जन्म होऊ शकतो
• मुदतपूर्व प्रसूती, प्रसुती मधील गुंतागुंती यामुळे नवजात अर्भकाच्या जीवाला धोका असतो.
यासाठी जास्त बी एम आय असणाऱ्या स्त्रियांना दर महिन्याला वजन करून बी एम आय सर्वसाधारण पातळीत आणण्यासाठी समुपदेशन करावे.
तसेच एकदा वैद्यकीय तपासणी करून मधुमेह हायपोथायरॉईडीझम किंवा इतर आजार माहित नाही हे पाहण्यास प्रवृत्त करावे.
मुख्यपृष्ठ बघा