नेत्रदान म्हणजे काय | नेत्रदान कोण करू शकतो ?
डोळ्यामध्ये टिक पडून किंवा फूल पडून बुबुळ (Corneal opacity ) निकामी झाले तर त्यावर खरा एकच उपाय म्हणजे निरोगी बुबुळ बसवणे (Corneal transplant ).
यासाठी जुने रोगट बुबुळ काढून टाकतात व त्या जागी निरोगी (मृत्यूनंतर काढून घेऊन) बुबुळ (Cornea ) कलम करतात. ही शस्त्रक्रिया सोपी आहे. पण पुरेसे लोक नेत्रदान करण्यासाठी पुढे यायला हवेत.
आपण नेत्रदानाबद्दल नेत्रपेढीला कळवले, की ते संमतीपत्र भरून घेतात. मृत्यूनंतर नेत्रपेटीला (लगेच) निरोप पाठवला, की मृत व्यक्तीचे डोळे काढून सुरक्षित ठेवतात व पापण्या शिवून टाकतात. यामुळे मृतदेह कुरूप दिसत नाही.
मात्र मृत्यूनंतर सहा तासांत हे काम होणे आवश्यक आहे. तोपर्यंत डोळयांवर थंड ओला बोळा ठेवावा. पाळी येईल तसे शस्त्रक्रियेसाठी 2 अंध व्यक्तींना बोलावले जाते. रुग्णाचे आतले नेत्रपटल खराब झाले असेल तर मात्र या शस्त्रक्रियेचा उपयोग होणार नाही. नेत्रदान हे अत्यंत साधे पण महत्त्वाचे मानवतावादी कर्तव्य आहे.