तिरळेपणा म्हणजे काय | तिरळेपणा ची लक्षणे कोणती | कारणे आणि उपाय कोणते

तिरळेपणा म्हणजे काय ?


तिरळेपणा म्हणजे काय | तिरळेपणा ची लक्षणे कोणती | कारणे आणि उपाय कोणते


दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास ‘तिरळेपणा’ म्हणतात. तिरळेपणाबद्दल कमी माहिती असल्याने व अंधविश्वासामुळे मुलाच्या आयुष्याला कायमचे गालबोट लागते.

  • तिरळेपणावर वेळीच उपचार केल्यास, दृष्टीहीनता व तिरळेपणा दोन्हीवरही मात करता येऊ शकते.

  • जसजसे मुलाचे वय वाढत जाते तसतसे तिरळेपणावर उपचार करून दृष्टी परत मिळवणे अवघड होत जाते.
  • हा तिरळेपणा काही मुलांमध्ये कायमचा असतो तर काहींमध्ये तो मध्येच उद्भवणारा असू शकतो.

  • हा दोष आतील, बाहेरील, वरील किंवा खालील कोणत्याही दिशेत असू शकतो.

  • तिरळेपणावर वेळीच उपचार झाला नाही तर डोळा आळशी होण्याची स्थिती निर्माण होते. ही स्थिती दृष्टीहीनतेस कारणीभूत ठरू शकते.

तिरळेपणाची कारण


  • आनुवंशिकता
  • असंतुलित स्नायुशक्ती व डोळयास होणारा कमी रक्तपुरवठा.
  • मोतीबिंदुमुळे निर्माण होणारी पुसट प्रतिमा, बुबुळावरील व्रण, आंतरपटलाचे रोग, दृष्टीदोष, डोळयात गाठ असणे, इ.

तिरळेपणाची लक्षणे


  • एक डोळा किंवा दोन्ही डोळे वेगवेगळया दिशेने पाहणे.
  • एका किंवा दोन्ही डोळयांमध्ये दृष्टीदोष
  • तीव्र सूर्यप्रकाशात तिरळेपणा असणारी मुले डोळा मिटून घेतात.
  • काही मुले चेहरा किंवा डोके एका ठरावीक दिशेत वाकवून वस्तुकडे बघण्याचा प्रयत्न करतात.
  • दोन प्रतिमा दिसतात

कायमची दृष्टीहीनता येऊ नये यासाठी केले जाणारे उपचार

  • दृष्टीदोषामुळे आलेला तिरळेपणा हा ठरावीक चष्म्याचा नंबर लावून घालवता येतो.
  • सामान्य डोळयास पट्टी (पॅच) लावून आळशी झालेल्या डोळयाची नजर वाढवता येते.

शस्त्रक्रिया

  • समांतर कक्षात नसलेले डोळे शस्त्रक्रियेने योग्य दिशेत आणले जातात.
  • शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन किंवा फक्त डोळयांस भूल देऊन केली जाते.
  • शस्त्रक्रिया होणा-या मुलास सर्दी, ताप, खोकला, इ. सारखा आजार नसावा.
  • शस्त्रक्रिया डोळयाच्या पांढ-या भागात केली जाते.
  • शस्त्रक्रियेनंतर एखादाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
  • जरी शस्त्रक्रिया झाली असेल तरीही चष्मा वापरणे बंधनकारक आहे.

बालवयातला तिरळेपणा एकतर जन्मजात असतो किंवा दृष्टीदोषामुळे तयार झालेला असतो. तिरळेपणा आढळला तर लवकरात लवकर नेत्रतज्ज्ञास दाखवणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेने तिरळेपणावर उपाय करता येतो. दृष्टीदोष असल्यास त्यावरही उपाय करावे लागतात.



 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying