प्रजनन संस्थेचे जंतुसंसर्ग टाळणे
स्त्रियांच्या प्रजनन संस्थेतील अवयवांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते यांना प्रजनन संस्थेची जंतुसंसर्ग अशी म्हणतात.
जंतुसंसर्गाची कारणे
• मासिक पाळी मध्ये अस्वच्छतेच्या काळजी चा अभाव
• असुरक्षित पद्धतीने केलेला गर्भपात
• स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे यांना पाळता केलेली प्रसूती
• असुरक्षित लैंगिक संबंध
काही जंतुसंसर्ग संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला लैंगिक संबंधांमधून होतो अशा संसर्ग ना एस टी आय असे म्हणतात.
एचआयव्ही संक्रमणाचा प्रमुख मार्ग असुरक्षित लैंगिक संबंध हाच असतो.
अशा प्रकारचे जंतुसंसर्ग स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतात. मात्र स्त्रियांना अशी जंतुसंसर्ग झाल्यास त्यांच्याकडून गरोदरपणामध्ये हे संसर्ग त्यांच्या गर्भाला तसेच नवजात अर्भकाला देखील होऊ शकतात.
संसर्गाची लक्षणे
• योनीतून दुर्गंधीयुक्त, स्त्राव युनी मुकास खाज , येणे लघवी जळजळ
• ओटीपोटात वेदना
• गुप्त अंगावर पुरळ, मोड, जखम होणे
• जांघेत गाठ
गर्भावरील दुष्परिणामवरील दुष्परिणाम
• गरोदर पणात हे जंतू संसर्ग झाल्यास त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते.
• अकाळी बाळा भोवतीचे पाणी वाहून जाऊन लागल्याची शक्यता असते.
• काही संसर्गामुळे गर्भाचा गर्भाशयात मृत्यू होऊन उपजत मृत्यू बालकाचा जन्म होऊ शकतो.
• वारंवार गर्भपात होऊ शकतो.
• काही संस्कारामुळे बाळाच्या डोक्याला जंतुसंसर्ग होतो. डोळे चिकटतात वेळीच औषधोपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते.
• एचआयव्ही पॉझिटिव्ह मातेकडून एचआयव्ही संसर्ग तिच्या बाळाला होऊ शकतो.
• जननेंद्रिय वरील नागिन प्रसूतीमध्ये बाळाकडे संक्रमित व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
हे टाळण्यासाठी काय करावे.
सर्व किशोरवयीन मुला-मुलींना आणि गर्भवती मातांना सुरक्षित लैंगिक संबंधाविषयी जागृत करायला हवे. कंडोम चा योग्य वापर याविषयी माहिती द्यावी.
लैंगिक संबंधातून पसरणारे प्रजनन संस्थेच्या जंतुसंसर्गाचे लक्षणा विषयी माहिती देऊन अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी व औषधोपचार घ्यायला मदत करावी.
रक्तनमुने वरील एचआयव्ही आणि व्ही डी आर एल चाचणी करून संसर्ग वरील उपचार घेणे महत्त्वाचे असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा संवर्ग वरील औषधे मोफत दिली जातात. लैंगिक संबंधातून पसरणारे बरेच संसर्ग औषधोपचाराने पूर्णपणे बरे होऊ शकतात. योग्य उपचारानंतर गर्भधारणा राहू देऊन बाळाला असलेल्या संक्रमणाचा धोका खूपच कमी करता येतो.
औषधोपचार पूर्णपणे घेण्याचे महत्त्व जोडीदाराची तपासणी व उपचार यांचे महत्त्व कंडोम च्या वापराचे महत्व समजावून सांगावे. लैंगिक संबंधातून पसरणारे बरेच संसर्ग औषधोपचाराने पूर्णपणे बरे होऊ शकतात.
एचआयव्ही संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक पाचारण अत्यंत महत्त्वाचे.
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी संवाद साधून प्रजनन संस्थेची संबंधित जंतुसंसर्ग व ते टाळण्याचे उपाय याविषयी गटचर्चा व वैयक्तिक समुपदेशन घडवून आणणे महत्त्वाचे आहे.