मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर काय करावे व काय करू नये
सरकारी हॉस्पिटल मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक दिवस तुम्हाला रुग्णालयात भरती ठेवतात आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दोन तीन तासांमध्ये लगेच तुम्ही घरी जाऊ शकता.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले रुग्णांनी खालील बाबीचा विचार करावा व त्या अमलात आणाव्यात.
* काहीवेळा ऑपरेशन दरम्यान डोळ्यांमध्ये हवेचा बुडबुडा ठेवला जातो त्यामुळे रुग्णाला तीन ते चार दिवस दिसायला अंधुक असते त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण चार ते पाच दिवसानंतर दिसायला होऊन स्पष्ट होईल.
* काहीवेळा बुबुळावर सूज असल्यामुळे सुद्धा दिसायला अंधुक असते ते सुद्धा औषधाने कमी होऊन दोन तीन चार दिवसात स्पष्ट होईल.
* ऑपरेशन झालेल्या डोळ्याच्या बाजूने झोपायचे टाळावे सरळ झोपावे किंवा दुसऱ्या अंगावर झोपावे ज्या बाजूचे ऑपरेशन झाले नाही त्या बाजूने झोपले तरी चालेल.
* लहान मुलांना जवळ घेणे टाळावे. लहान मुलांचा हात लावू शकतो व डोळ्याची जखम उघडू शकते.
* धूळ धूर अशा ठिकाणी जाऊ नये.
* नेहमी नेहमी डोळ्याला खराब हात लावू नये.
* डोळ्याला खराब कपडा लावू नये,
* डोळा हाताने चोळू नये तसेच खराब हात लावू नये.
* शस्त्रक्रियेनंतर दिलेला काळा चष्मा नेहमी लावून ठेवावा.
* पायऱ्या चढू किंवा उतरू नये.
* जोराने खोकला करू नये.
* मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर कमीत कमी तीस दिवस डोक्यावर अंघोळ करू नये किंवा डोळ्याला पाणी लावू नये. अंघोळ खांद्याच्या खाली केली तरी चालेल.
* खाण्यामध्ये एकदम कडकं पदार्थ किंवा दाबून खाणाऱ्या वस्तू खाऊ नये जसे की वाटाणे, फुटाणे.
* ठसका लागेल असे काही खाऊ नये किंवा सर्दी किंवा खोकला लागेल असे काही खाऊ नये.
* जर तुम्हाला खोकला असेल तर त्याची औषध घेणे.
* जर कुणाला मधुमेह किंवा बीपी च्या गोळ्या चालू असतील तर त्यांनी त्यांच्या नियोजनानुसार घ्याव्यात.
* ड्रॉप टाकतेवेळी रुग्णाने स्वतः ड्रॉप टाकू नये. जो कोणी ड्रॉप टाकत असेल त्यांनी हात स्वच्छ धुतले पाहिजे व डोळ्याची खालची पापणी ओढून 1 थेंब टाकावा.
* नेत्रचिकित्सा अधिकारी किंवा नेत्रशल्यचिकित्सा यांनी सांगितल्या प्रमाणे प्रमाणे व्यवस्थित न विसरता टाकावा व गोळ्या घेतल्या पाहिजे.
* नेत्रचिकित्सा अधिकारी यांनी दिलेल्या तारखेला डोळ्याची तपासणी साठी यावे.
* साधारणतः 45 दिवसानंतर चष्म्याचा नंबर दिला जातो तोपर्यंत रुग्णाने नेहमी काळा चष्मा लावून ठेवावा.
* जर तुम्हाला काही त्रास असेल तर लवकरात लवकर नेत्रचिकित्सा अधिकारी यांना दाखवून ख्यावे.
* नवीन ड्रॉप घेण्यापूर्वी नेत्रचिकित्सा अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.
OPTOMETRY-SHARP VISION
Optometrist