आरोग्य विभाग भरती प्रक्रियेस तूर्तास स्थगिती
माहे मार्च 2019 च्या जाहिराती नुसार शासनाचे आरोग्य विभागाशी संबंधित गट भरतीस तूर्तास स्थगिती दिलेली आहे
मित्रांनो माहे मार्च 2019 च्या जाहिराती नुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडून त्याविषयीचे अपडेट मिळाले आहेत.
माहे मार्च 2019 च्या जाहिराती नुसार शासनाचे आरोग्य विभागाशी संबंधित गट भरती लवकरात लवकर भरण्याचे आदेश दिले होते आणि त्यासंबंधीची कारवाई सुद्धा चालू होती परंतु दिनांक 28 जून 2021 च्या शासन परिपत्रक नुसार पद भरतीस तूर्तास स्थगिती दिलेली आहे.
शासन परिपत्रकानुसार
कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेकडील गट क संवर्गातील माहे 2019 च्या जाहिराती नुसार आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत संदर्भात शासन निर्णय दिनांक 14 जून 2021 व शासन शुद्धिपत्रक दिनांक 22 जून 2021 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत त्यास अनुसरून परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी पत्रान्वये सूचना देण्यात आल्या होत्या.
सामान्य प्रशासन विभागाने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय दिनांक 23/ 12 /2020 रोजी निर्गमित केला आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 05/05/2021 रोजी झालेल्या सुनावणीत सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (एस ई बी सी) प्रवर्गाच्या आरक्षणा संदर्भातील कायदा रद्द केला आहे त्यामुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील जागा राखीव प्रवर्गातून रूपांतरित झाल्याने माहे 2019 च्या जाहिराती मधील खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणा मध्ये बदल होत आहे तसेच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या यांचे प्रमाण काही कालावधीसाठी 10 टक्के वरून 20 टक्के केल्यामुळे जिल्हा परिषदेने त्याप्रमाणे अनुकंपा भरती प्रक्रिया केल्यामुळे व अन्य कारणास्तव प्रवर्गनिहाय आणि समांतर आरक्षणा निहाय जागा मध्ये बदल होत आहे सदर बदलानुसार भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे यासाठी काही अधिकचा कालावधी लागणार आहे.
त्यामुळे दिनांक 14/06/2021 च्या शासन निर्णया सोबतच्या विवरणपत्र बी मधील नमूद वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद निहाय जाहीर प्रगटन दिव्यांगाच्या नव्याने समावेश प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांना दिनांक एक जुलै 2021 पासून रजिस्ट्रेशन करणे शक्य होणार नाही त्यामुळे दिनांक 14/06/2021 चा शासन निर्णयातील विवरणपत्र बी मध्ये नमूद केल्या प्रमाणे वेळापत्रकानुसार परीक्षेचे अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही.
उपयुक्त वस्तुस्थिती विचारात घेता दिनांक 14/06/2021 चा शासन निर्णयातील विवरणपत्र बी मध्ये नमूद केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदा कडून जाहीर प्रकटन दिव्यांगाच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गासाठी व समांतर आरक्षण बदलल्यामुळे नव्याने वाढ झालेल्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे वेळापत्रकानुसार शक्य नसल्याने याबाबतची कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे शासन निर्णय सोबत विवरणपत्र बी मधील नमूद परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करून सुधारित वेळापत्रक शासन स्तरावर लवकरात कळविण्यात येईल.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
व्हिडिओ बघा
OPTOMETRY-SHARP VISION
Optometrist