3. गर्भवतीला ऍनिमिया ( रक्तक्षय )

हिमोग्लोबीन तपासणी :


गरोदर स्त्रीचे पहिल्या भेटीत हिमोग्लोबीन तपासले जावे. गरोदरपणात किमान ४ वेळा हिमोग्लोबीनसाठी तपासणी करण्यात यावी. सदरची तपासणी नोंदणीच्या वेळी, २० ते २४ आठवडे, २६ ते ३० आठवडे, ३०. ते ३४ आठवडे या दरम्यान करण्यात यावी.

गर्भवती स्त्रीचे हिमोग्लोबीन किमान ११ ग्रॅम इतके असायला हवे. गर्भाची वाढ होत असताना गर्भवतीला प्रथिने, लोह, जीवनसत्वे यांची अधिक आवश्यकता असते. यासाठी तिचा आहार अधिक असावा लागतो आणि तो समतोल व परिपूर्ण असावा लागतो. आहारातून मिळणारे लोहतत्व पुरेसे नसते. यासाठी लोहगोळयांचे सेवन करणे आवश्यक असते.

• हिमोग्लोबीन ११ ग्रॅम किंवा अधिक असल्यास गर्भवतीने रोज एक लोहगोळी घ्यावी. (आय.एफ.ए) प्रसुती पर्यंत १८० गोळ्या आणि प्रसूतीनंतर सहा महिने लोहगोळया घ्याव्यात

 • एचबी ११ ग्रॅम पेक्षा कमी असल्यास रोज दोन लोह गोळयांचे सेवन करावे आणि दर महिन्यास एचबी तपासून ते बाढत असल्याची खात्री करावी. एच बी ११ ग्रॅम झाल्यानंतर रोज एक लोहगोळी घेत रहावी.

• दुसऱ्या तिमाहीमध्ये गर्भवतीने जंतनाशक औषधाची एक गोळी घ्यावी. (Albendazole Tablet)

लोहयुक्त (IFA) गोळ्यांच्या सेवनासंबंधी सूचना :


लोहयुक्त गोळी जेवणानंतर दोन तासांनी घ्यावी.

लोहगोळी घेतल्यानंतर लगेच चहा, कॉफी घेऊ नये.

लोहगोळी आणि कॅल्शिअमची गोळी एकाच वेळी घेऊ नये.

क जीवनसत्वयुक्त पदार्थ फळांचा रस, लिंबू सरबत इ. घेणे फायद्याचे असते.

पोटात अस्वस्थ वाटणे, बध्दकोष्ठता असे परिणाम दिसले तरी गोळ्या बंद करून नयेत. खूपच त्रास होत असल्यास परिचारिकेस सांगावे लोहामुळे बाळाच्या मेंदुच्या वाढीस मदत होते.

एक महिन्याने पुन्हा एच.बी. करुन ते वाढत असल्याची खात्री करावी. 

आशाने दर महिन्याला भेट देऊन गोळ्यांचे सेवन नियमित होते आहे की नाही ते पहावे. गर्भवतीकडे शिल्लक उरलेल्या गोळयाचा आढावा घ्यावा.

• बाळाचे वजन खूप वाढून प्रसूतीत अडथळा निर्माण होण्याची भीती अनाठायी आहे.

तीव्र रक्तक्षय (Severe Anemia) एचबी ७ ग्रॅमपेक्षा कमी असल्यास :


अनिष्ट परिणाम तीव्र, रक्तक्षयामुळे गर्भवती मातेच्या हृदयावर ताण येऊ शकतो. तिला बाळंतपणात होणाऱ्या रक्तस्त्राव सहन न होण्याची शक्यता असते. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्याने तिला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. या गुंतागुंतीमुळे गर्भवतीचा जीव धोक्यात येऊ शकतो. 

जन्माला येणारे बाळही कमी वजनाचे आणि अशक्त असण्याची शक्यता जास्त असते. या करीता रक्तक्षय टाळणे, त्यांचे लवकर निदान करून त्यावर उपचार करणे आवश्यक असते. 

गर्भवतीचे हिमोग्लोबीन ७ ग्रॅम पेक्षा कमी असेल तिला अनिमियाचे कारण ठरविण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रास संदर्भीत करावे.

अशा स्त्रीला शिरेतून लोहाची इंन्जेक्शन्स (शीरेतून आयर्न सुक्रोज) द्यावी लागू शकतात. 

ज्या गर्भवती तोंडाने लोहगोळ्या घेऊ शकत नसतील किंवा ज्यांना त्या सहन होत नसतील अशाना देखील ही इन्जेक्शन्स दिली जातात.

अशा स्त्रियांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार करावेत.

  • तीव्र अनिमियामध्ये इन्जेक्शनचे उपचार सुरक्षित असतात.
  • या उपचारामुळे शरीरातील लोहाचा साठा लवकर भरून येण्यास मदत होते. 
  • सामान्यतः चार इंजेक्शन्स द्यावी लागतात. .

रक्तक्षय असलेल्या सर्व महिलांना आहारामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, जीवनसत्व सुक्ष्म जसे लोह घेण्याबाबत समुपदेशन करावे.

अति तीव्र अनिमिया (हिमोग्लोबीन ५ ग्रॅम पेक्षा कमी) आणि बाळंतपण जवळ आलेले अशा परिस्थितीत रक्तसंक्रमण ही आवश्यक ठरते. यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये संदर्भात करावे. मातेच्या जीवास असलेला धोका कमी करण्यासाठी गर्भवतीचा नववा महिना सुरु होईपर्यंत रक्तातील हिमोग्लोबीन वाढवणे महत्वाचे असते.

प्रिएक्लाम्पशियाचा धोका कमी करण्यासाठी कॅल्शियम गोळ्या


आहारामध्ये कॅल्शिअमची कमतरता असलेल्या गर्भवतींना गरोदरपणी रक्तदाब वाढण्याचा अधिक धोका असल्याचे आढळले आहे. कॅल्शिअमच्या औषधी गोळ्या घेऊन हा धोका कमी करता येतो. बळकटीसाठी देखील कॅल्शियम आवश्यक असते.

यासाठी प्रत्येक गर्भवती स्त्रीला एएनएम ने आहारामध्ये अधिक कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा समावेश करण्यास सांगावे. (दूध, दही, अडी, नाचणी, हिरव्या पालेभाज्या, इ.) शिवाय सर्व गर्भवतीना कशियम कार्बोनेट ५०० मि.ग्रॅम + जीवनसत्व डी३, २५० युनिट्स (BY) असलेल्या गोळया रोज सकाळी एक व रात्री एक जेवणाच्या वेळेस घ्यायला सांगाव्यात.

गरोदरपणात एकदर ३६० गोळयाचे सेवन करण्याचे फायदे समजावून सांगावेत. तसेच प्रसूतीनंतर देखील स्तनपानाच्या काळात सहा महिने या गोळया घेण्याचे फायदे समजावून सांगावेत. लोहगोळी आणि कॅल्शिअम गोळी एकाच वेळी न घेण्याबद्दल सांगावे.
Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying