तुमच्या मुलाला उत्तम नागरिक बनवा
पाच वर्ष पूर्ण होऊन सहाव्या वर्षामध्ये मुलांनी पदार्पण केलं, की त्यानंतर त्यांच्या मेंदूला critical faculty येते. काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हा अधिकार त्यांना प्राप्त होतो आणि त्यानंतरही आपलं व्यक्तिमत्त्व Programme होत राहतं. खरं म्हणजे हे व्यक्तिमत्त्व पुढच्या काळामध्ये सुद्धा Programme होतं. काही नकारात्मक, भयप्रद, दुःखद गोष्टी घडतात. त्यातून आपलं mind 'negatively Programme' होतं. एवढंच नव्हे, तर सातत्याने आपण जो विचार करत असतो त्यातूनही आपलं, जन्माला आलेल्या क्षणापासून आजच्या क्षणापर्यंत जे जे आपल्या mind मध्ये Programme झालेलं आहे, ते म्हणजेच आपलं संपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. या व्यक्तिमत्त्वा-मधूनच आपल्यापैकी प्रत्येकाची action घडत असते. प्रत्येकाचं Behaviour - वर्तणूक निर्माण होत असते; आणि एवढंच नव्हे, तर आपले अनुभव स्वीकारण्याची प्रक्रिया निर्माण होत असते, स्वभाव निर्माण होत असतात.
आणि म्हणून तुमच्या-माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार घडतं. म्हणूनच, एकाच प्रसंगामध्ये माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं वागतात. कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगवेगळं असतं. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया पहिल्या पाच ते बारा वर्षापर्यंत घातला जाऊ शकतो आणि म्हणूनच या काळामधले संस्कार अत्यंत मौल्यवान मानले जातात.
आई-बाप हे बह्मदेव नाहीत. आपल्या मुलांना पाहिजे तसं घडवण्याचा अधिकार त्यांना नाही. हे जरी एका बाजूने सत्य असलं, तरी दुसऱ्या बाजूने मात्र मुलांना उत्तम पद्धतीनं फुलता येईल, उत्तम पद्धतीनं खुलता येईल, ते स्वावलंबी पद्धतीनं वाढतील, त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होईल; या पद्धतीचं एक सुंदर आणि विधायक वातावरण निर्माण करून देण्याचं सामर्थ्य आई-बापांमध्ये आहे. परिसरामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये आहे. याचं भान आपण उत्तम पद्धतीनं जपलं पाहिजे आणि हे संपूर्ण positive वातावरण, एक विधायक वातावरण मुलांकरता निर्माण करून दिलं पाहिजे. तरच त्यातून उत्तम, स्वावलंबी आणि आनंदी नागरिक निर्माण होतील.
बालसंगोपन कसे करावे ?
बालसंगोपन १: जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी
बालसंगोपन 2: आपलं व्यक्तिमत्त्व अनुवंशिकतेवर किती प्रमाणात अवलंबून असतं ?
बालसंगोपन 3 : व्यक्तिमत्त्वाचा पाया : पहिल्या पाच वर्षांत
बालसंगोपन 4 : बालपणी केलेल्या संस्कारांचे अनपेक्षित दुष्परिणाम
बालसंगोपन 5: बालसंगोपनाचे नियम
बालसंगोपन 6 : तुमच्या मुलाला उत्तम नागरिक बनवा
OPTOMETRY-SHARP VISION
Optometrist