बालसंगोपन 2: आपलं व्यक्तिमत्त्व अनुवंशिकतेवर किती प्रमाणात अवलंबून असतं ?

आपलं व्यक्तिमत्त्व अनुवंशिकतेवर किती प्रमाणात अवलंबून असतं?

बालसंगोपन 2: आपलं व्यक्तिमत्त्व अनुवंशिकतेवर किती प्रमाणात अवलंबून असतं ?


स्त्रीचं अंडबीज आणि पुरुषाचा शुक्रजंतू एकत्र येतो. साधारणतः आईच्या गर्भाशयामध्ये हे दोन्हीही एकत्र आल्यानंतर बिजाचं फलन होतं. फलन झाल्यानंतर मुलाची वाढ व्हायला लागते. सातच्या महिन्याच्या शवेटपर्यंत मेंदूची पूर्णत: वाढ झालेली असते आणि त्यानंतर मुलालचा केव्हाही जन्म होऊ शकतो. 

आता काही मुलं बिचारी एवढ्या घाईत असतात, की ती आठव्या महिन्यात जन्माला येतात. काही मुलं एवढी झोपाळू असतात, की ती आरामात दहा महिन्यांनंतरसुद्धा जन्माला येतात; पण साधारणत: मेंदूची पुरेशी वाढ झाल्यानंतर मूल केव्हाही जन्माला आलं तरी ते निकोप अवस्थेमध्ये जन्माला येऊ शकतं.


आता हे मूल जन्माला येतं, आईच्या गर्भाशयातून बाहेर येतं. या जगामध्ये पहिला प्रवेश घेतं, त्यावेळेस त्याला आई-वडिलांच्या जीन्स आणि क्रोमोझोम्स-मधून काय काय प्राप्त झालेलं असतं? म्हणजेच अनुवंशिक पद्धतीनं (Hereditary) प्राप्त झालेलं असतं? याबद्दल आजच्या काळामध्ये आपल्याला अतिशय निर्विवादपणे सांगण्यासारखी संधी उपलब्ध झालेली आहे.


एकतर आपला संपूर्ण शारीरिक भाग हा अनुवंशिक पद्धतीनेच आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराची ठेवण आहे, चेहऱ्याची ठेवण आहे, नाकी-डोळी ठेवण आहे; एवढंच नव्हे, तर आपली उंची आहे. आणि कदाचित जाडीसुद्धा. याशिवाय आपल्या केसांचा रंग, संपूर्ण शरीराचा रंग हा आपल्या आई-वडिलांकडूनच म्हणजेच त्यांच्या अनुवंशिकतेमधून आपल्याला प्राप्त होत असतो. 

एखाद्या कुटुंबामध्ये सगळ्यांचे डोळे काळे असतात आणि एखाद्याच मुलाचे डोळे मात्र निळे-हिरवे-घारे असतात. हे काही अपघातानं घडत नसतं. गेल्या काही पिढ्यांमध्ये कोणाचेतरी डोळे घारे असतात, निळे असतात, हिरवे असतात आणि ते डोळे अनुवंशिक पद्धतीनं जीन्समधून आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले असतात, म्हणून निळे डोळे असतात किंवा घारे डोळे असतात. म्हणजे शारीरिकदृष्ट्या जे काही आपल्याला प्राप्त होतं ते पूर्णतः अनुवंशिक पद्धतीननंच प्राप्त होतं. याबद्दल आज जगामध्ये कुठेही शंका नाही. कोणत्याच प्रकारचा वलीं नाही. हा निर्विवादपणे सिद्ध झालेला मुद्दा आहे.


आता याचा दुसराही एक अर्थ आपण समजून घेऊया. एखादा मुलगा किंवा मुलगी दिसायला सुंदर आहे, देखणा आहे याचा अर्थ असा होतो, की त्याच्या आई-वडिलांच्या जीन्समधून हे सौंदर्य त्याला किंवा तिला प्राप्त झालेलं आहे. एखादा मुलगा किंवा मुलगी कुरूप आहे, तर याचा अर्थ असा होतो, की त्याच्या आई-वडिलांच्या अनुवंशिकतेमधून हा कुरूपपणा त्याला किंवा तिला प्राप्त झालेला आहे. याबद्दल शंकेला कुठेही जागा नाही.


एवढंच नव्हे, तर अनेक प्रकारचे अनुवंशिक रोगसुद्धा आपल्याला या पद्धतीनं अनुवंशिक पद्धतीनं प्राप्त होत असतात. आता त्यामध्येसुद्धा स्त्री आणि पुरुषांबाबत भेद होतो. पुरुषांबाबतचे अनुवंशिक रोग जास्त वेळपरपीं असतात आणि कदिाचत ते आपल्या आयुष्यामध्ये त्याला बळी पडतात; पण स्त्रियांबाबत मात्र, यातल्या अनेक अनुवंशिक रोगांना त्या स्वतः बळी पडत नाहीत; मुलं मात्र जीन्समधून हे रोग प्राप्त करू शकतात. याही पद्धतीची संशोधनं अलीकडच्या काळात समोर आलेली आहेत.


या पद्धतीनं, अनुवंशिकतेनं जरी शारीरिक भाग आपल्याला मिळत असला, प्राप्त होत असला, तरी खरा वादाचा मुद्दा दीर्घ काळापासून राहिलेला आहे तो म्हणजे, आपल्या गुणांचा आणि अवगुणांचा भाग आणि बुद्धिमत्त्वा भाग कुठून प्राप्त होतो? याबद्दल गेल्या शंभर वर्षांमध्ये दीर्घकाळ या विषयावर चर्चा सुरू राहिलेली आहे. खरं म्हणजे ज्याला आपण दोन डलहेश्री म्हणूया. दोन विचारधारा म्हणूया. एक विचारधारा असं सांगत आली, की आपलं संपूर्णच्या संपूर्ण गुणा-अवगुणांचं आणि बुद्धिमत्तेचं क्षेत्र हे प्रामुख्यानं अनुवंशिक पद्धतीनेच प्राप्त आहेत असतं आणि दुसरं एक डलहेश्र दीर्घकाळापासून सांगण्याचा प्रयत्न करतं, की तुमच्या आणि माझ्या संपूर्ण आयुष्यामधला गुणांचा आणि अवगुणांचा भाग आणि बुद्धिमत्तेचा भाग हा केवळ संस्कारांमधूनच निर्माण होत असतो.


आता या दोन्हींबद्दलचे वाद जरी दीर्घ काळापासून चालत असले, तरी आजच्या काळामध्ये या विषयावर आपल्याना निर्विवादपणे काही गोष्टी सांगता येतात. आज आपण नक्की सांगू शकतो, की आपल्या संपूर्ण गुणांचा आणि अवगुणांचा भाग, बुद्धिमत्तेचा भाग, प्रामुख्यानं संस्कारांमधूनच फुलत असतो, खुलत असतो. याचा नेमका अर्थ काय आहे तोही आपण समजून घेऊया.


अनुवंशिक शास्त्रानुसार Personality किंवा प्रामुख्यानं गुण-अवगुण प्राप्त होतात. अनुवंशिक पद्धतीनं प्राप्त झालेल्या क्षमता फुलण्यासाठी अनुकूल वातावरण लागतं. जोपर्यंत अनुकूल वातावरणाचा परिसर उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्या गुणांचा फुलण्याची संधी मिळत नाही, विकसित होण्याची संधी मिळत नाही आणि ते गुण खऱ्या अर्थानं एश्रिीश होत नाहीत. बाहेर येत नाहीत. ते त्याच अवस्थेमध्ये आयुष्यभर पडून राहू शकतात. याविषयी अनुवंशिकतावाद्यांचं सुद्धा एकमत आहे. याचा अर्थ असा होतो, की अनुवंशिक पद्धतीनं आपल्याला काही गुणांच्या क्षमता प्राप्त झाल्या किंवा झाल्या नाहीत, जोपर्यंत त्याला अनुकूल वातावरण उपलब्ध होत नाही, त्या पद्धतीचे संस्कार मिळत नाहीत तोपर्यंत ते गुण निर्माण होणं शक्य नाही.

 त्यामुळे असं जरी आपण गृहीत धरलं, की अनुवंशिक पद्धतीनं गुण येत नाहीत आणि ते प्रामुख्यानं संस्कारांतून निर्माण होतात, तरीही ते खरं ठरण्याची शक्यता अधिक आहे. कारण असले आणि नसले तरीही ते फुलण्यासाठी संधी मात्र संस्कारांतूनच मिळत असते, हे आजच्या काळात निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे, आजच्या काळात असं मानलं जातं, की मूल ज्यावेळेस गुणांच्या आणि अवगुणांच्या क्षेत्राबाबत आणि बुद्धिमत्तेच्या क्षेत्राबाबत अनभिज्ञ असतं तोपर्यंत त्याचा संपूर्ण भाग जणूकाही कोरा असतो..


 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying