२. गर्भवती स्त्रीच्या पहिल्या भेटीतील रक्तातील चाचण्या आणि लघवीची तपासणी

गर्भवती स्त्रीच्या पहिल्या भेटीतील रक्तातील चाचण्या आणि लघवीची तपासणी


२. गर्भवती स्त्रीच्या पहिल्या भेटीतील रक्तातील चाचण्या आणि लघवीची तपासणी

  • लघवीची तपासणी प्रथिने साखर रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण.
  • रक्तनमुन्यावर एच. आय. व्ही व व्ही. डी. आर. एल. या तपासण्या
  • रक्तगट, रक्तप्रकार आर.एच. पॉझिटीव्ह आहे की निगेटिथर आहे.
  • गर्भवती माता तपासणीसाठी आल्यावर मधुमेहाची तपासणी
  • टीएसएचसाठी रक्त तपासणी 
  • विशिष्ट क्षेत्रामध्ये मलेरिया व सिकलसेलसाठी तपासणी.

तपासणीचे वेळापत्रक :

* आपण सध्या प्रत्येक गर्भवतीला किमान चार वेळा तपासणीसाठी बोलवत आहोत.

* पहिली तपासणी गर्भधारणेच्या १२ आठवडयांच्या आत होणे अपेक्षित आहे. 

* दुसरी तपासणी २४-२६ आठवडे

* नंतरच्या तपासण्या गर्भधारणेच्या ३२ आणि ३६-३८ आठवडयांच्या सुमारास करावयाच्या आहेत. 

* याशिवाय मानव विकास व प्रधान मंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या एएनसी कॅम्पमध्ये गर्भवतीची किमान दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीमध्ये एकदा तपासणी करून घ्यावी.

(PMSMA) या प्रत्येक भेटीमध्ये आपल्याला काही विशिष्ट चाचण्या आणि तपासण्या करावयाच्या आहेत. त्यातून आपल्याला सदर गर्भवतीस काही जोखीम किंवा धोके संभवतात का हे समजते आणि योग्य उपाययोजना करुन हे धोके कमी करता येऊ शकतात.


पुढील प्रत्येक भेटीत करावयाची कार्यवाही :


  • नवीन लक्षण आहे का
  • बाळाची हालचाल जाणवते का?
  • पांढुरकेपणा, सूज, कावीळ
  • रक्तदाबाची नोंद
  • वजनातील वाढीची नोंद (किग्रॅ / प्रति महिना)
  • पोटावरुन तपासणी- बाळाची स्थिती, गर्भाची हृदयस्पंदने
  • एच.बी. टेस्ट
  • लघवीची तपासणी
  • एकदा डॉक्टरांकडून संपूर्ण तपासणी
  • ग्लुकोज देऊन पुनर्तपासणी (२४-२८ आठवडे)

प्रत्येक भेटीत समुपदेशन

आहार, विश्रांती, स्तनपान, कुटूंब नियोजन (PPIUCD), प्रसूतीचे नियोजन, प्रसूती सोबतीण, धोक्याची लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणीस येण्या विषयी मार्गदर्शन



औषधे :

  • पहिल्या तिमाहीमध्ये फोलिक अॅसिड गोळी
  • १२ आठवडयानंतर रोज प्रसूतीपर्यंत व प्रसूतीनंतर ६ महिने लोहगोळी (हिमोग्लोबीननुसार प्रतिबंधा क किंवा उपचारात्मक)
  • जंतनाशक औषधाची एक गोळी (अल्बेन्डॅझॉल) दुसऱ्या तिमाहीमध्ये.
  • कॅल्शियम गोळया रोज दोन प्रसूतीपर्यंत व प्रसूतीनंतर सहा महिने.
  • धनुर्वात आणि घटसर्पाची लहान मात्रा असलेली टीडी लस दोन डोस किंवा यूस्टर डोस
  •  इन्फ्ल्युएन्झाच्या साथीच्या काळात इन्फ्ल्युएन्झा लस घेण्याविषयी मार्गदर्शन

 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying