दृष्टीदान कार्य महान
डोळा ही निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल ठेव आहे. अत्यंत दुर्लभ अशा काही गोष्टी मानवाला जन्मजातच बहाल केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे दृष्टी. डोळ्याशिवाय जगणे ही कल्पनाच आपण करु शकत नाही, परंतु काही अभागी व्यक्ती विविध कारणामुळे ह्या सुखापासून वंचित राहतात व त्यांचे जीवन अंधकारमय होते. अशा व्यक्तीचे जीवन आपण प्रकाशाने उजळू शकतो..
नेत्रदान म्हणजे काय ?
नेत्रदान म्हणजे आपल्या मृत्युनंतर स्वतःचे डोळे दान करणे. यासाठी आपण जवळच्या नेत्र पेढीस डोळ जान करण्यासाठी इच्छापत्र देऊ शकतो.
मृत्युनंतरही दुसऱ्याचे भले करणे, स्वतःच्या इच्छेने नेत्रदान करणे हे महान सामाजिक कार्य आहे.
नेत्रपेढी :
मृत व्यक्तिचे डोळे काढून त्यातील बुब्बुळ वेगळे करुन, तपासून, त्याची योग्य साठवण करुन ती बुब्बुळ रोपण करणाऱ्या केंद्रांना वितरीत करणारी संस्था म्हणजेच 'नेत्रपेढी'. यामध्ये नेत्रदात्याची बुब्बुळे त्याच्या मृत्युनंतर जमा करतात.
मृत व्यक्तीचे सेवाभावी नातलगही आपल्या प्रिय व्यक्तीच्या नेत्राचे दान करु शकतात. अश केलेले बुब्बुळ (डोळे) नेत्रशल्य चिकित्सकांना मोफत पुरविण्यात येतात. एक प्राप्त झालेले दोन डोळे (कार्निया) दोन दृष्टिहिनांना मोफत बसवून त्याल करवून देतात.
नेत्रदान कसे करावे ?
नेत्रदान करु इच्छि यांनी आपल्या नजिकच्या नेत्रपेढीला पत्र लिहावे किंवा स्वतः भेटावे. ही नेत्रपेढी आकडून नेत्रदानाबद्दल फॉर्म भरुन घेईल व आपणाला एक नेत्रदान इच्छापत्र देईल वर सूचनाही असतात.
शासनाने ही सुविधा जिल्हा रुग्णालय, कुटीर रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे सुद्धा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे आपण आपले जवळी 5 रुग्णालयात नेत्रदानाचे फॉर्म भरुन दिल्यानंतर ते रुग्णालयामार्फत नेत्रपेटला पाठविण्यात येतात. आपण नेत्रदान फार्म भरल्यानंतर आपल्याला मिळालेले दानापत्र जवळच्या नातलगांना किंवा फॅमिली डॉक्टरांना दाखवून घ्यावे.
तसेच दालापत्र फ्रेम करून आपल्या घरात सर्वांना दिसेल अशा जागी लावाये म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपले नातलग लगेच नेत्रपेढीला फोनने किंवा तारेने कळवतील. त्यानंतर तुमच्या घरी नेत्रशल्य चिकित्सक येऊन, डोळे काढून घेऊन जातील. ज्याचे कोर्निया चांगले आहेत अशा अंध व्यक्ती किंवा ज्यांना मोतिबिंदू झाला आहे असे लोकही नेत्रदान करु शकतात. हार्ट अॅटॅक, हायपरटेंशन, अल्झामर, पॅरालेसिस यासारख्या दुखण्यांनी ग्रस्त व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकतात, १ वर्षाच्या मुलापासून ते जर्जर वृद्धांपर्यंत कोणाचेही नेत्रदान करता येते.
नेत्रदान कोणास करता येत नाही ?
मरणोपरांत नेत्रदान खालील प्रकारात मोडत असलेल्या व्यक्तींना करता येत नाही. ज्या व्यक्तींचा मृत्यु पिसाळलेला कुत्रा चावल्याने झालेला आहे किंवा ज्या व्यक्तीला कावीळ झालेली आहे, तसेच धनुर्वात, कॅन्सर व एड्स असे आजार झालेले आहेत व त्या मृत्युमुखी अडल्या आहेत त्यांना नेत्रदान करता येत नाही. तसेच मधुमेह, कुष्ठरोग, क्षयरोगलेल्या व्यक्ती देखील नेत्रदान करु शकत नाहीत.
नेत्रदानासाठी खालील गोष्टी करा:
(१) मृतनंतर मृत व्यक्तिचे डोळे लगेच बंद करा.
२) डोळ्यावर ओले स्वच्छ कापड ठेवा.
३) खोलीत जर पंखा चालू असेल तर लगेच बंद करा व खोलीत ए. सी. असेल तर सुरु ठेवावा
४) डोक्याखाली उशी ठेवावी.
५) मृत्यूनंतर लगेच जवळच्या नेत्रपेढीस फोन करावा.
६) मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर पण ४ ते ६ तासाच्या आत डोळे काढल्यास ते बुब्बुळ रोपण करण्यास उपयोगी पडू शकतात.
नेत्ररोपणाने दृष्टीदान :
नेत्रबुब्बुळावर डाग पडल्याने ज्यांची दृष्टी गेली आहे त्याला बुब्बुळाचे रोपण करुन दृष्टी लाभ होऊ शकतो. त्यांच्या जखमी बुब्बुळाच्या जागी चांगले बुब्बुळ बसविता येते. मृत व्यक्तिचे बुब्बुळ नेत्रपेढीत जमा करून ठेवता येते.
मृत्य व्यक्तिचे डोळे ४ ते ६ तासांच्या आत काढल्यास ते रोपण करण्यास उपयोगी पडू शकतात. त्यांनतर हे बुब्बुळ ४८ ते ७२ तासांच्या आत दुसऱ्या व्यक्तीस बसविले जाणे सगळ्यात चांगले.
गैरसमज
नेत्रदानाबद्दल लोकांत बरेच गैरसमज पसरलेले आहेत. ते खालीलप्रमाणे
(१) नेत्रदानामुळे मृत व्यक्तीच्या चेहन्यास विद्रूपता त्यांना पसंत नसते म्हणून नेत्रदान टाळतात.
- परंतू हा चुकीचा समज आहे. बुब्बुळ हे फार काळजीपूर्वक काढले जातात. त्यानंतर पापण्या मिटविल्या जातात. त्यामुळे चेहन्यात विद्रुपता येत नाही.
२) काही लोकांच्या मते नेत्रदान हे कृत्य धर्मविरोधी आहे.
- हे चूक आहे. नेत्रहिनाला दृष्टी देण्यासारखे सत्कृत्य कोणतेही नाही.
३) काही लोक विचारतात की, जिवंत असतानाच दोनपैकी एक डोळा दान करता येतो का ?
- मृत्युनंतरच नेत्रदान करता येत नपणी नेत्रदान करता येत नाही.
डोळ्यांची सुरक्षितता
१) रोज सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत.
२) दुसऱ्यांनी टॉवेल व रुमाल वापरू नये
३) डोळ्यात सुरमा व काजळ घालू नये
४) डोळ्यात शक्यता पापण्याचा डॉक्टरक चोळू नये त्यामुळे ते अधिक आत रुतण्याची पाणी घेऊन श्वास बंद ठेवून पाण्यात डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप करणे कचरा निघत नसल्यास तात्काळ डोळ्याच्या डॉक्टरकडे पाठवावे.
५) मुलांना अणकुचीदार खेळणी उदा विटी-दांडू घातक ठरू शकतो.
६) बंदूक, बाण हे खेळणावे. यामुळे दुरुन देखील डोळ्यांना इजा पोहचू शकते.
७) लहान मुलांना कात्री, पेन्सिल, धनुष्यबाण इत्यादी धोकादायक खेळणी खेळत असताना मुलांकडे लक्ष ठेवावे.
८) लहान मुलांना दिवाळीत फटाके उडवू देवू नये.
९) आतिशबाजी करताना जवळ उभे राहू नये कारण फटाके उडविताना निष्काळजीपणा झाल्यास ठिणग्या उडून डोळे कायमचे निकामी होऊ शकतात.
१०) वेल्डींगच्या कामामुळे सुद्धा अपघात होऊ शकतो. त्यासाठी योग्य तो चष्मा वापरावा.
११) उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे व प्रखर प्रकाशाकडे पाहू नये.
१२) होळीमध्ये रंग खेळताना रसायनयुक्त रंगाचा वापर टाळावा. नैसर्गिक रंगाचा उपयोग करावा व रंग डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
(१३) डोळ्यात रसायन पडल्यास डोळे भरपूर पाण्याने त्वरीत धुवावे.
(१४) नियमित उपयोगात येणारे अणकुचीदार वस्तू खेळणी, चाकू, सुरी तसेच कात्री लहान मुलांपासून दुर ठेवावी.
(१५) ६ वर्षाखालील बालकाना 'अ' जीवनसत्त्वे अतिरिक्त डोस पाजावा, मातांना बालकाच्या पौष्टिक आहाराबाबत जागृत करावे. 'अ' जीवनसत्त्व अभावी मुलांना रातआंधपणा येऊ शकतो.
(१६) मुलांनी व्ही पाहताना टीव्ही पासून कमीत कमी १० फुटांच्या अंतर असावे.
OPTOMETRY-SHARP VISION
Optometrist