नेत्रदान- श्रेष्ठदान !
नेत्रदान पंधरवडा..दि. २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर.
एक वर्ष वय असलेली कोणतीही व्यक्ती आपले नेत्रदान करु शकते. जिवंत असताना आपले डोळे दान करण्यासाठी इच्छापत्र लिहून दिल्यास मृत्यूनंतर अशा व्यक्तीचे डोळे दान होऊ शकतात. एखाद्या व्यक्तिने नेत्रदानासाठी इच्छापत्र लिहून दिले असल्यास त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांनी त्याच्या इच्छेचा आदर ठेऊन कार्यवाही करायला हवी.
मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही नेत्रदान करु शकतात.
नेत्रदान करायचे इच्छापत्र लिहून दिल्यावर मृत्यूनंतर नातेवाईकांनी शक्य तितक्या लवकर म्हणजे मृत्यूनंतर जास्तीत जास्त 6 तासामध्ये मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बॅकेत जमा होतील, असे पहावे. त्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर नेत्र बँकेत दूरध्वनी करुन खालील बाबीची पूर्तता करायला हवी.
1. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर कापसाचा बोळा ठेवावा.
2. पंखा चालू असल्यास तो बंद करावा.
3. शक्य असल्यास अधूनमधून सूक्ष्म जंतूनाशकाचे थेंब मृत पावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये टाकावे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
4. मृत पावलेल्या व्यक्तीचे डोके अंदाजे 6 इंच वर उचलून ठेवावे. असे केल्याने डोळे काढताना रक्तस्त्राव टाळता येईल.
अचानक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान होऊ शकत नाही तसेच रॅबिज, सिफील्स, सांसर्गिक काविळ, सेप्टीसेमिया आणि एड्स अशासारख्या रोगाने बाधित असणार्याना आपले डोळे दान करता येत नाही.
नेत्र रोपण करताना संपूर्ण डोळ्याचे रोपण होत नसून फक्त डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण होते आणि उर्वरित भागाचा वापर शैक्षणिक आणि संशोधनासाठी केला जातो.
दान करण्यात आलेल्या परंतु बाहुलीच्या पडद्याच्या रोपणासाठी पात्र नसलेल्या डोळ्यांना महत्वाच्या मृत व्यक्तीचे डोळे काढून घेणे ही क्रिया फक्त 30 मिनिटांची असून डोळे काढल्यानंतर कोणतीही खूण दिसत नाही.
नेत्रदान हे दुसर्यासाठी जीवन दानासारखे आहे. जिवंतपणी कोणालाही कायद्यानुसार नेत्रदान करता येत नाही तसेच ज्या व्यक्तीला डोळ्याचे रोपण करण्यात आले आहे त्या व्यक्तीलाही कोणाचे डोळे मिळाले आहेत, हेही सांगितले जात नाही.
नेत्र बँक ही मानवतेच्या भावनेने प्रेरीत होऊन नेत्रदान केलेल्या व्यक्तीचे डोळे जमा करुन त्या डोळ्यांना विकसित करते आणि ज्या व्यक्तींना डोळ्यांची आवश्यकता आहे त्यांना त्या डोळ्यांचे वाटप करते.
नेत्र रोपण करताना संपूर्ण डोळ्याचे रोपण होत नसून फक्त डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण होते आणि उर्वरित भागाचा वापर शैक्षणिक आणि संशोधनासाठी केला जातो.
दान करण्यात आलेल्या परंतु बाहुलीच्या पडद्याच्या रोपणासाठी पात्र नसलेल्या डोळ्यांना महत्वाच्या संशोधन कामासाठी वापरले जाते.
बाहुलीच्या पडद्याच्या रोपणामध्ये 90 टक्क्याहून जास्त शस्त्रक्रिया यशस्वी होत असून बाहुलीच्या पडद्याच्या समस्येने ग्रस्त असणार्या व्यक्तीना या रोपण शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी मिळते.
नुकत्याच जन्मलेल्या आणि अस्पष्ट बाहुलीचा पडदा असणार्या बालकांना बाहुलीच्या पडद्याचे रोपण ही एक देणगीच आहे.
बाहुलीच्या पडद्याचे रोपण ही एक शस्त्रक्रिया असून त्या शस्त्रक्रियेद्वारे अस्पष्ट बाहुलीच्या पडद्याऐवजी दान केलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातील सुस्पष्ट बाहुलीचा पडदा बसविण्यात येतो.
बाहुलीच्या पडदा हा खालील कारणाने अस्पष्ट होतो.
1. संसर्ग
2. इजा
3. डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर व्यवस्थित काळजी न घेणे,
4. कुपोषण आणि
5. अनुवंशिकता.
भारतामध्ये जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टीहीन आहेत. साधारण दृष्टीदोषाने 27 दशलक्ष व्यक्ती ग्रासित आहे. दोन्ही डोळ्यांच्या अंधत्व 9 दशलक्ष लोकांना असून 3 दशलक्ष अंध बालके आहेत.
बाहुलीचा पडदा खराब असणार्या अंध व्यक्तीची संख्या 4.60 दशलक्ष असून बाहुलीच्या पडदा रोपणामुळे जवळपास 3 दशलक्ष लोकांना लाभ झाला आहे.
चला तर मग, निसर्गाची अद्भूत किमया अंधानाही पाहता यावी यासाठी मानवतेच्या दृष्टीकोणातून आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान करण्यासाठी आजच कायदेशीर कार्यवाही करु या.
Tags:
eyedonation