👁️ *मरणोत्तर नेत्रदान* 👁️
भारतामध्ये बुबुळाच्या आजारामुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण मोठे आहे. नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिचे बुबुळ आलेल्या व्यक्तिस शस्त्रक्रीयेद्वारे नेत्ररोपण केल्यास ती व्यक्ति पुन्हा जग पाहू शकते.
बुबुळांच्या वाढत्या मागणीमुळे नेत्रदान करण्याबाबत जनजागृती होणे आवश्यकता आहे.
यासाठी ८ सप्टेंबरपर्यंत नेत्रदान पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. नेत्रदान करण्यासाठी फॉर्म भरुन देण्यात यावा आणि त्याबाबतची माहिती घरी, नातेवाईकांना, मित्रांना आणि फॅमिली डॉक्टरांना देऊन ठेवण्यात यावी. म्हणजे त्या व्यक्तीच्या मृत्युपश्चात माहिती असलेले त्या व्यक्तीचे नातेवाईक आणि डॉक्टर नेत्रदानाची पुढील कारवाई करतील.
ज्या व्यक्तींनी नेत्रदानाविषयी संमतीपत्र भरुन दिलेले नाही त्यांचे नातेवाईकही नेत्रपेढीला कल्पना देऊन मृत व्यक्तीचे नेत्रदान करु शकतात.
नेत्रदान करणे ही काळाजी गरज आहे. त्यामुळे नेत्रदान करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठीचे संमतीपत्र भरुन देऊन नेत्रदानाच्या या कार्यात आपले योगदान द्यावे.
Tags:
eyedonation