आरोग्य सेवेतील गट क पदाचा निकाल लवकरच प्रसिद्ध होणार
आरोग्य सेवेतील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा 24 ऑक्टोंबर 2021 रोजी घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाचे संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच सामाजिक व समांतर आरक्षण आणि इतर तरतुदी नियम विचारात घेऊन संवर्गनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आता निवड यादीतील उमेदवारांना उपलब्ध असलेल्या रिक्त पदे त्यांच्या पसंतीनुसार पदस्थापना देऊन नियुक्ती आदेश निर्गमित करावयाचे आहेत सदर प्रक्रिया ही खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशन फेरीचे आयोजन करून पार पाडण्यात येणार आहे.
1. कंपनीद्वारे उपसंचालक यांना गुणवत्ता यादी व निवड यादी उपलब्ध करून देण्यात येणार (16/11/2021)
2. गुणवत्ता व निवड यादी नुसार उपसंचालक स्तरावर उमेदवारांना समुपदेशनासाठी पत्र देणे तसेच ई मेल करणे (17/11/2021)
3. समुपदेशन फेरीचे आयोजन संवर्गनिहाय करणे (23,24,25/11/2021)
4. समुपदेशन यानंतर सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर आदेश निर्गमित करणे
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या स्थळाला भेट द्यावी किंवा खाली दिलेल्या लिंक वर जावे.