डोळा का सतत उडत असतो? शरीरात काही कमी आहे का ?
डोळा लवणे म्हणजे शकून किंवा अपशकून असल्याचं आपण नेहमीच ऐकतो. पण डोळा लवणे हे तसं फारच त्रासदायक असतं. डोळ्यांमधला मज्जातंतू किंवा स्नायू हलायला लागल्यामुळे तुमचा डोळा लवायला सुरुवात होते.
डोळ्याचं फडफडणे याचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी आहे. तुम्ही नोटीस केले असेल की कधी कधी तुमचा डोळा हा अगदी काही वेळा करिता फडकतो, जर असं होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. हे सामान्य आहे. पण तोच जर फार काळापर्यंत फडकत असेल तर मात्र ते गंभीरपणे घ्यायला हवे.
डोळ्यांचे फडफडणे याला डॉक्टरी भाषेत ‘Myokymia’ असे म्हणतात. या स्थितीत डोळ्यांतील स्नायू आकुंचन पावतात.
आता असे का होत असेल, ते जाणून घेऊ…
1) ताण:
कामाच्या जास्त ताण हे डोळे लवण्याचं मुख्य कारण असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
2) कमी झोप:
रात्रीची झोप कमी झाली तरीही डोळे लवण्याचं प्रमाण वाढू शकतं. कामाच्या वेळी लक्ष केंद्रीत करताना डोळ्यांचा वापर जास्त होतो. त्यातच झोप कमी झाली असेल तर पापणी फडफडते.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच तणावाला सामोरे जावे लागते. तणाव हा आजकालच सर्वात कॉमन आजार आहे. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या तणावाखाली असतो तेव्हा आपलं शरीर वेगवेगळ्याप्रकारे प्रतिक्रिया देते. डोळ्याचं फडफडणे हे देखील त्यापैकी एक.
अति प्रमाणात कॉम्पुटरचा वापर, कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्याने, कॅफिनचे जास्त प्रमाणत सेवन केल्याने तसेच काही औषधींमुळे आपले डोळे ड्राय होऊन जातात. त्यामुळे देखील आपले डोळे फडफडतात. त्याकरिता डोळ्यांची नीट काळजी घ्या त्यांना ड्राय होऊ देऊ नका.