डोळे खोल जाण्याची कारणे आणि त्यावरील उपाय (डोळे आत जाणे)

डोळे (बुबुळ) आत जाणे (Sunken Eyes)

डोळे आत जाणे किंवा खोल जाणे यामुळे संपूर्ण बुबुळ आत गेल्यासारखं वाटतो व वरची भुवई वर आल्यासारखी वाटते यासोबतच डोळ्या जवळची त्वचा (Skin) काळी वाटते. डोळ्याभोवती चा भाग डार्क काळसर दिसायला लागतो (skin discoloration ). असे लक्षण वाढत्या वयात मध्ये तसेच आजारपणात जाणवू शकते. अशा व्यक्तीकडे लक्ष देऊन बघितल्यास आजारी असल्यासारखे जाणवून येते. असे लक्षण आढळून आल्यास त्यास hallow eyes असेही म्हणतात.

डोळे आत जाणे (Sunken Eyes)


डोळे आत जाणे यालाच आपण Sunken eyes असे म्हणतो. बुबुळ आत जाणे किंवा खोल जाणे असेही म्हणतात.


 डोळे खोल जाण्याची किंवा आत जाण्याची लक्षणे

• डोळे खोल जाणे किंवा आत जाण्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे डोळ्याच्या आजूबाजूचा भाग काळसर होतो, पूर्ण बुबुळ आत मध्ये गेल्यासारखा वाटतो, चेहऱ्याकडे बघितले असता आजारी असल्यासारखे वाटते, डोळे नेहमी थकलेले असतात, डोळ्याला लालसर पणा आलेला असतो.

• डोळ्याच्या खालची त्वचा पातळ झाल्यासारखे वाटते.

• डोळे आत जाणे हे साधारणतः तीस वर्षे ते चाळीस वर्षे पासून सुरू होते, डोळे आत जाणे हे साधारणतः वयोमानानुसार होत असते.


डोळे खोल जाण्याची किंवा आत जाण्याची कारणे 

डोळे आत जाने किंवा खोल जाणे हे साधारणतः अशक्तपणा, आजारपण, पुरेशी झोप न होणे, तणाव, चिंता, वाढते वय, स्मोकिंग, वाढता डिजिटल मीडियाचा स्ट्रेन, डोळ्यावरची कोरडेपणा होणे, जास्त वेळ मोबाईल वापरणे, कॅम्पुटर तसेच लॅपटॉप वरती जास्त वेळ काम करणे, गरम हवामानात काम करने , हवेच्या ठिकाणी काम इत्यादी प्रामुख्याने आढळून येणारी कारणे आहेत.

डोळे खोल जाणे यामध्ये ज्या व्यक्तीला चष्म्याचा नंबर आहे त्यांचे सुद्धा डोळे आत मध्ये जाऊ शकतात.

डोळे आत जाणे हे काहीवेळा जेनेटिक सुद्धा असू शकते. ज्या व्यक्तीला त्याच्या पूर्वाजाला असा त्रास असेल तर त्यालाही होण्याची शक्यता असते.


डोळे खोल जाणे यावरील घरच उपाय

• संतुलित व पुरेसा आहार घ्यावा, आहारामध्ये विटामिन्स मिनरल्स फायबर्स गोष्टीचा समावेश असणे आवश्यक आहे.

• आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा, दूध, दुधाचे पदार्थ समावेश असावा त्यासोबतच अंडे मासे आहारात घ्यावे.

• दिवसभरात जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे जेणेकरून शरीरात डिहयड्रेशन होणार नाही.

• रात्री उशिरापर्यंत जागू नये, रोजच्या वेळेनुसार झोपावे, जागरण करू नये, रात्री झोपते वेळेस मोबाईल वापरू नये.

• रात्री झोपते वेळेस डोळ्याची तसेच डोक्याची मालिश करूनच झोपावे 

• डोळ्यावरती काकडीची चकली ठेवावी त्यामुळे डोळे थंड राहतील आणि डोळ्याच्या आजूबाजूला झालेला काळसरपणा कमी होईल.

• डोळ्याच्या अवतीभोवती बदाम तेलाने मालिश केल्यास काळेपणा जाण्याची शक्यता असते. हे घरगुती उपाय यासाठी उपयुक्त ठरतात.

• स्मोकिंग अल्कोहोल तंबाखू अशा व्यसनापासून दूर रहावे.

• मानसिक तणाव घेऊ नये

• चहा कॉफी जास्त वेळ घेऊ नये.

• नेहमी थंड पाण्याने डोळे धुवावे.

• वरील प्रमाणे सर्व काळजी घेतल्यानंतर निश्चितच डोळे खोल जाण्याचे टाळतील व आत गेलेले डोळे सुद्धा वरती येतील.


वयोमानानुसार डोळे आत जाणे किंवा खोल जाणे

वयोमानानुसार प्रामुख्याने जवळपास खूप साऱ्या व्यक्तींचे डोळे आत जातात, हे आत जाणे साधारणतः तीस ते चाळीस वर्षानंतर सुरू होते. वाढत्या वयोमानानुसार हाडांची डेन्सिटी, शरीरातील फॅट तसेच चेहऱ्यावरील फॅट कमी व्हायला लागते. वयोमानानुसार शरीरात असलेले कोलाजेन कमी होते आणि त्यामुळे स्किन पातळ होते. आणि अशा सर्व गोष्टींमुळे डोळे खोल जातात.


डोळे आत जाणे यासाठी डॉक्टरांचा सल्ला 

• जर डोळे आज जाणे हा वयोमानानुसार किंवा जेनेटिक नुसार असेल तरी यामध्ये काहीही करण्याची जास्त गरज नसते.

• परंतु जर तुमचे वय कमी असेल आणि तुमचे डोळे आत मध्ये जात असतील आणि त्या सोबत तुम्हाला दुसरा त्रास जाणवत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांची सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

• डोळे आत जाणे काहीवेळा डोळ्याला नंबर असल्यामुळे सुद्धा होऊ शकते त्यामुळे अशा लक्षणांकडे हलगर्जीपणा करून चालणार नाही त्यासाठी त्वरित डॉक्टरांना किंवा जवळच्या नेत्रचिकित्सा अधिकारी यांना दाखवावे.

• डॉक्टर तुम्हाला तपासणी केल्यानंतर डोळे आत जाण्याची कारणे आणि त्यावरील उपचार सर्व सविस्तर पणे सांगतील.


डोळे खोल जाणे यावरील उपाय

• तुम्हाला जर चष्म्याचा नंबर असेल तर नेहमी चष्मा लावूनच काम करावे किंवा बघावे.

• धूळ धूर अशा ठिकाणी काम करताना डोळ्यावरती protective गॉगल्स लावूनच काम करावे जेणेकरून डोळ्याला ॲलर्जी होणार नाही.

• डोळ्याला नेहमी खाज येत असेल जळजळ करत असतील तर नेत्र तज्ञांच्या सल्ल्याने आय ड्रॉप घ्यावेत.

• गाडी चालवताना नेहमी सन गॉगल्स चा वापर करावा.

• वाचन करताना नेहमी चष्मा लावूनच वाचन करावे.

• मोबाईल वापरताना किंवा कम्प्युटर वापरताना ब्ल्यू कोटिंग चे ग्लासेस वापरावे.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying