डोळ्यातून पाणी येणे कारणे आणि उपाय - watering of eye

 डोळ्यातून पाणी येणे

डोळ्यामध्ये कचरा, धूळ गेल्यामुळे किंवा ॲलर्जी, जंतुससर्ग झाल्यामुळे डोळ्यातून पाणी येते.

डोळ्यातून पाणी येणे हे डोळ्याची एक स्थिती आहे यामध्ये ज्यावेळेस डोळ्याला अतिरिक्त ताण जाणवतो त्या वेळेस डोळ्यातून पाणी येते.

डोळ्यातून पाणी येणे कारणे आणि उपाय - watering of eye


डोळ्यातुन पाणी येण्याची खूप महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यांमध्ये कोरडेपणा असणे, कोरडेपणा असल्यामुळे डोळ्यांमध्ये नेहमी खाज येणे, डोळे लाल असणे, डोळे नेहमी दुखणे, डोके दुखणे, डोळे जळजळणे अशा प्रकारचा त्रास जाणवतो व त्यामुळेच डोळ्याला खूप पाणी येते.

डोळ्यात पाणी येण्याची ही आहेत कारणे

डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा कचरा गेल्यामुळे डोळ्यातून पाणी येणे हे अत्यंत महत्त्वाचे एक कारण आहे. याव्यतिरिक्त खालील प्रमाणे वेगवेगळी कारणे असू शकतात..

• डोळ्यांमध्ये कोरडेपणा असणे

• डोळ्याला जंतूसंसर्ग असणे

• डोळ्याला ऍलर्जीचा त्रास असते

• जास्त वेळ हवेत काम करणे

• गरम हवामानाच्या ठिकाणी काम करणे

• गाडी चालवणे

• डोळ्याला नासुर चा त्रास असणे

• मोबाईलचा, कॅम्पुटरचा आणि लॅपटॉपचा अति वापर करणे.

डोळ्यात पाण्याचे प्रमाण संतुलित असायला हवे.

डोळ्यातून पाणी येणे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. डोळ्यात पाण्याचे निर्माण होणे आणि वाहून जाणे हे नियमित होणे आवश्यक आहे त्यामुळे डोळ्यात नियमित ओलावा राहतो व डोळ्यात साचलेली धूळ किंवा घाण एका बाजूला वाहून घेऊन जाणे हे त्याचे महत्त्वाचे काम असते.

पण काही वेळा डोळ्यामधून खूप जास्त प्रमाणात पाणी वाहून जायला लागते अशा वेळेस डोळ्यांमध्ये काहीतरी बदल झालेले असतात जसे की डोळ्याला मार लागलेला असणे, कचरा गेल्यानंतर पाणी येणे, ॲलर्जी झाल्यामुळे पाणी येणे अशी वेगवेगळी कारणे असू शकतात.

डोळ्यातून नेहमीपेक्षा जास्त पाणी जात असेल तर त्याकडे बारकाईने बघणे खूप महत्त्वाचे असते. साधारणतः नेहमी डोळ्यांमध्ये जी पाणी वाहत असते ते पाणी डोळ्याच्या बाहेर येत नसते परंतु जर डोळ्यातील पाणी बाहेर पडत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. 

डोळ्यातील पाण्याचे प्रकार

डोळ्यांमध्ये वाहणाऱ्या पाण्याच्या स्वरूपावरून त्याचे प्रकार पडत असतात जसे की साधारण पाणी, चिकट पाणी, पू असलेले पाणी असे डोळ्यातील पाण्याचे प्रकार पडतात. डोळ्यातून पाणी येणे यालाच आपण (Discharge) असे म्हणतो

• साधारण पाणी

• चिकट पाणी

• पू मिसळलेले पाणी


साधारण पाणी (Watery Discharge)

साधारण पाणी हे आपण वापरत असलेल्या पाण्यासारखी असते. जर डोळ्याला साधारण पाणी येत असेल तर हे कचरा गेल्यामुळे, मार लागल्यामुळे, ऍलर्जीमुळे, टीव्ही, कम्प्युटर, मोबाइल आणि लॅपटॉप समोर जास्त वेळ बसल्यामुळे येऊ शकते.

चिकट पाणी (Mucous Discharge) 

जर डोळ्याला चिकट पाणी येत असेल तर डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग असण्याची चिन्हे असतात. चिकट पाणी हे साधारण पाण्यापेक्षा चिकट स्वरूपाची असते, असे पाणी डोळ्यांना जंतुसंसर्ग झाल्यानंतरच येते. 

साधारणता डोळ्याला चिकट पाणी हे डोळे आल्यानंतर येते यासोबतच डोळ्याला चिपडे ही असतात.

पू असलेले पाणी (Purulent Discharge)

काही वेळेला खूप जास्त जंतुसंसर्ग झाल्यामुळे डोळ्यातून तू असलेले पाणी येते अशा अवस्थेत रुग्णाला त्वरित जवळच्या नेत्रचिकित्सा अधिकारी यांना दाखवावे किंवा डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नासूर चा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये पू असलेले पाणी येते यालाच आपण Purulent Discharge असे म्हणतो.

डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी

डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून आपण नेहमी उन्हामध्ये जाताना गॉगल्स वापरावा, थंड पाण्याने नेहमी डोळे धुवावे, मोबाईल, संगणक, लॅपटॉप चा वापर योग्य पद्धतीने करावा.

डोळ्यावर काकडीची चकली ठेवावी व पाच मिनिटांसाठी डोळे बंद करून झोपावे

नियमितपणे डोळ्याचा व्यायाम करावा


डोळ्याला एलर्जी असल्यास डॉक्टरांनी दिलेल्या औषधी वेळेवर व सुचविल्याप्रमाणे टाकाव्यात.

जंतुसंसर्गामुळे पाणी येत असल्यास त्वरित नेत्रचिकित्सा अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.

नासूर मुळे डोळ्यातून पाणी येणे

नासूर म्हणजे हा एक डोळ्यातून पाणी वाहणारा डोळ्याचा आजार आहे यामध्ये डोळ्यातून पाणी वाहणारी नलिका जंतूसंसर्ग होऊन बंद होते.

पाणी वाहणारे नलिका बंद झाल्यामुळे डोळ्यातून वाहणारे पाणी नलिका द्वारे न जाता डोळ्यातून येते. नालिकाला जंतुसंसर्ग झाल्यामुळे नाकाजवळ मोठी सूज येते व त्यामध्ये पू तयार होतो यालाच आपण नासूर ( Dacryosystitis ) झाला असे म्हणतो.

साधारण व्यक्तीच्या डोळ्याचे पाणी नाकातून घशात द्वारे जाते परंतु नासुर झालेल्या व्यक्तीमध्ये ते कशामध्ये न जाता डोळ्यातून गालावरती येते.

नासूर त्रास असलेल्या व्यक्तीमध्ये ज्या डोळ्याला त्रास आहे त्या डोळ्यातून नेहमी पाणी येते, सुरुवातीला हे पाणी साधारण पाण्यासारखी असते परंतु जर याकडे लक्ष न दिल्यास साधारण पाण्याचे रूपांतर होऊन चिकट पाणी किंवा पू असलेले पाणी सुद्धा होऊ शकते.

नासूर असलेल्या व्यक्तीची अशी तपासणी करून ना शूर आहे किंवा नाही याची खात्री केली जाते.

ज्या व्यक्तीला नासूर आहे त्यांना नासुर चे ऑपरेशन करावे लागते. नासूर च्या दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात 

1. DCR

2. DCT




Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying