दृष्टीदोष लक्षणें, कारणे, उपाय आणि चष्म्याचा नंबर

दृष्टीदोष (Refractive error) म्हणजे काय ?

दृष्टीदोष ( Refractive error)  म्हणजे डोळ्याला दिसायला कमी असणे किंवा अंधुक दिसणे साधारण शब्दामध्ये सांगायचे झाले म्हणजे डोळ्यांची नजर कमी असून दिसण्यासाठी चश्म्याचा वापर करावा लागतो यालाच आपण दृष्टिदोष (Refractive error ) असे म्हणतो.

दृष्टीदोष लक्षणें, कारणे, उपाय आणि चष्म्याचा नंबर


विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर दृष्टीदोष (Refractive error)  म्हणजे एखाद्या वस्तूकडे बघितले असता वस्तूची प्रतिमा बरोबर डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर (Retina) पडायला हवी परंतु काही परिणामामुळे जर पडत नसेल तर त्यालाच आपण दृष्टी दोष आहे असे म्हणतो.

डोळ्यांची नजर कमी असणे यालाच आपण इंग्लिश मध्ये Diminution of vision असे म्हणतो.

दृष्टिदोष यालाच आपण इंग्लिश मध्ये Refractive error आणि Ametropia असे म्हणतात.

ज्या व्यक्तीला दृष्टिदोष (Ametropia)  आहे त्यांना जवळचे (Near vision ) किंवा दूरचे दिसायला ( Distance vision ) कमी असते आणि त्यांना व्यवस्थित नजर करण्यासाठी चष्म्याची ( Spectacle) किंवा कॉन्टॅक्ट लेन्स ( Contact lenses)  ची आवश्यकता असते.

चष्म्याचा नंबर का लागतो ?

जेव्हा एखादी व्यक्ती वस्तू बघते तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा डोळ्याच्या पाठीमागच्या पडल्यावर तयार होते अशा परिस्थितीमध्ये डोळा नॉर्मल (Emmetropia ) असतो किंवा त्या डोळ्याला चष्मा चा नंबर नसतो.

परंतु जर एखाद्या वस्तूची प्रतिमा डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर न पडता पडद्याच्या समोर किंवा पाठीमागे पडत असेल तर त्या प्रतिमेला बरोबर पडद्यावर नेण्यासाठी चष्म्याचा नंबर लावावा लागतो.

जर प्रतिमा बरोबर पाठीमागच्या पडद्यावर पडत असेल तर रुग्णाला दिसायला व्यवस्थित असते. तू जर प्रतिमा पडद्यावर न पडता समोर किंवा पाठीमागे पडत असेल तर रुग्णांची नजर कमी असते.

दृष्टीदोष का होतो ? 

जसे की आपण वरील प्रमाणे बघितले असता वस्तूची प्रतिमा पडद्यावर न पडल्यामुळे चष्म्याचा नंबर लागतो किंवा दृष्टी होतो. दृष्टी दोष का होतो याची वेगवेगळी कारणे आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघू य..

दृष्टीदोष होण्याची कारणे 


डोळ्याची लांबी (Axial length)


• डोळ्याची लांबी जास्त असल्यामुळे दृष्टिदोष होऊ शकतो.

• साधारण व्यक्तीच्या डोळ्याची लांबी ही 24 MM असते.

• जर डोळ्याची लांबीही 24 MM पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीला Myopia नावाचा दृष्टिदोष होतो.

• जर डोळ्याची लांबी ही 24 MM पेक्षा कमी असेल तर अशा व्यक्तीला Hypermetropia नावाचा दृष्टीदोष होतो

• जर डोळ्याच्या लांबी मध्ये 1MM वाढ किंवा कमी झाली असेल तर त्यामुळे डोळ्याला 3 D नंबर लागू शकतो.

बुबुळाचा आकार ( Corneal curvature )

• डोळ्याचा बुब्बुळाचा आकार जरी बदललेला असला त्यामुळेसुद्धा चष्म्याचा नंबर लागू शकतो. 

• बुब्बुळाचा आकारांमध्ये जर 1mm बदल झालेलााा असेल तर त्यामुळे 6D नंबरचा चष्मा लागू शकतो.

डोळ्यामध्ये लेन्स नसणे (Aphakia )


• जर डोळ्यांमध्ये मार लागून (Traumatic Aphakia) किंवा ऑपरेशन केल्यानंतर लेन्स नसेल (Surgical Aphakia)  तर त्यामुळे डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा लागतो.

• अशा रुग्णांमध्ये चष्मा जर लावला नाही तर रुग्णाला खूप अंधुक दिसते.

लेन्सची जागा बदलणे (Positional refractive errors )


• साधारण लेन्सची जागा जर नेहमीच्या ठिकाणी नसता त्यापेक्षा मागे किंवा पुढे सरकली असेल तर अशामुळे सुद्धा डोळ्याला नंबर लागू शकतो.

काही वेळा मार लागून डोळ्याची रचना बदलल्यामुळे डोळ्याला दिसायला त्रास होतो व त्यामुळे चष्मा लागतो.

वरील प्रकारच्या वेगवेगळ्या कारणामुळे डोळ्याला चष्मा लागू शकतो.

दृष्टीदोष चे प्रकार कोणते ?


दृष्टीदोष चे चार प्रकार असतात या मध्ये दूरदृष्टी दृष्टीदोष, निकटदृष्टि दृष्टीदोष, Astigmatism, चाळीसवया नंतर होणारा दृष्टीदोष.

• Myopia
• Hypermetropia
• Astigmatism
• Presbyopia

Myopia :

• या दृष्टीदोषांवर मध्ये वस्तूची प्रतिमा ही डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर न पडता पडद्याच्या समोर पडते अशा दोषाला Myopia ase म्हणतात.

• मायोपिया ही एक दृष्टिदोष चा प्रकार असून
यामध्ये रुग्णाला दूरचे दिसायला त्रास असतो

• Myopia झालेल्या पेशंटला दूरचे दिसायला कमी असते

• मायोपिया हा प्रकार दृष्टिदोष यामध्ये सर्वात प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळून येणारा असतो.

• मायोपिया हा मायनस नंबरच्या चष्मा ने उपचार करता येतो.

• मायोपिया ला चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स, सर्जरी मुळे उपाय करता येतात.

Hypermetropia :


• या दृष्टीदोषा मध्ये वस्तूची प्रतिमा ही डोळ्याच्या पाठीमाग पडद्याच्या मागे पडते अशा दोषाला Hypermetropia असे म्हणतात.

• Hypermetropia हा दृष्टिदोषाचा प्रकार असून यामध्ये रुग्णाला दूरचे तसेच जवळची ही दिसायला त्रास होतो.

• Hypermetropia झालेल्या रुग्णांना चष्म्याचा प्लस नंबर देऊन रुग्णांची नजर व्यवस्थित करतात.

Astigmatism:


• या दृष्टिदोष यामध्ये वस्तूची प्रतिमा ही एका भागामध्ये न होता दोन भागामध्ये तयार होते वती डोळ्याच्या समोर किंवा पाठीमागे दोन्ही वेळा समोर किंवा दोन्ही वेळा पाठीमागे अशी वेगवेगळ्या प्रकारे पडते अशा दोषाला आपण Astigmatism असे म्हणतो.

• Astigmatism झालेल्या रुग्णाला सिलेंड्रिकल नंबरने रुग्णाची दृष्टी वाढवल्या जाते.

• डोळ्यामध्ये पडदा किंवा वेल वाढलेला असेल तर अशा आजारामुळे डोळ्यांमध्ये Astigmatism दृष्टि दोष आढळून येतो.


40 नंतर लागलेला नंबर (Pressbyopia)


• हा नंबर प्रामुख्याने वयाच्या 40 वर्षानंतर लागतो व यामुळे रुग्णाला जवळचे दिसायला कमी होते यालाच आपण चाळिशीचा चष्मा असेही म्हणतो.

• वयोमानानुसार डोळ्यातील लेन्सचे तसेच स्नायूचे काम कमी होते व त्याची लवचिकता कमी झाल्यामुळे 40 वयाच्या वरच्या व्यक्तीला कमी दिसायला लागते.

• अशा व्यक्तीला नेहमी प्लस मध्ये नंबर लागतो.

दृष्टीदोषाची लक्षणे 

डोळ्याला दृष्टीदोष असल्यामुळे खालील प्रमाणे ची लक्षणे रुग्णाला जाणवतात.

• नजर कमी असणे
• नेहमी डोळे दुखणे
• नेहमी डोळ्यांमध्ये जळजळ करणे
• डोके दुखणे
• डोळे नेहमी थकलेले असणे
• भुवई दुखणे

दृष्टिदोष होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?

डोळ्याला दृष्टिदोष होऊ नये म्हणून किंवा चष्मा चा नंबर लागू नये म्हणून डोळ्याची नेहमी काळजी घ्यायला हवी दररोज डोळे चा व्यायाम करायला हवा, डोळ्याच्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आहारामध्ये असायला हवा, धूळ धूर हवेच्या ठिकाणी गॉगल वापर करायला हवा, मोबाईल संगणक लॅपटॉप आणि डिजिटल मीडिया यांचा उपयोग डोळ्याची काळजी घेऊनच करावा.

डोळ्याचे आरोग्य उत्तम आहे की नाही याची तपासणी करणे खूप आवश्यक आहे. लवकरात लवकर तपासणी केल्यामुळे डोळ्यांमध्ये होणाऱ्या आळशी डोळ्याचा आजार तुम्ही रोखू शकता.

कामाच्या ठिकाणी डोळ्याला मार लागणार नाही ना डोळ्यात कचरा जाणार नाही ना याची काळजी घ्यावी.

डोळ्याच्या दृष्टिदोष वरती उपचार ?


• दृष्टिदोष याच्या उपचारांमध्ये महत्वाचे म्हणजे डोळ्याची नजर कसे वाढवल्या जाईल त्यानुसार उपचार केले जातात.

• यामध्ये प्रामुख्याने डोळ्याला चष्म्याचा नंबर देऊन दृष्टिदोष वरती उपचार केल्या जातो.

• चष्मा सोबतच कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यामुळे सुद्धा दृष्टीदोष कमी केल्या जातो.

• काहीवेळा दृष्टिदोष कमी करण्यासाठी सर्जरी केले जाते यालाच आपण लसिक लेझर सर्जरी (Lasik eye surgery ) असे म्हणतो.

दृष्टीदोष लक्षणें, कारणे, उपाय आणि चष्म्याचा नंबर


दृष्टिदोष यामुळे होणारे डोळ्यांचे आजार

• दृष्टीदोष असल्यास दुर्लक्ष केल्यामुळे डोळ्याला आणखी दुसरे आजार होऊ शकतात.

• आळशी डोळा होणे हे दृष्टिदोष लवकर उपचार न केल्यामुळे होतो.

• पाठीमागच्या पडद्याचे आजार होणे हेसुद्धा दृष्टीदोष याचे व्यवस्थित निदान आणि उपचार न केल्यामुळे होतो.

• जर डोळ्याला चष्मा चा नंबर असेल तर त्यामुळे डोळ्याला वारंवार रांजणवाडी येते. त्यामुळे नेहमी चष्म्याचा नंबर लावा.



Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying