रांजणवाडी दूर करण्याचे काही घरगुती उपाय

 रांजणवाडी म्हणजे काय ?

रांजणवाडी म्हणजे पापण्याच्या केसाच्या बुडाशी किंवा पापणीवर फोड येणे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग होऊन त्यामध्ये पू तयार होतो त्यालाच आपण रांजणवाडी आली असे म्हणतो.


रांजणवाडी दूर करण्याचे काही घरगुती उपाय






रांजणवाडी चे प्रकार कोणते ?


रांजणवाडी चे मूळ चार प्रकार असतात यामध्ये काही रांजणवाडी मध्ये खूप जास्त त्रास होतो किंवा काही रांजणवाडी मध्ये त्रास होत नाही, खुपदा रांजणवाडी पापणीच्या मधोमध असते तिला आपण Chalazion असे म्हणतो. काहीवेळा रांजणवाडी ही बरोबर पापण्याच्या केसाच्या बुडाशी असते अशाप्रकारची रांजणवाडी मुळे डोळ्याला खूप त्रास होतो, डोळा ठणकतो, डोळ्याला सूज येते यालाच आपण स्टाय (Stye) असे म्हणतो.


रांजणवाडी होण्याची कारणे कोणती ?


रांजणवाडी होणे म्हणजे जी डोळ्यांमध्ये अश्रू पसरविण्याची काम करणाऱ्या ग्रंथी मध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे हे जंतू संसर्ग वारंवार डोळा चोळल्यामुले किंवा हात लावल्यामुळे होते आणि त्यामुळे अश्रू नलिका बंद होऊन डोळ्याच्या पापणीला रांजणवाडी तयार होते.


रांजणवाडी मुळतः डोळ्याला इन्फेक्शन झाल्यामुळे होते हे इन्फेक्शन वारंवार डोळ्याला हात लावल्यामुळे किंवा डोळ्यात चोळल्यामुळे.


ज्या व्यक्तीला चष्म्याचा नंबर आहे पण ते चष्मा लावत नाहीत अशा व्यक्तींना रांजणवाडी होण्याचे प्रमाण जास्त असते.


ज्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास आहे अशांना सुद्धा रांजणवाडी होण्याचे प्रमाण जास्त असते.


रांजणवाडी ची लक्षणे कोणती ?


रांजणवाडी आल्यानंतर पापणीवर गाठ तयार होते आणि त्या गाठी मध्ये पू तयार होतो.

रांजणवाडी भोवती लाल होणे.

डोळा ची पापणी खूप दुखत असते


रांजणवाडी होऊ नये त्यासाठी कोणते उपाय करावे ?


रांजणवाडी होऊ नये यासाठी वारंवार डोळ्या ला हात लावू नये, डोळा चोळू नये, डोळ्याला खराब रुमाल खराब आहात लावू नये, बाहेरून फिरून आल्यानंतर स्वच्छ पाण्याने डोळा धुवावा, 

ज्या व्यक्तीला दिसण्याचा त्रास आहे त्यांनी चष्मा लावा त्यामुळे रांजणवाडी होण्याचे टाळते.

ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.


रांजणवाडी वरील घरगुती उपचार कोणते ?


रांजणवाडी महत्त्वाचे म्हणजे जवा रांजणवाडी ची सुरुवात असते त्याच वेळेस जर लक्ष दिले तर ती फक्त गरम पाण्याने शेक दिल्याने किंवा औषधांनीच बरी होऊ शकते त्यामुळे रांजणवाडी आल्यानंतर लवकरात लवकर उपचार सुरू करावेत.

रांजणवाडी आल्यानंतर काही घरगुती उपाय आपण करू शकतो जसे की डोळ्याला गरम कपड्याने शेक देणे, डोक्यामध्ये डेंड्रफ असेल तर तो शाम्पू वापरून कमी करणे, डॉक्टरांनी दिलेल्या अँटिबायोटिक औषधी सांगितल्याप्रमाणे वापरणे, 

काहीवेळा रांजणवाडी खूप दिवसाची असल्यामुळे किंवा उशिरा लक्ष दिल्यामुळे ती औषधाने किंवा गरम कपडे ने शेक दिल्याने कमी होत नाही अशा स्थितीत रांजणवाडी ला चिरा देऊन म्हणजे शस्त्रक्रिया करून त्यामधील पु काढून टाकावा लागतो.


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying