डोळ्यामध्ये कचरा गेल्यास काय काळजी घ्यावी व कोणते प्राथमिक उपाय करावे ?

डोळ्यात कचरा जाणे (foreign body in eye)

डोळा हा मानवी शरीराचा सर्वात महत्त्वाचा ज्ञानेन्द्रिय आहे.  डोळा हा शरीरातील सर्वात नाजूक आणि संवेदनशील असा भाग आहे. त्यामुळे डोळ्यांमध्ये धूळ, धूर ,हवा ,कचरा जाणार नाही याची योग्य प्रकारे काळजी घ्यायला हवी.

डोळ्यात कचरा गेल्यास काय करावे ?


डोळ्यामध्ये जर धूळ कचरा गेला तर डोळा उघडणे कठीण होते, डोळ्यातून पाणी येते, लाल होतो, दिसायला त्रास होतो, व कचरा डोळ्यामध्ये गेल्यामुळे डोळ्याला जंतुसंसर्ग होऊन सुद्धा होऊ शकतो.

डोळ्यामध्ये कचरा जाऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी ?

• डोळ्यामध्ये कचरा जाऊ नये यासाठी कामाच्या ठिकाणी किंवा गाडी चालवताना गॉगल्स लावा, तसेच प्रोटेक्टीव ग्लासेस वापरावेत त्यामुळे डोळ्यात कचरा जाणे टाळते.

• खूप हवेच्या ठिकाणी काम करत असल्यास चष्मा नेहमी वापरावा.

• धारदार वस्तू चे काम करत असल्यास डोक्यामध्ये नीट लावून किंवा व्यवस्थित काळजी घेऊन काम करणे आवश्यक आहे.

• ज्या व्यक्ती लोखंडाची वेल्डिंग काम करत असतात अशा व्यक्तीमध्ये लोखंडाचे कण डोळ्यात जाणे ही खूप साधारण बाब आहे. लोखंडाचे कीस डोळ्यात जाणे हे टाळण्यासाठी त्यांनी नेहमी वेल्डिंग करताना गॉगल्स वापरावेत.

• जे लोक घर बांधण्याचे काम वगैरे करतात त्यांनी डोळ्यांची व्यवस्थित पणे काळजी घेऊनच काम करावे.

डोळ्यामध्ये कचरा गेल्याची लक्षणे

डोळ्यामध्ये जर कचरा गेला त्यामुळे त्या व्यक्तीला खूप त्रास होतो डोळा बंद ठेवून असतो, डोळा दुखतो, डोळ्यातून पाणी चालू असते, डोळा लाल होतो, डोळा मध्ये कचरा टोचतो त्यामुळे त्या व्यक्तीला काहीही काम करता येत नाही त्यासोबतच जोपर्यंत कचरा निघत नाही तोपर्यंत त्याचा त्रास कमी होत नाही.

डोळा हा शरीराचा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील भाग असल्यामुळे डोळ्यांमध्ये जरा ही पापणीचा केस जरी डोळ्यांमध्ये गेला तरी तो उघडत नाही,  पाणी येते, लाल होतो, असे वेगळेच त्रास असतात.

डोळ्यामध्ये कचरा गेला आहे काय घरगुती उपाय करावेत ?

• डोळ्यामध्ये कचरा गेला असल्यास डोळा जास्त चोळू नये, जर डोळ्या मध्ये कचरा गेला आणि डोळा जास्त चोळला तर डोळ्यांमध्ये जास्त जखम होते. 

• कचरा गेलेल्या डोळ्यांमध्ये लगेच स्वच्छ व थंड पाण्याने धुवावा. असे तीन ते चार वेळा करावे.

• जर वरील उपाय करू नये डोळ्यातील कचरा निघत नसेल किंवा डोळ्यांमध्ये टोचण्याचा त्रास कमी होत नसेल तर जवळच्या आरोग्य केंद्र मधील नेत्रचिकित्सा अधिकारी यांना दाखवावे तसेच यामध्ये मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.

• डोळ्यामध्ये कचरा गेला त्यामुळे जास्त वेळ न घेता त्वरित नेत्र तज्ञांना दाखवावे.

• काही वेळा खूप व्यक्ती नेत्र तज्ञांकडे न जाता आपल्या गावातीलच काही व्यक्ती डोळ्यांमध्ये कापूस घालून किंवा जीभ घालून वेगवेगळ्या पद्धतीने डोळ्यातील कचरा काढतात असे म्हणतात. अशा प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करू नये त्यामुळे डोळा खराब होऊ शकतो.


डोळ्यात जीभ घालून कचरा काढणे

• डोळ्यांमध्ये जीभ घालून कचरा काढणे ही निव्वळ अफवा असून व्यक्तींनी अशा अफवा वरती विश्वास ठेवू नये, 

• जर जीभ डोळ्यामध्ये घातली तर खूप मोठा जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे डोळा निकामी होऊ शकतो, अशी खूप सारे रुग्ण आहेत की त्यांनी डोळ्यामध्ये जीभ घालून कचरा काढयला गेले आणि डोळा खराब झाला.

• डोळ्यांमध्ये जीभ घळणे इतके भयंकर आहे की डोळा संपूर्णपणे निकामी होतो. डोळ्याला खूप मोठा जंतुसंसर्ग होतो त्यामुळे corneal ulcer होऊन डोळा निकामी होतो.

कापसाने डोळ्यातील कचरा काढणे

• गावांमधील काही मंडळी घरीच कापसाने कचरा काढायचा प्रयत्न करत असतात. पान त्यांच्याकडील कापूस निर्जंतूक की करण केलेला नसतो. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.


• त्यामुळे जर डोळ्यावर पाणी शिंपडले असता डोळ्यातील कचरा जर निघत नसेल तर कोठेही वेळ न गमावता सरळ नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा तसेच तुमच्या जवळील आरोग्य केंद्रांमध्ये नेत्रचिकित्सा अधिकारी यांना दाखवावे.


• नेत्रचिकित्सा अधिकारी हे तुमच्या डोळ्यांमध्ये भुलेचा चा ड्रॉप टाकून निर्जंतुक केलेल्या कापसाने डोळ्यातील कचरा काढतात. व त्यासोबतच तुम्हाला काही ड्रॉप ही देतात. त्यामुळे कचरा गेल्या मुळे झालेली जखम ही भरून येते.


डोळ्यामध्ये कचरा गेल्यास काय काळजी घ्यावी व कोणते प्राथमिक उपाय करावे ?

• डोळ्यांमध्ये कचरा गेल्यास डोळा चोळू  नये.

• वारंवार डोळे ला हात लावू नये.

• डोळ्याला खराब कपड्याने पुसू नये.

• डोळ्यामधील कचरा ड्रॉप टाकून निघत नसतो याची काळजी घ्यावी.

• जवळचा नेत्रतज्ञ त्यांना लवकरात लवकर दाखवणे.

• डोळ्यांमध्ये कचरा जास्त वेळ राहिला होता जंतु संसर्ग होण्याची शक्यता असते.

• डोळ्यांमध्ये कचरा गेल्यास कोणतेही Steroid औषध डोळ्यांमध्ये टाकू नये.


डोळ्यात गेलेला कचरा जर लवकरात लवकर काढला नाही तर त्यामुळे डोळ्यांमध्ये जंतूसंसर्ग होऊन डोळा पांढरा होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळा कचरा गेला तर लवकरात लवकर  जवळच्या नेत्रचिकित्सा अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying