रातांधळेपणा कारणे व उपाय - Night Blindness

रातांधळेपणा (Night Blindness)

रातांधळेपणा म्हणजे ज्या व्यक्तीला रात्री चे दिसत नाही त्याला आपण रातांधळेपणा आहे असे म्हणतो.

रातांधळेपणा कारणे व उपाय - Night Blindness


रातांधळेपणा म्हणजे ज्या व्यक्तीला विटामिन ए ची कमतरता होऊन रात्री दिसायला अंधुक असते किंवा दिसत नसते याला आपण रातांधळेपणा असे म्हणतो. ज्या व्यक्तीला रातांधळेपणा आहे त्यांना रात्री दिसत नाही.

रातांधळेपणा असलेल्या व्यक्तीला दिवसा व्यवस्थित दिसते फक्त रात्री दिसत नाही.

रातांधळेपणा यालाच इंग्लिश मध्ये Night Blindness किंवा Nyctalopia असेही म्हणतात.

रातांधळेपणा होण्याची कारणे व प्रक्रिया

कसा व का होतो रातांधळेपणा ?

मानवी डोळ्यांमध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात त्यालाच आपण रोडस (Rods) आणि कोणस (Cones) असे म्हणतो. 

ह्या पेशी डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर म्हणजेच रेटिना वरती असतात.

रेटिना च्या आजूबाजूला (Peripheral retina ) रोडस (Rods) पेशी असतात तर मधोमध म्हणजे Macula च्या जवळ कोनस ( Cones) पेशी  असतात 

 ह्या दोन्हीही पेशी दिसण्याचे काम करत असतात, कोणस् (Cones) पेशी हे दिवसाचे काम करते किंवा कलर  बघण्याचे काम करते आणि रोडस (Rods) पेशी हे रात्रीचे नजरेचे काम करते. 

रोडस पेशी रात्रीच्या नजरेसाठी कारणीभूत असतात. जर रोडस पेशी चे काम कमी झाले तर रात्रीचे दिसायला कमी होते त्यालाच आपण  रातआंधळेपणा असे म्हणतो.


रातांधळेपणा ची कारणे

• रातांधळेपणा हा विटामिन ए च्या कमतरतेमुळे होत असतो.

रेटिनाइटिस पिगमेंटोसा (Retinitis pigmentosa)

• Congenital high myopia (जन्मताच बाळाला खूप मोठा नंबर असणे)

• परिवारामध्ये आई-वडिलांना रातांधळेपणा असणे. (Familial Nightblindness)


रातांधळेपणा ची लक्षणे 

• अशा व्यक्तीला रात्री दिसत नाही

रेटिनाइटिस पिगमेंटोसा (Retinitis pigmentosa)

• Conjunctiva  हा भाग चुकून जातो व त्यावर ती पांढरे चट्टे दिसायला लागतात.

• डोळ्यामध्ये अतिशय कोरडेपणा जाणवतो.

• डोळे जळजळ करणे हे खूप प्रमाणात जाणवते

• डोळ्यामध्ये टोचल्यासारखे वाटते किंवा कचरा असल्यासारखे वाटते.

• डोळे नेहमी लाल असतात.

• डोळ्यावरती पिवळा थर आलेला वाटतो

• डोळ्यांमध्ये अश्रू चे प्रमाण कमी होते.


Conjunctiva हा भाग विटामिन ए च्या कमतरतेमुळे सुकून जातो त्यालाच आपण Xerophthalmia असे म्हणतो. यामुळेच व्यक्तीला डोळ्यातील रोडस (Rods) पेशी कमी होऊन , खराब होऊन रातांधळेपणा चा त्रास जाणवतो.

रातांधळेपणा वरती उपाय

 लहान मुलांच्या आहार जीवनसत्व अ युक्त असावा यामध्ये शेवग्याच्या शेंगा, पपई हिरवे पालेभाज्या यांचा समावेश असायला हवा.

लहान मुलांना दिल्या जाणारा जीवनसत्व अ चा डोस घ्यावा.

ज्यांना रातांधळेपणा त्रास आहे त्याने त्वरित जवळच्या डॉक्टरांना दाखवावे.


रातांधळेपणा आणि अंधश्रद्धा

रातांधळेपणा विषयीचा अंधश्रद्धा खूप प्रचलित आहे यामध्ये जर भोपळ्याच्या बिया वर किंवा पपईच्या बिया वर पाय ठेवला असता रातांधळेपणा होतो अशी अंधश्रद्धा ही खूप प्रचलित आहे.

अशा प्रकारच्या अंधश्रद्धा ह्या पूर्णपणे खोटे असून यामुळे आंधळेपणा येत नाही.

त्यामुळे अशा अंधश्रद्धा कडे दुर्लक्ष करून रातांधळेपणा चा उपाय करण्यासाठी नेत्रचिकित्सा अधिकारी यांच्याकडे जवळील आरोग्य केंद्राकडे जावे.



Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying