लॅसिक सर्जरी
डोळ्याचा चष्मा चा नंबर काढण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते त्याला लॅसिक सर्जरी म्हणतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर व्यक्तीला चष्मा लावण्याची किंवा कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याची आवश्यकता नसते. व्यक्तीला बिना चष्मा लावून किंवा कॉन्टॅक्ट लेन्स लावून ही दृष्टी नॉर्मल असते.
मोबाईलचा वाढता उपयोग आणि त्यामुळे होणारा डोळ्यावरती परिणाम याकडे पाहता पूर्वीपेक्षा आज-काल डोळ्याचे प्रॉब्लेम आणि नजर कमी होणे असे परिणाम आढळून येत आहेत. आणि हा प्रॉब्लेम साधारणतः वय वर्ष 15 ते 35 या वयामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो.
डोळ्यावर नको असलेला चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्स आपण लॅसिक सर्जरी ने काढून टाकू शकतो.
लॅसिक शस्त्रक्रिया कशी केली जाते ?
लॅसिक शस्त्रक्रियाही लेझर मशीन द्वारे केली जाते यामध्ये डोळ्याच्या पारपटल भागावरील (Cornea) फ्लॅप घेतला जातो व खालील भागावर लेझर ची किरणे सोडून जाळल्या जातो, त्यामुळे पारपटल भागाची जाडी, आकार बदलतो. या शस्त्रक्रिया मध्ये जितका डोळ्याचा पावर कमी करायचं असतो त्यानुसार डोळ्यावर लेझर टाकले जाते व पारपटल ची जाडी कमी केले जाते.
परपटलावरील (Cornea) फ्लॅप हा ऑटोमॅटिक लेझर मशीन द्वारे घेतला जातो. त्यापूर्वी डोळ्यामध्ये भूलेचा ड्रॉप टाकला जातो त्यामुळे रूग्णाला शस्त्रक्रिया दरम्यान कोणताही त्रास जाणवत नाही
त्यानंतर घेतलेला फ्लॅप परत ठेवला जातो, नंतर डोळ्यामध्ये अँटिबायोटिक ड्रॉप टाकून BCL (Bandage contact lens ) लावल्या जाते.
परत ठेवलेला फ्लॅप 2 दिवसामध्ये नॉर्मल होतो.
लॅसिक सर्जरी का करावी ?
लॅसिक सर्जरी ही एक कॉस्मेटिक सर्जरी आहे. ही सर्जरी केवळ जर तुम्हाला चष्मा वापरायचा नको असेल तरच किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापराचा नको असेल तरच केली जाते.
चष्मा लावल्यावर नाकावरती काळे डाग पडतात, डोळे खोल जातात, चष्मा नेहमी सोबत ठेवावा लागतो, चष्म्याचे फुटायचे शक्यता फार असते, नेहमी सोबत वापरणे शक्य नसते अशा गोष्टीला कंटाळुन खूप सारे व्यक्ती लॅसिक सर्जरी करण्यास इच्छुक असतात.
कॉन्टॅक्ट लेन्स वापर करताना यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना हात स्वच्छ असायला हवेत, कॉन्टॅक्ट लेन्स ड्रायव्हिंग करते वेळेस किंवा धुळे च्या वातावरणामध्ये वापरता येत नाहीत, कॉन्टॅक्ट लेन्स नेहमी स्वच्छ ठेवावे लागतात, दररोज काढणे आणि घालने हा क्रम दररोज करावा लागतो, एकदा घेतलेला कॉन्टॅक्ट लेन्स एका महिन्यानंतर परत घ्यावा लागतो, कॉन्टॅक्ट लेस ने काहीवेळा ऍलर्जिक रिऍक्शन होत असते अशा काही परिणामामुळे लोक लॅसिक सर्जरी कडे वळत आहेत.
लॅसिक शस्त्रक्रिया कोणी करावी ?
1. ज्या व्यक्तीचे वय 18 पेक्षा जास्त आहे
2. चष्म्याचा नंबर एक वर्षासाठी स्टेबल असेल तर लॅसिक करता येते.
3. ज्या व्यक्तीचा चष्म्याचा नंबर मायनस दोन पेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींनी शस्त्रक्रिया करावी
4. ज्या व्यक्तीचा चष्म्याचा नंबर स्टेबल राहत नसेल त्यांनी चष्म्याचा नंबर स्टेबल होईपर्यंत शस्त्रक्रिया करणे टाळावे जेणेकरून शस्त्रक्रियेनंतर नंबर लागू नये.
5. डोळ्याच्या जंतू संसर्ग झालेल्या आजारांमध्ये लॅसिक शस्त्रक्रिया करू नये.
6. ज्या व्यक्तीला डोळ्याचा मोठा नंबर असेल त्यांनी पहिले नेत्रतज्ञ ची सल्ला घेऊन किती नंबर निघेल याची चौकशी करावी.
डोळ्याची लॅसिक सर्जरी करण्यापूर्वी कोणकोणत्या तपासण्या कराव्या लागतात ?
1. लॅसिक सर्जरी करण्यापूर्वी चष्म्याचा नंबर चेक करण्यात येतो.
2. Slit Lamp मशीन द्वारे डोळ्याची तपासणी करून डोळ्याला कोणत्याही प्रकारचा संसर्ग नाही याची तपासणी केल्या जाते.
3. Cornea या भागाची जाडी आणि आकार चेक करणे ही जाडी Pachemeter तसेच Topography या मशीनद्वारे चेक करण्यात येते.
4. डोळ्यामध्ये अश्रूची कमतरता आहे की नाही याची तपासणी केल्या जाते.
5. Cornea वरती scratches ची तसेच Corneal opacity ची तपासणी केली जाते.
6. नेत्रतज्ञ हे डोळ्यामध्ये बाहुली मोठी करून पाठीमागचे पडद्याची (Retina) तपासणी करतात. यामध्ये बाहुली मोठी करण्यासाठी Tropicamide औषध वापर केल्याने चार ते सहा तास रुग्णाला अंधुक दिसते.
7. शस्त्रक्रियेपूर्वी डोळ्याचा आतील दाब (IOP) नॉर्मल आहे की नाही याची तपासणी करतात. व्यक्तीच्या डोळ्याचा नॉर्मल दाब साधारणतः 10 ते 21 mmhg इतका असतो.
लॅसिक शस्त्रक्रिया सुरक्षित आहे का ?
लॅसिक शस्त्रक्रिया ही पूर्णपणे सुरक्षित असून ऑटोमॅटिक लेझर मशिन द्वारे केली जाते.
लॅसिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्रास होतो का ?
लॅसिक शस्त्रक्रिया केल्यानंतर काहीही त्रास जाणवत नाही पण काही व्यक्तीमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर डोळ्यातून पाणी येने, डोळा दुखणे, खाज येणे अशी काही प्रमाणात त्रास जाणवतो.
यासोबत उजेडाचा त्रास होणे, लाईट चमकणे, glare दिसणे असा त्रास काही दिवस जाणवू शकतो.
लॅसिक शस्त्रक्रिया केव्हा करू शकत नाही ?
1.जर तुमचा चष्म्याचा नंबर वारंवार बदलत असेल
2. तुमच्या डोळ्याला जंतुसंसर्ग असेल जसे की डोळे येणे.
3. तुमच्या Cornea ची जाडी कमी असेल
4. वय 18 पेक्षा कमी असेल (नंबर स्टेबल नसतो )