डोळ्यावर पडदा येणे किंवा वेल वाढणे म्हणजे काय ?

 डोळ्यावर मास वाढणे म्हणजे काय ?


डोळ्यावर पडदा येणे किंवा वेल वाढणे म्हणजेच डोळ्यावरती  ( Conjunctiva) या  भागावर ती मास वाढणे त्यालाच आपण डोळ्यावर पडदा येणे असे म्हणतो. यालाच pterygium असेही म्हणतात. पडदा येणे म्हणजेच Conjunctiva या भागाचे Degenerative स्थीती होय. 

हा पडदा कधी कधी डोळ्याच्या एका बाजूने तर कधी दोन्ही बाजूंना येऊ शकतो, हळूहळू तो पारपटलावरती (Cornea) चढायला सुरुवात करतो.

जेव्हा तो पारपटलावर (Cornea)  चढतो त्यावेळेस रुग्णाला दिसायला त्रास होतो किंवा अंधुक दिसते.


डोळ्यावर पडदा येणे किंवा वेल वाढणे म्हणजे काय ?



डोळ्यावर पडदा कशामुळे येतो ?


डोळ्यावर पडदा येणे साधारणतः जी लोक उष्ण प्रदेशात राहतात किंवा गरम हवामानात राहतात त्या लोकांमध्ये याचे प्रमाण खूप प्रमाणात राहते.

तापमानाच्या प्रदेशात किंवा अति दमट हवामानामध्ये जी व्यक्ती काम करतात त्यांना डोळ्यामध्ये पडदा येणे किंवा वेल वाढणे साधारणता खूप प्रमाणात असते.

उन्हात काम करणाऱ्या, धुळे मध्ये काम करणाऱ्या तसेच खूप हवा मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीस डोळ्यावर पडदा येतो.


डोळ्यावरती पडदा का येतो ?


आताच आपण वरील प्रमाणे डोळ्यावर ती पडदा येण्याची कारणे बघितलेली आहेत परंतु आता आपण बघणार आहोत पडदा का तयार होतो.

डोळ्यावर पडदा येणे हा डोळ्यातील Conjunctiva भागाचा Degenerative अशी स्थिती आहे. जॉकी खूप गरम ठिकाणी, अतिउष्ण भागामध्ये, दमट हवामानामध्ये, धुळीच्या ठिकाणी, आणि हवेच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये एलर्जी तयार होऊन हळूहळू डोळ्याला लाली येते आणि आणि त्याचेच रुपांतर पडद्यामध्ये होते.

काहीवेळा डोळ्याला मार लागल्यामुळे सुद्धा वरती पडदा येऊ शकतो.


डोळ्यावरील पडद्याचे किंवा वेलेचे काय लक्षणे असतात ?


डोळ्यावर पडदा येणे हे खूप कमी वयाच्या व्यक्तीमध्ये येत असते की जे व्यक्ती चे काम घराबाहेरील असते किंवा हवेमध्ये, उन्हात असते.

साधारण डोळ्यावर पडदा येणे 20 ते 40 वयाच्या व्यक्तींना पडदा येण्याचे प्रमाण खूप जास्त असते.

सुरुवातीला जेव्हा डोळ्यावर पडदा येतो त्यावेळेस त्याची लक्षणे खूप काही जाणवत नाही.

पण जसजसा पडदा किंवा वेल डोळ्यावरची वाढायला सुरुवात करतो त्यामुळे त्या व्यक्तीला डोळ्यात मास वाढण्याचे दिसून येते, डोळ्यामध्ये मास वाढल्यामुळे डोळा विद्रूप दिसायला लागतो.

डोळ्यामध्ये मास वाढल्यामुळे दिसायला कमी दिसते जेव्हा हे मास डोळ्याच्या बाहुली  (pupil)  पर्यंत जाते. 

डोळ्यामध्ये पडदा वाढल्यामुळे रुग्णाला डोळ्याला खाज येते, डोळा लाल होतो, पाणी येते, खूपतो अशी खूप सारे लक्षणे जाणवतात.

पडदा वाढलेल्या रुग्णाला हवेत गेल्यानंतर किंवा गरम हवामानात काम केल्यानंतर डोळ्याला जास्त त्रास होतो.


डोळ्यावर आलेल्या वेलेवर उपचार ?


जमा डोळ्यावर पडदा येतो जर तो पडदा जास्त वाढला असेल म्हणजे डोळ्याच्या पारपटल भागावर ती गेला असेल तर तो शस्त्रक्रिया करून काढावा लागतो.

जर पडद्याची केवळ सुरूवात असेल आणि रुग्णाला वरीलपैकी लक्षणे जाणवत असतील तर अशा रुग्णांनी फोटोसन चा चष्मा वापरावा तसेच गाडीवर प्रवास करत असतील तर सन गॉगल्स कंपल्सरी वापरावा.

डोळ्याला हवा लागणार नाही आणि ऊन लागणार नाही याची जर काळजी घेतली तर डोळ्यावर मधील पडदा वाढायचे थांबते 

यासोबतच बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याने डोळे धुणे खूप महत्त्वाचे आहे 

नेत्र तज्ज्ञांनी दिलेल्या लुब्रिकॅटींग ड्रॉप नेहमी वापरावा जेणेकरून डोळ्यामधील जळजळ, खाज येणे, लाली येणे आणि डोळे दुखणे असा त्रास कमी होईल होईल.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying