डोळ्याची सूज कमी करण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी घरगुती उपाय

डोळा सुजणे याची कारणे व घरगुती उपाय.

डोळ्याची सूज कमी करण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी घरगुती उपाय


डोळ्याला किंवा पापणीला सूज येणे

अनेकदा डोळ्याला तसेच पापणीला वेगवेगळ्या कारणामुळे सूज येते सूज येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे डोळ्याला मार लागणे, डोळ्यामध्ये कचरा जाणे, डोळ्यामध्ये ॲलर्जी असने अशा वेगळ्या प्रकारच्या कारणांनी डोळ्यावरची सूज येऊ शकते. 

सूज आल्यामुळे डोळ्याच्या आजूबाजूचा पूर्ण भाग तसेच पापणी  सुजलेली दिसते. सूज आल्यामुळे डोळा पूर्ण उघडत नाही. 

पापणीच्या मार्जिन मध्ये जंतुसंसर्ग होऊन सूज येणे यालाच आपण Blephrities असे म्हणतो. पापणी मध्ये जंतुसंसर्ग साधारणतः डोक्यामध्ये कोंडा असल्यामुळे होते.

डोळ्याला सूज येण्याची कारणे

डोळ्याला सूज येण्याची कारणे खूप आहेत पण त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे डोळ्याला मार लागणे, एलर्जी, अपुरी झोपू होणे, मोबाईल संगणक आणि लॅपटॉप यांचा जास्त वापर करणे या कारणामुळे डोळ्यावरती वारंवार येऊ शकते. खालीलपैकी काही कारणे आहेत त्यामुळेही डोळ्यावरची सूज येते.

• एलर्जी

• जंतूसंसर्ग होणे (Baterial infection)

• डोळ्याला मार लागणे

• डोळ्यामध्ये कचरा जाणे

• औषधी वापरल्यामुळे सूज येणे

• स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅम्पुटर चा अतिरेक वापर करणे

• आहारामध्ये मिठाचे सेवन जास्त 

• कमी पाणी पिणे

• धूळ धूर हवा अशा ठिकाणी काम करणे

• जास्त वेळ रडल्यामुळे डोळ्याला सूज येते

वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे ही सर्व कारणे डोळ्याला सूज येण्यासाठी कारणीभूत असू शकतात त्यासोबतच डोळ्याला वेगळा त्रासही जाणू शकतो जसे की पाणी येणे, डोळ्याला खाज येणे, डोळा दुखणे, डोळा धनकने नाही इत्यादी.

सकाळी उठल्यावर डोळे का सुजतात ?

सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले असतात कारण की रात्री व्यवस्थित झोप न झाल्यामुळे, जास्त झोप झाल्यामुळे, रात्री डोळ्याला काही चावल्यामुळे, झोपे मध्ये डोळ्यात चोळल्यामुळे, झोपे मध्ये डोळा दबल्यामुळे डोळ्याला सूज येऊ शकते.

डोळ्याचे आजूबाजूची तसेच डोळ्याची खालची त्वचा अत्यंत नाजूक व संवेदनशील असल्यामुळे तिला थोडीशी ही जखम झाली किंवा मार लागल्यामुळे खुप लवकर सूज येते.

सकाळी उठल्यावर बरेचदा डोळे सुजलेले दिसतात यामध्ये काही वेळा जास्त झोप झाल्यामुळे सुद्धा डोळे सुजलेले असतात.
डोळ्याखालची त्वचा ही अत्यंत संवेदनशील व नाजूक असल्यामुळे तिला व्यवस्थित रित्या आराम न झाल्यामुळे तिला सूज येऊ शकते.

काही वेळा पाण्याची कमतरता असल्यामुळे सुद्धा सूज येते तर काही वेळा शरीरात मिठाचे प्रमाण वाढले तरी सूज येऊ शकते त्यामुळे आहारामध्ये मिठाच प्रमाण संतुलित असायला हवे.

डोळ्याला अचानक सूज येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एलर्जी, काही मार लागल्यामुळे सुद्धा अचानक सूज येते.

डोळा जास्त चोळल्यामुळे, डोळ्याला काही चावल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे डोळ्याला खूप सूज येते.

डोळ्याला मधमाशी चावल्यामुळे सूज येणे

डोळ्यांची त्वचा ही अत्यंत नाजूक व संवेदनशील असल्यामुळे डोळ्याला जर मधमाशी चावली तर डोळ्याला अत्यंत जास्त सूज येते, काही वेळा तर मधमाशी चावल्या मुळे डोळे उघडणे ही अशक्य होते.

मधमाशीच विष लागल्यामुळे डोळ्याला ठणक असते, डोळा लाल होतो, दुखतो, व खूप जास्त प्रमाणामध्ये सूज असते.

शरीराच्या दुसऱ्या भागापेक्षा डोळ्याच्या आजुबाजूची त्वचा पातळ व नाजुक असल्यामुळे खूप लवकर व जास्त सूज येते.

डोळ्याला रांजणवाडी येऊन सूज येणे

डोळ्याच्या पापणीला तयार होणे व त्या पापणी मध्ये पू तयार होतो त्यालाच आपण रांजणवाडी असे म्हणतो. 

रांजणवाडी आल्यामुळे डोळ्याच्या पापणीला सूज येते त्यामुळे डोळ्याला सूज येते, ठनक असते.

 डोळ्याला रांजणवाडी येऊन सूज आली असेल तर गरम  कपड्यानेे शेक द्यावा व तसेच नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा.


डोळ्यावर नेहमी सूज येत असल्यास अशी घ्यावी काळजी

डोळ्याला जर नेहमी नेहमी सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याची काळजी घेणे खूप आवश्‍यक आहे. डोळ्याची काळजी घेण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करावा..

• वेळेवर झोपावे जास्त जागरण करू नये.

• रात्री झोपते वेळेस अंधारमध्ये जास्त वेळ मोबाईल बघू नये.

• धुळ, धूर, हवा अश्या ठिकाणी काम करत असताना डोळ्यावरती प्रोटेक्टीव ग्लास ( Protective Glasses)  लावावेत.

• ड्रायव्हिंग करत असताना नेहमी गॉगल्स लावावेत.

• काम करत असताना डोळ्याला मार लागणार नाही ना याची काळजी घ्यावी.

• दिवसभरात जवळपास आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

• आहारामध्ये मिठाचे प्रमाण संतुलित असावे.

• मद्यपान करणे टाळावे

• डोळ्याला ॲलर्जी झाली असल्यास लवकरात लवकर जवळच्या नेत्रचिकित्सा अधिकारी (Ophthalmic Officer) किंवा नेत्रतज्ञ दाखवावे.

• डोळ्याला जंतूसंसर्ग असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

वरील सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास आपण डोळ्याला सूज येण्यापासून थांबू शकतो किंवा डोळ्याला आलेली सूज कमी करू शकतो.

डोळे सुजणे यावरती घरगुती उपाय

डोळ्याचा जर नेहमी सूज असेल तर तुम्ही घरगुती उपायांनी कमी करू शकता.

थंड पाणी आणि बर्फामुळे कमी होते डोळ्याची सूज

डोळ्यावर आलेली सूज तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळेस थंड पाण्याने डोळे धुऊन नाही कमी करू शकता. थंड पाण्याने डोळे धुतल्यामु डोळ्याला थंडावा मिळतो, डोळ्यात असलेली धूळ वाहून जाते.

यासोबत तसेच बर्फाचे छोटे छोटे तुकडे रुमाला मध्ये बांधून जिथे सूज आली आहे तिथेच शिकावे त्यामुळे सूज लवकर कमी होते.

डोळ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी बर्फानी शेकल्यामुळे ती खूप लवकर कमी होते हा घरगुती उपाय खूप उपयुक्त आहे, यामुळे सूज कमी व्हायला मदत होते.

कोल्ड कॉम्प्रेशन ने डोळ्याची सूज करा कमी.

डोळ्या वरती तसेच पापणी वरती जर खूप जास्त सुरू झाली असेल तर कोल्ड कॉम्प्रेशन देऊनही आपण डोळ्याची सूज कमी करू शकतो. कोल्ड कॉम्प्रेशन  हे दिवसातून चार ते पाच वेळेस द्यावे त्यामुळे लवकरात लवकर सूज कमी होऊ शकते.

काकडी चकली आणि डोळ्याची सूज

डोळ्यावर जर काकडीची थंड चकली ठेवली असता डोळ्यावर आलेली सूज कमी होते. काकडीची चकली डोळ्यावरती ठेवावी व धुळे पाच ते दहा मिनिटे बंद ठेवावीत. असे दिवसात न चार ते पाच वेळेस करावे अशा या घरगुती उपायांमुळे नक्की डोळ्याची सूज कमी होते.

काकडीचे चकली मुळे नुसती सूज कमी होण्यास नव्हे तर डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळा दुखणे, डोळा ठणकणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यामध्ये कोरडेपणा असणे अशा वेगवेगळ्या प्रकारची डोळ्याचा त्रास तुम्ही घरगुती उपायाने घरीच नीट करू शकता.

डोळ्यावर आलेली सूज आणि त्यावरील उपचार

जर तुमच्या डोळ्यावर नेहमी सुजित असेल आणि ती खूप दिवसापासून असेल तर अशा वेळेस घरगुती उपाय न करता लवकरात लवकर जवळचे नेत्र तज्ञांना किंवा जवळच्या आरोग्य केंद्रातील नेत्रचिकित्सा अधिकारी यांना त्वरित दाखवावे.

नेत्रचिकित्सा अधिकारी तुम्हाला काही आर्टिफिशिअल टीअर ड्रॉप देतील त्यामुळे डोळ्याला थंडावा मिळेल.

नेत्रचिकित्सा अधिकारी तुम्हाला काही विचारपूस करून, काही तपासण्या करून डोळ्याला झालेल्या आजाराचे व्यवस्थित निदान करतील व त्यानुसार ते उपचार सुरू करतील.

नेत्रचिकित्सा अधिकारी (Ophthalmic officer ) यांनी दिलेल्या औषधी सांगितल्याप्रमाणे तसेच वेळेवर टाकावेत.



Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying