परिविक्षा कालावधी म्हणजे काय ?
शासन सेवेत कोणत्याही विभागात अधिकारी किंवा कर्मचारी रूजू झाल्यानंतर एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा कालावधी हा परिविक्षा कालावधी असतो. परीक्षा कालावधी यालाच Probation period असे म्हणतो.
या कालावधीदरम्यान अधिकारी आणि कर्मचारी शासन सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांना कामाची ट्रेनिंग दिल्या जाते, आणि त्यानंतर त्यांना कायम स्वरूपाची नियुक्ती आदेश दिले जाते.
परीक्षा कालावधी हा अधिकारी वर्गाला दोन वर्षाचा असतो तर कर्मचारी वर्गाला एक वर्षाचा असतो तसेच वेगवेगळ्या पदाचा वेगळा परीक्षा कालावधी असू शकतो.
या कालावधीमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांना नियमित असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी सारखे सुट्ट्या मिळत नसतात.
एक ते दोन वर्षानंतर परिविक्षा कालावधी साठी पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यास परिविक्षा कालावधी पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे.
परिविक्षा कालावधी प्रस्ताव : आरोग्य विभाग
आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांचा परिविक्षा कालावधीसाठीचा प्रस्तावामध्ये खालील कागदपत्राचा समावेश असतो.
आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिविक्षा कालावधी चा प्रस्ताव तीन प्रतीमध्ये पाठवणे आवश्यक आहे.
1. परिविक्षा कालावधी बाबतचे विहित विवरणपत्रात माहिती द्यावी.
2. कामाचा विशेष अहवाल
3. कामाचा विशेष निर्धारण अहवाल
4. करार फॉर्म ( बंध पत्रक )
5. ना तक्रार ना चौकशी प्रमाणपत्र
6. रजेचे प्रमाणपत्र
7. मुख्यालय राहत असल्या बाबतचे प्रमाणपत्र
8. माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत किंवा हिंदी व मराठी भाषा सुट याबाबतचे संचालनालयाचे प्रमाणपत्र.
9. संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्या बाबतचे प्रमाणपत्र
10. गोपनीय अहवाल पुनर्विलोकन अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीसह.
11. शासन नियुक्ती आदेशाची प्रत
12. नाव बदललेले असल्यास शासन राजपत्र ची प्रत
13. वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र याची साक्षांकित प्रत.
14. पूर्व चारित्र्य प्रमाणपत्र छायांकित प्रत
15. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र याची प्रमाणित प्रत तसेच अप्रगत गटात मोडत असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
16. कामावर रुजू झालेल्या बाबतचा रुजू अहवाल
आरोग्य विभागातील प्रस्ताव सादर करण्या बाबत महत्वाच्या सूचना
• परिविक्षा कालावधी समाप्ती बाबतचा प्रस्ताव तीन प्रतीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने पाठवावा.
• जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी परस्पर प्रस्ताव पाठवू नये.
• कर्मचारी रुजू झाल्यापासून परिवीक्षा कालावधीचा कार्यकाळ एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा असेल तर त्यानुसार त्यांचा गोपनीय अहवाल पुनर्विलोकन अधिकाऱ्याच्या सहीने पाठवावा.
• परिविक्षा कालावधी चा प्रस्ताव वरील दिलेल्या नमुन्यामध्ये व्यवस्थित माहितीमध्ये द्यावा व सोबत संबंधित सर्व कागदपत्राची छायांकित प्रत जोडावी.
• परिवीक्षा कालावधीचा प्रस्ताव हा तीन प्रतीमध्ये पाठवणे आवश्यक आहे.
वरील सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी याची छाननी करून कर्मचारी आणि अधिकार्यास कायम स्वरूपाची म्हणजे नियमित नियुक्ती आदेश देतात.
आरोग्य विभाग व्यतिरिक्त दुसऱ्या विभागांमध्ये आणखी वेगळे कागदपत्राची आवश्यकता असू शकते.