डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताहानिमीत्त जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे जनजागृतीपर कार्यक्रम


डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताहानिमीत्त जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे जनजागृतीपर कार्यक्रम व नेत्र रुग्ण तपासनी


डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताहानिमीत्त जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे जनजागृतीपर कार्यक्रम व नेत्र रुग्ण तपासनी

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रमा अंतर्गत प्रतीवर्षी १० जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन म्हणुन साजरा केला जातो. त्याअनुशंगाने दि. १० ते १६ जून डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताह म्हणुन साजरा केला जात आहे. यामध्ये जिल्हयातील सर्व ग्रामिण रुग्णालयामध्ये नेत्ररुग्णांची प्रथम तपासणी करुन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे जिल्हा स्तरावर नेत्रशल्य चिकित्सकाकडून योग्य तो औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. व त्याच प्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथील कर्मचाऱ्याकडुन नेत्रदानाचे समंतीपत्र भरुन घेण्यात आले. 

डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताह निमीत्त डोळयांच्या विविध आजारावर चर्चासत्र घेउन कोणत्या कारणाने डोळ्यांचे आजार होतात व ते न होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहीजे त्याबददल सखोल असे मार्गदर्शन डॉ. एस. एस. चांडोळकर नेत्रशल्य चिकीत्सकजिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम यांनी केले. त्याच प्रमाणे नेत्रदान हे एक श्रेष्ठदान आहे. 

डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताहानिमीत्त जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे जनजागृतीपर कार्यक्रम व नेत्र रुग्ण तपासनी



नेत्रदान केल्याने दोन किंवा अधिक अंध व्यक्तीच्या जिवनात प्रकाश निर्माण करू शकते. त्यामुळे नेत्रदान करावे व इतरांनासुध्दा नेत्रदान करण्यासाठी प्रवृत्त करावे.


कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय काळबांडे, व कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सामान्य रुग्णालयचे नेत्रशल्यचिकित्सक डॉ. एस एस चांडोळकर  यांनी केले व आभार प्रदर्शन नेत्रचिकित्सा अधिकारी श्री. ज्ञानेश्वर पोटफोडे  यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नेत्रशल्य चिकित्सक डॉ. आशिष बेदरकर, डॉ. अविनाश पुरी, नेत्र चिकित्सा अधिकारी श्री. ओम राऊत, श्री. सुधीर साळवे, श्री.  रमेश ठाकरे नेत्रदान समुपदेशक, गणेश व्यवहारे नेत्रचिकित्सा अधिकारी , श्री. रवी घुगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying