देहदान किंवा अवयवदान हाच खरा मोक्ष

देहदान किंवा अवयवदान हाच खरा मोक्ष

Organ donation





• मानवी शरीर मुळात 20 प्रकारच्या अमिनो आम्लांच्या रासायनिक क्रिया मधून तयार झाला आहे.

•  मृत्यू नंतरही ह्या शरीराचे विविध रासायनिक घटकांत विघटन होते. 

• शरीराचे जमिनीमध्ये विघटन होण्यापूर्वीच जर देहदान,अवयवदान आणि नेत्रदानाचा संकल्प केला तर अनेकांना नविन आनंदी आयुष्याचा लाभ होऊ शकतो. 

• अवयव दान केल्यानंतर मेल्यावरही आपण अमर होऊ शकतो पण आजही आपल्या मनात जुने विचार चालत आलेल्या रूढींचा प्रभाव आहे.


1) भारतीय संस्कृतीत दान या संकल्पनेचे काय महत्त्व आहे ?

• दान या संकल्पनेला आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे परंतु दान करताना डाव्या हाताचे उजव्या हाताला कळता कामा नये असे दान करावे.


• दान करणाऱ्या व्यक्तीच्या मनात अहंकार निर्माण होऊ नये कालानुरूप दानाच्या परिभाषेत बदल होत गेला आहे.

Organ donation


 • विज्ञान युगात देहदान, नेत्रदान आणि रक्तदान यांना महत्त्व आले आहे. 

• सामाजिक संस्था आणि संघटनांच्या जागृतीमुळे दानाच्या या तीनही प्रकारात नागरिकांचा सहभाग वाढत आहे.


2) एकवीसाव्या शतकातदेखील देहदानाबाबत नागरिकांच्या मनात गैरसमज आहेत का ?

• होय आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असलेल्या व्यक्तींमध्ये ही दुर्दैवाने देहदान, अवयवदान आणि नेत्रदानाविषयी गैरसमज आहेत. 

• आजही कित्येक शिक्षित लोकदेखील मोक्ष, मुक्ती, आत्मा या मूर्खपणाच्या परिघात फिरत आहेत. 

• कोणाला देहदानाविषयी माहिती सांगायला गेले की त्यांचा पहिला प्रश्न असतो अंत्यविधी नाही केला तर संबंधित व्यक्तीचा आत्मा इतरत्र भटकत राहील.

• त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. वास्तविक आपण विज्ञान युगात वावरत आहोत त्यामुळे हे निरर्थक विचार फेकून दिले पाहिजेत. 

• यासाठी विविध सामाजिक संघटनांनी समाज जाणीव जागृत करण्याची आवश्यकता आहे. आज परदेशात देहदानाकडे कल वाढत चालला आहे. व्यक्ती गेल्यानंतर तिच्या शरीराचा उपयोग जर इतरांना होत असेल, तर देहदान करायला काय हरकत आहेे ? हा विचार आपल्याकडे रुजायला हवा.


3) देहदानाची खरंच गरज आहे का आणि कोणत्या व्यक्तीचे देहदान स्वीकारले जाते ?


• शरीरशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीराचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक असते. साहजिकच कोणी देहदान केले, तर त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होतो. 

• कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे देहदान स्वीकारले जाते परंतु त्या शरीराचा उपयोग प्रत्यारोपणासाठी होत नाही. 

• याउलट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘ब्रेन डेथ’ घोषित केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी भावनेमध्ये न गुरफटता वैद्यकीय सल्ल्यानुसार संबंधित व्यक्तीला लावलेला कृत्रिम आॅक्सिजनचा पुरवठा काढून देहदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे केले तर त्यांचे सर्व अवयव दुसऱ्यांच्या उपयोगी येऊ शकतात. 


4) नेत्रदानाची चळवळ उभी राहावी यासाठी काय करता येईल ?

• सामाजिक संघटना त्यांच्यापरीने प्रयत्न करीत आहेत. परंतु शहर स्तरावर विचार केला तर, महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

Eye donation


 


5) सध्या नेत्रदानाची काय स्थिती आहे ?

• गैरसमजुतीमुळे नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे महत्वाचे म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात नेत्रदानाचे प्रमाण वाढत आहे. 

• एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केलेला असतो परंतु त्या व्यक्तीचे निधन झाल्यास नेत्र काढण्यास कुटुंबीय विरोध करतात यामुळे वादाचे प्रसंगही उद्भवतात.

•  मुळात भारतातच प्रतिवर्षी केवळ १५ ते १७ हजार नेत्रदान होते. सव्वाशे कोटी लोकसंख्या असूनही आपण श्रीलंकेकडून नेत्र आयात करतो.


6) रक्तदान केल्यास त्याचा आपल्या शरीराला काही लाभ होतो का ?

• रक्तदानामुळे दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचतातच परंतु तीन महिन्यांनी एकदा रक्तदान केल्यास आपले शरीर सुदृढ राहण्यास मदतच होते.

Blood donation


 • किडनी आणि हृदयविकाराचे आजार देखील कमी होण्यास मदत होते.

• साहजिकच स्वत:च्या स्वार्थाकरिता तरी प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे.


7) त्वचा दान म्हणजे नेमके काय ?

• मृत्यूपश्चात डोळे आणि त्वचा हे दोनच अवयव दान करता येतात त्यामुळे देहदानाद्वारे नेत्रदाना सोबतच आता त्वचादान करण्याबाबतही लोकांमध्ये थोडया फार प्रमाणात जागृती निर्माण होत आहे. 

Skin donation


• त्वचादानामध्ये दान करण्यात आलेली त्वचा ही त्या तारखेपासून पुढील पाच वर्षे सुरक्षितपणे साठवून ठेवता येते.

• रक्तपेढया, नेत्रपेढय़ांप्रमाणेच त्वचापेढया (स्कीन बँक)मध्ये त्वचा सुरक्षितपणे साठवण्याची सुविधा असते. 

• देहदान व अवयवदान हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आणि भावनिक असल्याने काही अवयवांच्या दानाबाबत बरेच गैरसमज पसरलेले आहेत. 

• त्वचादानाबाबत डॉक्टर्स आपल्या नातेवाइकाच्या पार्थिवाची संपूर्ण कातडी सोलून काढून ती विद्रुप करतील की काय, असा मोठा गैरसमज लोकांना असतो. परंतु, खरं पाहता त्वचादान करू इच्छिणा-या व्यक्तीच्या शरीराच्या केवळ गाल, मांडी आणि पार्श्वभाग यावरील त्वचाच काढून घेतली जाते व तिचा पुढे त्वचारोपणासाठी उपयोग केला जातो. 

• त्वचादान केलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना त्या व्यक्तीचं पार्थिव अंत्यविधींसाठी परत हवं असल्यास, त्या पार्थिवाला व्यवस्थितपणे ड्रेसिंग करूनच ते नातेवाइकांच्या सुपूर्द केलं जातं. 

• ब्रेनडेड अवस्थेत गेलेल्या (डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ घोषित केल्यावरच) व्यक्तीचंच आणि तेही अशा व्यक्तीच्या नातेवाइकांनी त्या व्यक्तीचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यावरच अवयवदान करता येतं. 

• अशा वेळी आपल्या माणसाचं अवयवदान करताना त्याच्या शरीराची चिरफाड करून ते विद्रुप होईल, असा विचार ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाइकांनी केल्यास अवयवदान होऊच शकणार नाही. 

• ब्रेनडेड व्यक्तीचं अवयवदान झाल्यानंतर त्याचं पार्थिव शिवून मगच ते नातेवाइकांच्या इच्छेनुसार त्यांना सुपूर्द केलं जातं वा त्याचं देहदान केलं जातं.

• देहदान करू इच्छिणा-यांच्या नातेवाइकांनी त्या व्यक्तीच्या पार्थिवासह ती व्यक्ती मृत झाल्यापासून पुढील दोन तासांच्या आत स्वत:हून सरकारी इस्पितळांपर्यंत पोहोचणं हे इस्पितळातल्या कार्यपद्धती आणि पुढील प्रक्रियेसाठी उपयुक्त असतं. 

• यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. ‘देहदाना’बाबत अनेकदा विविध माध्यमांतून जागृती केली जाते किंवा कोणत्याही सरकारी इस्पितळात याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकते. 

• अवयवदानाबाबत (Organ donation ) मात्र आवश्यक तितकी जागरूकता अजून निर्माण झालेली नाही.

8) देहदान व अवयवदान यात काही फरक आहे का ?

• देहदान आणि अवयवदान या दोन्ही गोष्टी पूर्णत: वेगळ्या आहेत. मुळात याचीच कित्येक लोकांना पूर्णत: माहिती नाही. 

• देहदान हे संशोधक किंवा अ‍ॅनाटॉमीचा अभ्यास करणा-यांसाठी केलं जातं. कारण एकदा का हृदय बंद पडलं की कोणत्याही अवयवाचा काहीही उपयोग होत नाही. पण अवयवदानाचं तसं नसतं. 

• मृत्यू हा केवळ हृदय बंद पडल्यानेच होतो, असं नव्हे तर मेंदू बंद पडल्यानेदेखील होऊ शकतो.

• मेंदुमुळ मृत्यू झाल्यानंतर चार तासांत हृदय, यकृत, किडनी, डोळे, हर्निया, त्वचा यापैकी शरीरातला कुठलाही अवयव दान करता येऊ शकतो. 

• त्यामुळे देहदान आणि अवयवदान या दोन गोष्टींमध्ये गफलत होते आणि ज्या गोष्टीची गरज आहे, त्या अवयव दानाकडे कोणीच वळत नाही. 

• अवयवदानामुळे कित्येक लोकांना फायदा होऊ शकतो म्हणूनच या गोष्टींची लोकांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे.

• त्यासाठी शाळा, कॉलेज, कार्यालयांमध्ये जाऊन या विषयाची माहिती लोकांना पुरवणं आवश्यक आहे, ही जबाबदारी कोणा एकाची नाही तर सर्वांनी मिळून लोकांमध्ये जागृती करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

• अवयवदानाविषयीच्या बातम्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, तसं झालं तर कित्येक लोकांचं आयुष्य सुधारेल.


9) अवयव दान करायला लोक का घाबरतात ?

• आपल्याकडे अवयवदानाची चळवळ खूप धीम्या गतीने पुढे सरकतेय हे खरं आहे. त्याचं कारण म्हणजे याबाबतीत समाजात मोठया प्रमाणात असलेल्या अंधश्रद्धा. 

• अवयव दान केल्यानंतर पुनर्जन्म मिळत नाही, मिळाला तरी जो अवयव दिला त्याच्याशिवाय मिळतो किंवा अवयव दान केला तर स्वर्गात प्रवेश मिळत नाही. 

• अशा प्रकारच्या समजुती जशा हिंदू समाजात आहेत तशाच इतर समाजातही आहेत. 

• शिवाय आपल्याकडे लोकांची विज्ञानापेक्षा देवावर अधिक श्रद्धा असते. त्यामुळेच ब्रेनडेड म्हणजे माणसाचा मेंदू निकामी झाल्यावरही त्याचे अवयव दान करायला नातेवाईक तयार होत नाहीत.

• त्यांना अशी आशा असते की विज्ञान नाही तरी देव तरी त्या माणसाला बरा करेल त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की सुशिक्षित लोकांनी यासाठी प्रयत्न केला तर ही चळवळ नक्कीच पुढे जाईल.


10) अवयव दानाचे महत्व काय आहे ?

• अवयवदानासारखं दान नाही असं मला वाटत, कारण एक जरी अवयव दान केला तर एखाद्या गरजू रुग्णाचं आयुष्य सुखी होऊ शकतं. 

• देहदानाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमजुती आणि अंधश्रद्धा आहेत. तसंच लोकांना असं वाटतं की आधीच आमचा माणूस आमच्यापासून दुरावला गेला आहे. 

• त्यात त्याच्या शरीराचा भाग काढून त्याची आणखीच दुर्दशा का करावी ? आपण कोणत्या गोष्टीचा कितपत भावनिकदृष्टया विचार करायचा, हे आपल्यावर आहे.

• भावनिक गोष्टींना बळी न पडता जर अवयवदान केलं, तर एखाद्याचे प्राण वाचू शकतात आणि त्यांचा पुनर्जन्म होऊ शकतो.

• कित्येक जणांच्या या विषयावर वायफळ चर्चा असतात की दान खरंच करायला हवं, पण कोणीही देहदान करण्यासाठी पुढे येत नाही.

• एकमेकांना बिनबुडाचे उपदेश देण्यापेक्षा प्रत्येकानं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आणि माणुसकीचं दर्शन घडवायला हवं यासाठी प्रबोधनाची नितांत गरज आहे.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying