नेत्रदान पंधरवडा ( Eye donation fortnight ) महत्वाची माहिती

नेत्रदान पंधरवडा विशेष माहिती

• राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NPCBVI)  प्रतिवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये जागतिक नेत्रदान पंधरवडा (Eye donation fortnight )  म्हणून साजरा करण्यात येतो. हा नेत्रदान पंधरवडा संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो, नेत्रदानाविषयीचे कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात येते, नेत्रदान विषयीचे माहिती देण्यात येते.




• भारतामध्ये अंध व्यक्तीची संख्या खूप जास्त आहे, अशा अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तराचा निश्चय करायला हवा. एका व्यक्तीने तिचे दोन डोळे दान केल्यामुळे दोन गरजू व्यक्तींना दृष्टी देण्यास फायदा होतो. आणि हे फक्त आणि फक्त दान केलेल्या डोळ्यामुळे शक्य आहे.

नेत्रदान पंधरवडा म्हणजे काय ?

• 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीनता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रदानाविषयी चे महत्व समजून सांगण्यात येते, नेत्रदानाविषयी जनमानसात जनजागृती करण्यात येते.

•  यामध्ये नेत्रदान महादान याविषयीचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवून लोकांना त्याविषयीची माहिती देण्यात येते यालाच आपण नेत्रदान पंधरवाडा ( Eye donation fortnight ) असे म्हणतो.


नेत्रदान पंधरवडा का साजरा केला जातो ?

• नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे अंध व्यक्तीच्या जीवनात परत प्रकाश मिळविण्यासाठी नेत्रदान करण्याची गरज असते त्यामुळे सर्व व्यक्तींना नेत्रदानाची माहिती असणे खूप आवश्यक आहे, नेत्रदानाची माहिती तसेच जनजागृती करण्यासाठी शासन वेगवेगळे कार्यक्रम राबवीत असते यासाठीच आपण नेत्रदान पंधरवडा साजरा करत असतो.

• या मागचा उद्देश म्हणजे प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तरांत नेत्रदानाचा संकल्प करायला हवा आणि अंधाच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करायला हवा. मृत्यूनंतरही डोळे दान करणे हे निसर्गाने दिलेली मानवास खूप मोठी देणगी आहे यास कोणीही वाया घालू नये मृत्यूनंतरही आपल्या डोळ्याने जग पाहता येते हे फक्त नेत्रदान केल्यानंतरच शक्य आहे.

नेत्रदान पंधरवडा केव्हा साजरा केला जातो ? 

• नेत्रदान पंधरवडा हा प्रत्येक वर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जन माणसांमध्ये नेत्रदानाचा प्रचार, प्रसार, जनजागृती, माहिती देऊन साजरा करण्यात येतो.


नेत्रदान पंधरवडा कसा साजरा केला जातो ?

• नेत्रदान पंधरवड्या दरम्यान सर्व नागरिकांमध्ये नेत्रदानाविषयीची जनजागृती व्हावी त्यामुळे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये नेत्रदानाविषयीचे महत्त्व, आणि तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा वावरत असलेल्या व्यक्तीमध्ये जुन्या परंपरा यांचे विचार मध्ये बदल करण्यासाठी जनजागृती करण्यात येते.

• नेत्रदान पंधरवड्यामध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी नेत्रदानाविषयीची वेगवेगळे बॅनर फलके लावून जनजागृती करण्यात येते.

• तसेच सार्वजनिक संस्था संघटना मिळून नेत्रदान विषयीची माहित हवी जेणेकरून नेत्र बुबुळे जास्तीत जास्त संख्येमध्ये जमा होतील आणि त्यामुळे अंध असलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण व्हायला मदत होईल.


नेत्रदान म्हणजे काय ?

• नेत्रदान म्हणजे मोनोपरांत एखाद्या व्यक्तीचे डोळे काढून ते दुसऱ्या अंध व्यक्तीला ज्या व्यक्तीचे पारपटल ( Cornea ) खराब आहे अशा व्यक्तीला बसवले जाते त्यालाच आपण नेत्रदान असे म्हणतो.

• नेत्रदान हे मरोपरंत सहा तासाच्या आत मध्ये केले जाते आणि ते 24 तासाच्या आत मध्ये पारपटल खराब ( Corneal blindness) असलेल्या अंध व्यक्तीस कॅरटोप्लास्टी (Keratoplasty) नावाची सर्जरी करून बसवले जाते.

• शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या अंधकारमय जीवनापासून सुटका मिळते आणि त्याचे जीवन प्रकाशमय होते आणि मृत्यू पावलेली व्यक्ती त्याच्या डोळ्यांनी मृत्यू झाल्यानंतरही हे सुंदर जग बघत असते.

• नेत्रदान हे एक महादान आहे असे महादान करण्याची संधी निसर्गाने मानवास दिलेली आहे, नेत्रदान हे कोणीही करू शकते लहान मुलापासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत कोणीही नेत्रदान करू शकते.


नेत्रदान करण्यासाठी काय करावे ?

• जर एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करावयाची इच्छा असेल तर त्यांनी जवळच्या सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन नेत्रदानासंबंधीचा फॉर्म भरून द्यावा.

• फॉर्म भरून दिल्यानंतर आपल्या जवळील व्यक्ती, मित्र मैत्रीण, नातेवाईक, तसेच शेजारी राहणाऱ्या व्यक्ती, तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तीस नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे याची सर्वांना माहिती द्यावी.

• जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर सहा तासाच्या आत मध्ये जवळील नेत्रपेढीस संपर्क करेल आणि आपली नेत्र ही अंध व्यक्तीस दृष्टी देण्यास मदत होईल.

• नेत्रदानाविषयीची सर्व माहिती मिळवून घ्यावी त्याची माहिती जवळील नेत्र चिकित्सा अधिकारी यांच्याकडून घ्यावी.



Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying