डोळ्यांचे विकार म्हणजे काय ?
डोळा हा मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील असा भाग आहे. डोळा हा खूप नाजूक भाग असल्यामुळे त्याची काळजी घेणे आणि व्यवस्थित निगा राखणे हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु काही वेळेस डोळ्याला मार लागून, अनुवंशिकपणे, जन्मापासून, काही पोषणद्रव्य कमी पडल्यामुळे डोळ्याचे आरोग्य ढासाळते त्यालाच आपण विकार असे म्हणतो. डोळ्यांचे खूप सारे विकार असतात यामध्ये काही साधारण विकार म्हणजे डोळा येणे, मोतीबिंदू, काचबिंदू, आळशी, पापणी खाली पडणे, तिरळेपणा, डायबिटीस रेतीनोपथी.
डोळ्याचे विकार आणि त्यांची लक्षणे
1. मोतीबिंदू:
डोळ्यात असलेला लेन्स वयोमानानुसार किंवा काही मार लागल्यामुळे अपारदर्शक होतो व त्यामुळे दिसायला अंधूक होते.
मोतीबिंदू हा विकार सर्वात साधारण विकार असून हा वयाची पन्नास वर्षे पूर्ण केल्यानंतर साधारणतः सर्व व्यक्तींमध्ये आढळून येतो.
मोतीबिंदू हा विकार बरा करता येण्याजोगा आहे यावरती उपाय म्हणजे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे हा आहे.
2. काचबिंदू :
काचबिंदू हा आजार म्हणजे डोळ्यांमध्ये ताण वाढवून डोळ्याची पाठीमागचा पडदा खराब होतो व त्यासोबतच डोळ्याची नस सुद्धा खराब होते आणि त्यामुळे रुग्णाची आजूबाजूची नजर कमी होते यालाच आपण काचबिंदू झाला असे म्हणतो.
काचबिंदू आजाराची लक्षणे म्हणजे डोळ्याला आजूबाजूचे कमी दिसणे, डोळ्याचा ताण वाढणे, डोळ्याला ठणक असणे किंवा डोळा दुखणे, उजेडाभोवती कलर दिसणे एकाच बिंदू आजाराची साधारण आढळून येणारे लक्षणे आहेत.
काचबिंदू आजार होण्याची कारणे म्हणजे डोळ्यात तयार होणारा द्रव्य व्यवस्थितरित्या बाहेर न पडल्यामुळे किंवा त्यामुळे अडथळा आल्यामुळे डोळ्याचा ताण वाढतो व त्यामुळे काचबिंदू होतो.
काही वेळा मोतीबिंदू खूप वाढल्यामुळे तो डोळ्यातच फुटतो आणि त्याचे काचबिंदूमध्ये रूपांतर होते.
काच बिंदू आजाराचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
A. Open angle Glaucoma
B. Closed angle Glaucoma
3. तिरळेपणा :
तिरळेपणा हा आजार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार आहे.
तिरळेपणा म्हणजे डोळ्यांमधील रचना मध्ये समानता नसणे यालाच आपण तिरळेपणा असे म्हणतो.
साधारण व्यक्तीमध्ये दोन्ही डोळे हे एका विशिष्ट रेषेमध्ये काम करत असतात व त्यांचे हालचाल सुद्धा एकसारखीच सोबत होत असते परंतु तिरळेपणा झालेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांचे हालचाल आणि बघण्याची दिशा वेगळी वेगळी असते त्यामुळे अशा काही पेशंटला दिसायला डबल दिसते. तिरळेपणा होण्याची काही कारणे म्हणजे एका डोळ्याला खूप जास्त नंबर असणे, एक डोळा आळशी असणे, दोन्ही डोळ्याच्या नंबर मध्ये जास्त प्रमाणात असमानता असणे, एखाद्या डोळ्याच्या स्नायूमध्ये कमी ताकत असणे अशा कारणामुळे तिरळेपणा होत असतो.
तिरळेपणा वरती उपचार म्हणजे काही व्यक्तीला चष्मा लावून तर काही व्यक्तींमध्ये प्रिझम चा नंबर देऊन तर काही व्यक्तींमध्ये शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात.
4. डायबिटीज रेटिनोपॅथी :
डायबिटीस रिटर्नोपॅथी हा आजार ज्या रुग्णाला मधुमेहाचा आजार आहे अशा रुग्णांमध्ये डायबिटीज रिटर्नोपॅथीची लक्षणे आढळून येतात आणि तसेच चिन्ह त्यांच्या बुबुलाच्या पाठीमागच्या पडद्यावर दिसायला लागतात.
डायबिटीज रिटर्नोपॅथीमध्ये पाठीमागच्या पडद्यावर ऑक्सिजनची कमतरता पडल्यामुळे नवीन रक्तवाहिन्या तयार होतात व जिथे पडदा खराब होतो आणि त्यामुळे रुग्णाला दिसायला अंधूक दिसते.
5. डोळे येणे (Conjunctivitis):
डोळे येणे हा आजार साधारण असून डोळ्याला जंतुसंसर्ग झाल्यामुळे होतो.
यामुळे डोळ्यांमध्ये चिकट पाणी, चिपडे येणे, डोळ्याला खाज येणे, डोळा चिकटणे, डोळ्याच्या बाजूला घाण येणे, आणि त्यामुळे दिसायला कमी होते, डोळ्याला सूज येते अशा प्रकारची लक्षणे डोळे आल्यानंतर दिसून येतात.
डोळे येणे हा आजार एकमेका
सऱ्याला होतो त्यामुळे अशा रुग्णांनी वापरलेला रुमाल दुसऱ्या व्यक्तींनी वापरू नये.
डोळे आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप वापरल्याने हा आजार बरा होतो.
6. डोळ्यावर टिक पडणे:
डोळ्यावर टिक पडणे हा आजार खूप साधारणपणे आढळून येणारा आजार आहे.
डोळ्याला काही मार लागल्यामुळे किंवा जंतुसंसर्ग झाल्यामुळे डोळ्यावर ती टिक पडू शकते.
डोळ्याला मार लागल्याबरोबर जर रुग्ण डोळ्यांच्या डॉक्टरकडे आला तर काही प्रमाणात ठीक पडू नये म्हणून उपचार किंवा उपाय केले जातात.
परंतु बऱ्याच वेळा मार लागला परंतु रुग्ण डोळ्यांच्या डॉक्टरकडे लवकर न गेल्यामुळे टीक पडते.
डोळ्यावरती टीक पडल्यामुळे रुग्णाला दिसायला अंधुक असते व त्यावरती उपाय म्हणजे टीक पडलेली जागा बदलणे म्हणजे बुबुळ बदलणे हाच त्यावरती पर्याय आहे त्यामुळे व्यक्तींनी डोळ्याला मार लागू नये अशी काळजी घ्यायला हवी व लागल्यास त्वरित नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा जेणेकरून डोळ्यावरती टीक पडणार नाही आणि त्यामुळे अंधत्व येणार नाही याची काळजी प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवी.
डोळ्यावरती टिक पडून अंधत्व येणे हे खूप साधारण लक्षण आहे.
7. नासुर होणे :
हा आजार झाल्यामुळे डोळ्यातून चिकट पाणी वाहू लागते. हा आजार होण्याची कारणांमध्ये जंतुसंसर्ग होऊन अश्रू वाहून नेणारे नलिका बंद होते आणि त्यामुळे डोळ्यातील पाणी अश्रू नलिकेद्वारे घशामध्ये न गेल्यामुळे डोळ्यातूनच पाणी वाहायला लागते त्यालाच आपण डोळ्याला नासूर झाला असे संबोधतो.
नासूर झालेल्या डोळ्यावरती सुरुवातीला काही दिवस उपचार केले जातात परंतु जर त्याने फरक पडला नाही तर अशा रुग्णावरती शस्त्रक्रिया केले जातात.
9. डोळ्याच्या पापणीचे विकार:
डोळ्याच्या पापणीच्या विकारांमध्ये डोळ्याची पापणी खाली पडणे, डोळ्याच्या पापणीला सूज येणे, रांजणवाडी येणे, डोळ्याच्या पापणीचे जंतुसंसर्ग होणे, डोळ्याच्या पापणीचे केस पांढरे होणे, पापणीचे केस आतल्या बाजूला जाणे, पापणीचे केस बुबुळावर टोचणे, पापणीचे केस पांढरे होणे, इत्यादी आजार डोळ्याच्या पापणीची असू शकतात.