कृपया नेत्रदान करा कविता

जागतिक नेत्रदान दिन

जागतिक नेत्रदान दिन


तुम्ही पाहता चंद्रमाला

उगवत्या मावळत्या सूर्याला

अथांग निळ्या सागराला

सुंदर जगाच्या सौंदर्याला

सर्वांनाही हे सुख लाभो

निश्चय हा ठाम करा !!१!!

कृपया नेत्रदान करा.

कृपया नेत्रदान करा


आई वडील ही मला दिसेना.

मस्जिद मंदिर गिरजा ही कळेना

माझे दुखः पिळा आणि चिंता

मानवतेलाही काही कळेना

नेत्र दीपांची ज्योती लावणी.

दूर हा अंधकार करा !!२!!

कृपया नेत्रदान करा.

कृपया नेत्रदान करा


सदैव फडकता ध्वज तिरंगा

फुलावर फुलावर उडता भुंगा 

पवित्र जलांची वाहती गंगा

 लहान मुलांचे भांडण दंगा

उत्साह मैय हे रंग तरंगा

आम्हालाही दृश्य करा !!३!!

कृपया नेत्रदान करा 

कृपया नेत्रदान करा


आपण केल्याने श्रेष्ठ दान

विझत्या दीपांना मिळेल प्राण 

वाचिन गीता बायबल, कुराण

मृत्यू नंतर हि हे दात्यांनो

पुण्याचे हे काम करा !!४!!

कृपया नेत्रदान करा 

कृपया नेत्रदान करा


    

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying