नेत्रदान | विश्व नेत्रदान दिवस | राष्ट्रीय नेत्रदान दिवस | राष्ट्रीय नेत्रदान पखवाड़ा | जागतिक नेत्रदान दिन | विश्व नेत्रदान दिवस 2021 | जागतिक नेत्रदान दिवस | विश्व नेत्रदान दिवस शायरी | विश्व नेत्रदान दिवस 2020 | नेत्रदान हॉस्पिटल | नेत्रदान का महत्व
नेत्रदानाचे फोटो, सुविचार, म्हणी, रचना
सर्व धर्मातील लोक श्रद्धायुक्त अंतकरणाने आपापल्या देवी देवतांची पूजाअर्च्या करतात ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याच अंतकरणाने श्रद्धा प्रेम जर अंध व दिव्यांग लोकांसाठी दाखवली तर त्यासारखी पूजनीय बाब दुसरी कुठलीही नाही.
नेत्रदान करा आणि अंधाप्रती आपली श्रद्धा प्रकट करा.
जगात काही गोष्टी, घटना अश्या आहेत की त्यांची तुलना इतर कशाशीही करता येत नाही. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले त्यांच्या दोन डोळ्यांमुळे दोन अंध व्यक्तीला दृष्टी आलेली आहे हे जे महान कार्य आहे त्याची तुलना इतर कशाशीही करता येणार नाही.
अशा कार्यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करायला हवा.
नेत्रदान करा मृत्युनंतर चांगल्या कामास पात्र व्हा.
माणसाने योग्य वेळी योग्य विचार करून योग्य निर्णय घेतला तर त्याचे कितीही अवघड कार्य सिद्धीस जाते. तसे नेत्रदान करण्यासाठी योग्य वेळेची किँवा योग्य विचार करण्याची कारण कार्य चांगले आहे. त्यामूळे एक निर्णय घ्यायचा आणि मृत्युनंतर नेत्रदान करायचे.
नेत्रदान चा संकल्प करा चांगल्या कार्यात सहभागी व्हा.
_____________________________