राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रम - NPCBVI
• राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रम ( National programme for control of blindness and visual impairment ) NPCBVI हा 100% केंद्र शासनाचा पुरस्कृत योजना असून सन 1976 पासून सुरू करण्यात आली आहे.
• या कार्यक्रमांतर्गत देशातील अंध व्यक्ती किंवा डोळ्याच्या आजाराविषयी आजार आणि त्यावरील उपाय केले जातात. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, वेगवेगळ्या आजारांचे निदान, त्यावरील उपाय आणि उपचार, अंध व्यक्तींना अंधत्व प्रमाणपत्र, आणि शालेय विद्यार्थ्यांना तसेच चाळीस वर्षावरील व्यक्तींना मोफत चष्मा पुरविल्या जातो.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचा उद्देश
• राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अंध व्यक्ती शोधून काढणे आणि उपचार करून अंधत्वाचे प्रमाण कमी करणे.
• प्रत्येक जिल्ह्यात अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रसेवा व सुविधा विकसित करणे.
• नेत्र विषयक सेवा पुरविणाऱ्या साधनांची गुणवत्ता व मनुष्यबळ विकसित करणे.
• अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवी संस्था (NGO) व खाजगी नेत्र रुग्णालय (Private eye hospital) यांना कार्यक्रम मध्ये सहभागी करून घेणे.
• नेत्रसेवा कार्यक्रमाबाबत जनजागृती वाढविणे
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा
1. मोतीबिंदू शस्त्रक्रिया मध्ये कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया करणे.
2. अशासकीय स्वयंसेवी संस्थांना डोळ्याच्या आजारावर उपचारासाठी आर्थिक सहायता देण्यात येते.
3. दृष्टीदोष शोधण्यासाठी नेत्रचिकित्सा अधिकारी यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी करण्यात येते व दृष्टीदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मा दिल्या जातो व त्यांची नजर व्यवस्थित ठेवल्या जाते.
4. चाळीस वर्षावरील वयोवृद्ध रुग्णांची (Prebyopic ) नेत्र तपासणी करून जवळच्या नजरेसाठी ( Near vision ) पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मा पुरविण्यात येतो. यामध्ये जे लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील आहेत त्यांना या सेवेचा लाभ घेता येतो.
5. उच्च रक्तदाब (Hypertension) व मधुमेह ( Diabetes) असणाऱ्या रुग्णांची नेत्र तपासणी (Eye test) करून उपचार करण्यात येतो. यामध्ये साधारणतः आढळून येणार आहे आजार म्हणजे डायबिटीस रिटर्नोपॅथी (Diabetes retinopathy), काचबिंदू (Glaucoma) आणि डोळ्याच्या मागील पडद्याचे आजार ( Retinal Disease).
6. नेत्र बुबुळ संकलन (Eye donation ) करून प्रत्यारोपण केल्या जाते.
7. जन्मतः अंदाज असलेल्या किंवा काही कारणास्तव अंध झालेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र (Handicap certificate ) वाटप केल्या जाते.
• प्राथमिक आरोग्य केंद्र ( Primary health center - PHC व ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital) स्तरावरील रुग्णांची नेत्रचिकित्सा अधिकारी (Ophthalmic officer ) यांच्यामार्फत नेत्र तपासणी करण्यात येऊन शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना जिल्हा स्तरावर संदर्भित करण्यात येते. तसेच त्या ठिकाणी प्राथमिक रोग निदान तसेच उपचार केले जातात काही गुंतागुंतीचे आजाराचे निदान करण्यासाठी त्यांना मोठ्या सेंटरला पाठविले जाते.
• प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथून संदर्भित केलेल्या तसेच जिल्हास्तरावर तपासणी केलेल्या रुग्णांच्या आवश्यकता असल्यास त्यांच्या संपूर्ण तपासण्या करून नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतात व काही गुंतागुंतीच्या गरज भासल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC) संदर्भित केल्या जाते.