जागतिक दृष्टी दिन - लव्ह युवर आयज

जागतिक दृष्टी दिन

आज जागतिक दृष्टी दिन हा दरवर्षी ऑक्टोबरच्या महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो, हा एक जागतिक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश अंधत्व आणि दृष्टीदोषाकडे लक्ष वेधने हा आहे.

जागतिक दृष्टी दिन - लव्ह युवर आयज


यावर्षीची संकल्पना आहे 'लव्ह युवर आयज' 'Love your eyes' ही व्यक्तींना त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी व अंधत्व आणि दृष्टीदोष याकडे लक्ष वेधून घेत जागरुकता वाढवण्यासाठी आहे. डोळ्यांचे आरोग्य हे केवळ दृष्टीवरच नाही तर आपल्या भविष्यातील गोष्टीवरही परिणाम करू शकते ज्यात शिक्षण प्रामुख्याने आहे.दृष्टीदिनानिमित्त डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

• दृष्टीदोष असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन दिलेल्या नंबरच्या चष्म्याचा नियमित वापर करावा.

• डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर व त्यांनी सूचवलेलीची औषध  डोळ्यात टाकावी मनाने कुठलेही औषधी डोळ्यासाठी वापरू नयेत ती घातक ठरु शकतात

• डोळे चोळण्यापासून टाळा कारण आपल्या हात बरीच घाण, धूळ आणि बॅक्टेरियाच्या संपर्कात असतात आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण डोळ्यांना स्पर्श करतो किंवा चोळता तेव्हा हे सर्व आपल्या हाताने सहजपणे डोळ्यांना हस्तांतरित केले जाऊ शकते. 

• वारंवार हात धुण्याचा सराव करा यामुळे संसर्गजन्य आजारापासून पासून स्वत:हाला दूर ठेवण्यासाठी मदत होते ज्यामुळे आपले डोळे, चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्स संसर्गाच्या संपर्कात येण्यापासून प्रतिबंधित होतील.

20-20-20 नियम पाळा.

आपण 20-20-20 नियमांचे पालन केले पाहिजे, ज्यात दर 20 मिनिटांनी, आपल्या संगणकाच्या मॉनिटरपासून दूर पहा आणि 20 फूट अंतरावर असलेल्या वस्तूवर एकटक लावून पहा.तसेच डोळ्यातील कोरडेपणा टाळण्यासाठी लागोपाठ 20 वेळा डोळे उघड-झाप करा 

पुरेशी झोप घ्या.

आपल्या शरीराच्या इतर अवयव प्रमाणे आपल्या डोळ्यांना देखील काळजी व आरामाची आवश्यक आहे आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्यांना आराम मिळतो .

• आपल्या डोळ्यांचे सूर्यापासून रक्षण करा सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांच्या प्रदर्शनामुळे वयाशी संबंधित मागील पडद्याच्या गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो आणि कॉर्निया सनबर्न किंवा फोटोक्राटायटीस होऊ शकतो. म्हणून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी  सनग्लासेस तसेच अतिनील संरक्षित चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स यांचा वापर करू शकता सर्वात सोपे म्हणजे टोपी, किंवा हॅट्स घालणे देखील अधिक चांगले.

• शरीरामध्ये पाण्याची योग्य पातळी ठेवा ज्यामुळे आपले डोळे कोरडे होण्यापासून व डोळे जळजळ होण्यास प्रतिबंधित करता येते.

नियमित व्यायाम करा.

नियमित व्यायामामुळे मधुमेहासारख्या इतर आजारांना रोखता येते. आठवड्यातून तीन वेळा कमीतकमी मिनिटे व्यायामाद्वारे, तुम्ही काचबिंदू आणि मॅक्युलर डीजेनेरेशन सारख्या डोळ्याच्या गंभीर आजाराची शक्यता कमी करू शकता.

धूम्रपान करू नका.

धूम्रपान केल्याने आपल्याला वय-संबंधित मॅक्युलर डीजनरेशन आणि डोळ्याच्या मोतीबिंदूसारख्या डोळ्यांचे आजार होऊ शकतात. 

संतुलित आहार ठेवा.

आपल्या डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी बीटा कॅरोटीन, ल्युटीन, ओमेगा -3, लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी, ए आणि ई आवश्यक आहेत. आपल्या आहारामध्ये पोषक द्रव्यांसह समृद्ध असलेले वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करा.

• संगणक मॉनिटरचे आणि खोलीतील प्रकाशाचे योग्य अंतर ठेवा.संगणक मॉनिटर डोळ्यांपासून हाताच्या लांबीएवढं दूर ठेवा, आणि डोळ्याच्या पातळीपेक्षा 20 अंश खाली ठेवा. हे आपल्या डोळ्यांना ताणतणावपासून वाचवते. त्याचप्रमाणे, आपल्या खोलीत योग्य प्रकाश आहे याची खात्री करा. खूप एकटक बघितल्याने  आणि तसेच खूप तेजस्वी प्रकशाची दिवे लावल्याने डोळ्यांवर खूप जास्त ताण येऊ शकतो.

• महिलांनी डोळ्यांकरिता योग्य प्रकारचे डोळ्यांना इजा न करणारे सौंदर्य प्रसाधने वापरावीत

• डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आय ड्रॉप वापरा,ऍलर्जी कमी करणारे आय ड्रॉप वापरा

• कुठलेही दैनंदिन कार्य करताना डोळ्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य काळजी घ्या आपले डोळे सुरक्षित राहतील हे सुनिश्चित करा. आपण पोहायला जात असल्यास, क्लोरीन असंलेले पाणी डोळ्यात न जाण्यासाठी व डोळे उघडण्यापासून टाळण्यासाठी चष्मा घाला. दरम्यान, आपण बागेत बागकाम करीत असाल किंवा घरात एखाद्या प्रकल्पात करत असल्यास डोळ्यामध्ये धूळ, जंतू आणि जखमांपासून आपले संरक्षण करण्यासाठी सुरक्षितता चष्मा घाला.

जागतिक दृष्टी दिनी ( World Sight Day ) वरील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून सामाजिक आरोग्य व जनहिताच्या कार्यात सहभागी व्हा व आपल्या डोळ्यावर प्रेम करत त्यांची काळजी घ्या.

जागतिक दृष्टी दिनाच्या नेत्रविभागात कार्यरत सर्वांना हार्दिक शुभेच्छा


लेखक: 
सुहासिनी सांडुराव जावळे
नेत्रचिकित्सा अधिकारी

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying